3 प्रतिक्रिया

ऍनिमेटेड टेक्स्ट


बर्‍याचदा आपल्याला असं वाटतं की आपला निरोप समोरच्या व्यक्तिपर्यंत आकर्षक, कल्पकरित्या पोचावा. एखादा प्रेरणादायी सुविचार, एखादं अभिष्टचिंतन, अगदीच नाहितर….तुमच्या ब्लॉगच्या वाचकांकरता एखादा महत्वाचा मजकूर. ज्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान आहे; ते एखाद्या ग्रिटिंग कार्डच्या किंवा gif  फाईलच्या माध्यमातून हे करू शकतीलही. पण ज्यांच्याकडे असं काहीच तांत्रिक ज्ञान नाही,ज्यांना मजकूर मांडायला असा एखादा ब्लॉग नाही त्यांच्याकरता वंडरसे.कॉम हे संकेतस्थळ एक पर्वणी ठरू शकेल. अश्या बर्‍याचश्या ऑनलाईन संकेतस्थळांवर युनिकोड खपवून घेतलं जात नाही. पण वंडरसे.कॉम याला अपवाद आहे. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट मध्ये आपण मजकूर टाईप करून त्याला वेगवेगळे ट्रान्झिशन परिणाम देऊन तो आकर्षक करतो, त्याच पद्धतीने हे संकेतस्थळ आपण वापरू शकतो. या संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारे रजिस्टर करावे लागत नाही. आपला ईमेल देखील द्यावा लागत नाही. कोणतेही ठराविक परीणाम न देता आपण मजकूर टंकून लगेचच तो मजकूर कसा दिसेल हे पाहू शकतो. तो मजकूर ताबडतोब फेसबुक किंवा ट्विटरवर पाठवू शकतो. खाजगी असेल तर त्याचा दुवा आपण फक्त संबधित व्यक्तिलाच देऊ शकतो. आपण टंकलेल्या मजकूराचे पान बुकमार्क करून ठेवले तर पुढेमागे त्यात बदल करूनही वापरता येतं. जेव्हा पान बुकमार्क होतं, तेव्हा ते त्याच्या सद्य सेटिंग्जबरोबर बुकमार्क केलं जातं. हा मजकूर तुमच्या ब्लॉगवरही एम्बेड करता येईल असं म्हटलंय त्या संकेतस्थळावर पण निदान मला तरी इथे वर्डप्रेस.कॉम वर ते करण्यात यश आलेलं नाही. ब्लॉगस्पॉटच्या ब्लॉगर्सनी पहा बरं हे करता येतं का ? बघा बरं वापरून असं हे उपयुक्त संकेतस्थळ…आणि द्या धाडून शुभेच्छा संदेश आपल्या सगळ्या आप्तांना आणि हितचिंतकांना ! आपला मजकूर कसा दिसू शकेल हे इथे खाली दिलेल्या तीन उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईलच. त्यातले परिणाम जर तुम्हाला आवडले नाहीत तर खुशाल आपल्याला हवे ते बदल त्यात करा……ते लक्षात ठेवण्याकरता पान बुकमार्क करायला विसरू नका मात्र !

http://bit.ly/h8lMjB

http://bit.ly/f622z4

http://bit.ly/gD7Fxl

ऍनिमेटेड टेक्स्ट

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “ऍनिमेटेड टेक्स्ट

  1. shreya , namaskar…
    atishay sunder mahiti dilyabaddal tuze khup khup dhanyvad.

  2. मस्त ग श्रेयाताई, वर्ड प्रेससाठी शोध न अस काहीतरी…..

यावर आपले मत नोंदवा