14 प्रतिक्रिया

जरा विसावू या वळणावर…..!


स्टार माझा चे प्रशस्तिपत्रक

स्टार माझाच्या ब्लॉग माझा ३ या स्पर्धेच्या निकालाबद्दल मी यापूर्वीच लिहिलं होतं. या स्पर्धेच्या बक्षिस समारंभाचे चित्रीकरण काल स्टार माझ्याच्या स्टुडीयोत पार पडले. एकूण सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स यांची नावे जाहीर झाली होती; पण त्यापैकी सगळेच जण काही चित्रीकरणाला उपस्थित नव्हते.

२१ व्या शतकाच्या पहिल्या दशकाचा अखेरचा रविवार; उपस्थित ब्लॉगर्सच्या शिरपेंचात स्टार माझाच्या सन्मानाचे मोरपीस खोचून गेला. या सन्मानाने ब्लॉगिंग चालूच ठेवायला बळ दिलं असलं तरी गेली साडेचार वर्ष अव्याहतपणे ब्लॉगिंग करणार्‍या मला स्वत:लाच काही प्रश्न विचारावेसे वाटताहेत. “या ब्लॉगिंगच्या छंदाने मी काय कमावले ? काय गमावले ? हा माझा स्वत:चा स्वत:शी संवाद तर खचितच नव्हता, कारण माझा ब्लॉग लिहिण्याचा उद्देशच मुळी वेगळा होता. मग तो उद्देश साध्य झाला का ? साध्य झाला असेल तर किंवा नसेल तरीही आता ब्लॉगिंग थांबवणार का ? नेहमी तेच तेच करायचा कंटाळा येत नाही का ?”

मंडळी, या आणि अश्या असंख्य प्रश्नांनी डोक्यात दंगा सुरू केला आहे. त्याची उत्तरे काहीही मिळोत…..माझ्या ब्लॉगची रिकामी पाने माझी वाट पहातीलच त्यांचं काय करू ? तेव्हा नव्या वर्षात ताज्या दमाने लेखणी सरसाऊन येईपर्यंत थोडी कळ सोसा. थंडीने गारठलेली बोटं पूर्वपदावर येईपर्यंत जरा थांबा. भेटूच नव्या वर्षात, नव्या प्रयोगांसकट पण तोपर्यंत……. जरा विसावू या वळणावर !

चित्रिकरणापूर्वी तीन पैकी दोन परीक्षक – लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांच्याशी सगळ्या ब्लॉगर्सच्या अनौपचारिक गप्पा झाल्या. आम्हाला सगळ्यांनाच ह्या स्पर्धेच्या निकालाकरता काय निकष लावले गेले हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्या अनुषंगाने ह्या गप्पा झाल्या. त्यातून जे काही हाती लागलं ते पुढे मांडत आहे.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

14 comments on “जरा विसावू या वळणावर…..!

  1. छान आढावा, खरेच श्रेयाताई, मी तरी कधीच विसरणार नाही तो दिवस ! माझ्या वाढदिवशी इतक्या सगळ्या जालकरांशी प्रत्यक्ष भेटीची जी भेट स्टामाने दिली त्याबद्दल स्टामाचे मानावे तेवढे आभार कमीच🙂

    • अरे तुझा त्या दिवशी वाढदिवस होता हे मी पूर्णपणे विसरून गेले. खरं तर पार्टी हवी यावर आधीच आपलं बोलणं झालं होतं. असो, आता उशीराने वा.दि.हा.शु.😉 पण पार्टी हवीच बरं का उशीराने.

  2. श्रेयाताई छान आढावा घेतला आहेस…

    खूप छान वाटले काल सगळ्यांना भेटून!!

Comment navigation

Newer Comments →

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: