4 प्रतिक्रिया

डिश टि.व्ही ची लुबाडणूक


ज्यांच्याकडे डिश टि.व्ही. असेल त्यांनी खेलवाहिन्यांकरता आगाऊ पैसे भरलेले असतील तर ते दिसतयं की नाही याची खातरजमा करून घ्या. आम्ही सहा महिन्यांचे पैसे एकदम भरतो. ऑक्टोबर शेवटाला नोव्हेंबर पासूनचे पैसे भरले ते एप्रिल अखेरीपर्यंत चालणार आहेत. त्यावेळी जे पॅकेज घेतले होते त्यात टेन स्पोर्ट्स आणि इतर खेलकूद वाहिन्यांचा पण समावेश होता. पण जेव्हा भारत-न्युझिलंड मालिका चालू होती तेव्हापासूनच त्यांनी क्रिकेट पॅक ३महिन्याकरता…महिना ४५ अशी जाहिरात दाखवायला सुरूवात केली. विश्वचषक त्यावर दाखवणार आहेत.परवा अचानक काही खेलवाहिन्या गायबल्या. नवर्‍याने दिल्लीला कॉल सेंटरला फोन केला तेव्हा त्याने पॅकेज विकत घेण्याचा फुकट सल्ला दिला.

मुळात जेव्हा घेतलं तेव्हा त्यात या वाहिनीचा समावेश होता. मग अचानक का गायबवलं ? एरवी पैसे भरेपर्यंत हे लोक समस करून आणि टि.व्ही वर जाहिराती पाठवून हैराण करतात, मग त्यांच्या डोक्याने त्यांनी पॅक बदलला तेव्हा का नाही समस केला ?असा हल्लाबोल त्यांच्यावर केला आणि ग्राहक मंचाकडे तक्रार करु अशी धमकी दिली. कारण चार महिन्यांपूर्वी पैसे भरले तेव्हा विश्वचषकाच्या वेळी असा बदल करू असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं. मूळ करारात जरी कोणतीही वाहिनी पॅकमधून कधीही कमीजास्त करू असे जरी सांगितले असले तरी ऐन वक्ताला ही शुद्ध लुबाडणूक झाली. शेवटी दोन दिवस फोनाफोनी केल्यावर त्यांनी आहे त्याच पॅक मध्ये गायबलेल्या वाहिन्या पुन्हा टाकल्या.

आता ज्यांनी हे आधी बघून ठेवले नसेल ते ऐन सामन्याच्या वेळी हातघाईवर येऊन नवा पॅक विकत घेतील. म्हणून ही सूचना दिली. हजारो लोकांमध्ये कोण कोण जाणार आहे भांडायला आणि ते ही दिल्लीला ?

कोणी म्हणेल:-तिथे नाही तर आपण जालावर पाहू शकू. हाय काय आणि नाय काय? तसंही पाहिलंच पाहिजे असं तरी कुठेय? 😉

जालावर पाहू शकू हे ठीक, पाहिलाच पाहिजे असं तरी कुठेय ? हेही ठीक पण ज्यांना पहायचाच आहे, तोही टि.व्ही.वर आणि ज्यांच्याकडे डीश टि.व्ही. आहे त्यांच्याकरता ही माहिती पुरवली.पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “डिश टि.व्ही ची लुबाडणूक

  1. nako asalelya sarvises mathi marun mobail madhil balans kasa gul hoto yacha
    mala changalach anubhav ala ahe pan takrar nemaki kothe kashi karaychi tech
    ata kalat nahi dish t v aso va mobail sarvises puravnarya kampnya sarech lutaru
    zalet sarkarcha dhak konalahinahi.

  2. विका त्या डीश टीव्हीला आणि त्या शाहरूख खान ला !

  3. श्रेता…माहितीबद्दल धन्यवाद….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: