4 प्रतिक्रिया

राजमान्य राजेश्री अजमल कसाब


खरं तर माझ्या किंवा कोणाही भारतीयाच्या ब्लॉगवर कसाब करिता एखादी पोस्ट लिहावी इतकी त्याची लायकी नाही. सरकार कैद्यांचीही जनगणना करणार आहे, पण कैदी कोण आहे, कोणत्या देशाचा आहे, आणि सर्वात मुख्य म्हणजे  कोणत्या गुन्ह्याखाली कैद आहे याचा विचार तरी सरकार करेल की नाही ? या न्यायाने उद्या कसाबने; तो भारतीय असल्याचा दावा केला तर जनतेला आश्चर्य वाटू नये. आणि याच आधारे तो युआयडी हे आधार कार्ड मिळण्याचाही दावा करू शकेल.  भारतीय जनतेकरता आणि २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांकरीता ही मोठी शोकांतिका ठरेल. कायदा काय सांगतो ? तर शंभर अपराधी निर्दोष सुटले तरी चालतील पण एक निरपराध बळी जाता कामा नये. अफजल गुरू, कसाब सारख्यांना शिक्षा करणे बोटचेप्या सरकारला काही जमणारे नाही. तेव्हा त्यांचा यथोचित सत्कार करून, सन्मानाने त्यांना मायदेशी सुरक्षित रवाना करावे ही विनंती. निदान भारतीय जनता भरत असलेला कर तरी ; या दोघांच्या सुरक्षिततेकरता खर्च न होता ,भारताच्या मंत्रिमंडळातील  सदस्यांच्या विकासाकरता वापरला जाईल.शंभर अपराध्यांपैकी आत्तापर्यंत फक्त हे दोघेच जिवंत हाती आले आहेत, उरलेल्या अठ्ठ्याण्णवांनी अजून भारतीय अस्मितेवर हल्ला करायचा बाकी आहे.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “राजमान्य राजेश्री अजमल कसाब

  1. To change rule.don’t listing of foreginer prisoner.

  2. भारतात येऊन गुन्हा करणारा माणूस अशी त्याची नोंद होईल. आपण बिथरण्याची गरज नाही.

  3. लहरी राजा ,प्रजा आंधळी,अधांतरी दरबार…..दूसरं काय म्हणणार आपण? 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: