१ प्रतिक्रिया

साहित्य संमेलन,संकेतस्थळ आणि हिशोब


साहित्य संमेलन आले आणि गेलेही. तत्पूर्वी ते  आधीच्या संमेलनाचे न सादर केलेले हिशोब आणि नंतर इतरही अनेक गोष्टींमुळे गाजले. यावेळी प्रथमच साहित्य संमेलनाकरता संकेतस्थळाची निर्मिति करण्यात आली, त्याशिवाय साहित्यिकांकरता संगणक-युनिकोड हे एकप्रकारे वरदानच असल्याचे साहित्यिकांवर ठसविण्याचा एक प्रयत्नही झाला. बुकगंगा.कॉम सारख्या पुस्तकविषयक संकेतस्थळाने आपल्या संकेतस्थळामार्फत साहित्यिकांना जणू त्यांचे साहित्य एका टिचकीत सातासमुद्रापार नेण्याचे अभयही दिले. या साहित्य संमेलनाच्या हिशोबाविषयी एक बातमी आणि दुसरी संकेतस्थळाविषयीची; आजच्या वर्तमानपत्राद्वारे वाचनात आली. दोनही बातम्या त्यांच्या दुव्यांसकट खाली दिल्या आहेत. त्यातला मतितार्थ असा आहे की……..

  1. बातमी क्र. १ :- आधीच्या घोटाळ्यांपासून धडा घेऊन, ह्या संमेलनाचा हिशोब आयोजक सर्वांना पहायला खुला करून देणार आहेत तेही केवं एका महिन्याच्या आत.
  2. बातमी क्र. २ :- संमेलन पार पडून दोन दिवस उलटले तरी संकेतस्थळ अजून अद्ययावत करण्यात आलेले नाही.

ठाण्यापूर्वी पार पडलेल्या काही संमेलनांचे हिशोब अद्यापही सादर झालेले नाहीत. त्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात होणाऱ्या ८४ व्या साहित्य संमेलनाचे हिशोब एक महिन्याच्या आत सादर केले जातील, असे संयोजकांनी जाहीर केले आहे.२५ ते २७ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या संमेलनाचा हिशोब अगोदर जाहीर केल्यानुसार महिनाभरात सादर केला जाणार आहे. संमेलनाची यजमान संस्था असलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयातही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात येणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, ठाणे महापालिका यांनाही सर्व खर्चाचा हा हिशोब ऑडिटरच्या रिपोर्टसह सादर केला जाणार असल्याचे संयोजन समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

संमेलन होऊन एक दिवस उलटला तरी या बेवसाईटवर फक्त संमेलनाचे ध्वजारोहण झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे नेमके संमेलनात काय घडले, हे फक्त संमेलनाला उपस्थित असणाऱ्यांनाच समजले. जे ठाणेकर नोकरीनिमित्त परदेशात आहेत अशांपर्यत हे संमेलन पोहोचलेच नाही. संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे अध्यक्षीय भाषणही वेबसाईटवर नाही.

Annotation on ‘वेबसाईट’वर संमेलनच नाही

माझी शंका अशी आहे की बातमी क्र. १ ची परिस्थिती बातमी क्र.२ दोनसारखीच तर होणार नाही ना ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “साहित्य संमेलन,संकेतस्थळ आणि हिशोब

  1. […] This post was mentioned on Twitter by memarathi. memarathi said: MarathiBlogs: साहित्य संमेलन,संकेतस्थळ आणि हिशोब http://bit.ly/eZOHUx […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: