3 प्रतिक्रिया

सत्ताधारी पक्षाला सत्तेवर बसायला लाज नाही का वाटत ?


कांद्याचे भाव १०० रु. किलोवर जाण्याची शक्यता असल्याने सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याची बातमी वाचली. पण तरीही काही प्रश्न मला पडले आहेत.

१) सध्या कांद्याचे भाव ६० रु.किलो आहेत. म्हणजे जवळपास पाच ते सहा पटीने वाढलेलेच आहेत. ते अजून यापेक्षा दुप्पट वाढू शकतात हे सरकार सांगतंय; याचा अर्थ काय लावायचा ?

 • कांद्याचा साठा करून ठेवा, लवकरच त्याचे दामदुप्पट वसूल होतील असा इशारा साठेबाजांना सरकारकडून द्यायचा आहे ? की……..
 • मातीतला कांदा सोन्याच्या भावाला विकला गेला तरी सरकारला त्याविरोधात हस्तक्षेप करायची इच्छाशक्ती नाही ? हे सुचवायचे आहे.

२) बरं कांद्याचं एक सोडा, बाकीच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आटोक्यात आहेत अश्या भ्रमात सरकार आहे का ?

3) ज्या राष्ट्रवादीने “आम्हालाच निवडून द्या, आम्ही महागाई कमी करायला कटिबद्ध आहोत” अश्या अर्थाचा वचननामा जनतेला सादर केला होता; त्या  राष्ट्रावादीला निवडणुकांनंतर महागाई कमी करता तर आलेलीच नाही पण लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ती आहे त्या पातळीवर स्थिर ठेवण्यात देखील यश आलेलं नाही. पक्षाध्यक्षच देशाचा कृषीमंत्री असूनदेखील जनतेचे हे हाल ?

काय गंमत आहे पाहा, जनतेला महागाईपासून दिलासा द्यायचा सोडून ह्या महाशयांना “अजून अमुक इतके महिने महागाई राहील” किंवा “ढमूक वस्तूचे भाव तमुक इतक्यापर्यंत जातील” हे जाहीर करायला देखील लाज वाटत नाही ?

राष्ट्रवादीचं अभय असल्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाहीत हे सांगायला कोणा विद्वानाची गरज नाही. ज्या देशाच्या कृषीमंत्र्याला देशांतर्गत जीवनावश्यक अन्नधान्याचे भाग नियंत्रित करता येत नाहीत त्याला या पदावर राहण्याचा काय अधिकार आहे ?

ज्या आशावादी मायबाप जनतेने मत देऊन आणि ज्या निराशावादी जनतेने अप्रत्यक्षपणे (मत न देऊन) निवडून आणलेल्या सत्ताधार्‍यांना आणि विरोधकांना जनतेची इतकीही चाड असू नये ?

एकीकडे गरीब शेतकर्‍यांकडून कमी भावाने अन्नधान्य विकत घ्यायचं आणि दुसरीकडे तेच धान्य वारेमाप भावाला अंतिम ग्राहकाला विकून दोघांनाही नाडायचा धंदा या दलालांनी चालू केला आहे. स्वतः घोटाळ्यांवर घोटाळे करून रग्गड खाऊन जनतेला काही खायला शिल्लक ठेवणार आहेत की नाही मंडळी ? इतकं खाऊनही यांची पोट भरत कशी नाहीत ? एकीकडे जीवनावश्यक अन्नधान्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून, भाव वाढवून दुसरीकडे तेच धान्य दारू बनवायला देताना कृषीमंत्र्याची अक्कल काय गहाण पडली आहे ?

नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळलेल्या, गेंड्याची कातडी वागवणार्‍या आणी जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवू न शकता तिला महागाईच्या खाईत लोटणार्‍या या सरकारला सत्तेवर बसायची लाज कशी वाटत नाही ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “सत्ताधारी पक्षाला सत्तेवर बसायला लाज नाही का वाटत ?

 1. kanda mahag jala he barobar ahe. pan apan jewha ha kanda dukanatun ghet asto. ter to kanda ha dukandar kitti tari aadhi ha kanda vikat ghetala asto.audaharen dyache jale ter ha dukandar 40Rs. kg ne vikat gheto 3 mahine adhi.ani toch kanda to aplyala bhav wad jali ki 70 ne deto. ani deto ter deto te kase sarkar ne ghoshan kali ki kandyacha bhav aja pasun 70 jala ahe ki hya dukandaranare surwat kali mahanun samaja.pan apan tyala kadhi he vicharto ka he ase ka?

 2. स्वस्ताईबरोबर टंचाई असतेच. टंचाईला दूर ठेवताना स्वस्ताईदेखील बाजूस सारण्यात सरकारचे
  काही चुकलेले नाही असे मला वाटते.

 3. अग्रलेखाच्या तोडीचा लेख.
  श्रेया, अतिशय खरपूस भाष्य केलं आहेस…पण!

  हे अरूण्य रूदन ठरणार आहे. 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: