7 प्रतिक्रिया

सुखान्ताची गुजारीश ?


नातेवाईकांना असाध्य आजाराच्या खाईत लोटून दयामरणाचा आधार घेत संपवायचे आणि मालमत्तेवर डल्ला मारायचा… समाजात असे घडू शकते , अशी भीती व्यक्त करत न्या. मार्कंडेय काटजू आणि न्या. ग्यान सुधा मिश्रा यांनी अरुणाच्या दयामरणाच्या अर्जावरील निकाल सोमवारी देऊ , असे मागच्या बुधवारी सांगितले होते. सुनावणीच्या वेळी कोणत्याही कायद्यानुसार किंवा भारतीय राज्यघटनेनुसार दयामरणाला मान्यता देता येणार नाही असा युक्तिवाद ऍटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी केला होता. तर बल्लभ सिसोदिया यांनी हॉस्पिटल अरुणा शानबाग यांची उत्तम प्रकारे काळजी घेत असल्याचा दावा केला होता.

पण तरीही मला वाटतं की दयामरणाबाबतचा कायदा होणं गरजेचं आहे. नातेवाईकांना संपवून मालमत्तेवर डल्ला मरण्याकरता हे करण्याची गरज नाही…खून करता येतो, होतो. ज्यांना जगण्याची उमेद नाही त्यांच्याकरता आत्महत्येचा पर्याय खुला असतो…आणि ते तो स्विकारून मोकळे होतात. प्रश्न उरतो कोणाचा……ज्यांना जगायची इच्छा नाही, आर्थिक समस्या, शारीरिक त्रास आहेत पण स्वत:हून स्वत:च मरण पत्करू शकत नाहीत त्यांचा. सुखांत मधील सीताबाई गुंजे, गुजारीश मधील ईथन, केईएम मधील अरूणा शानबाग या सगळ्या अश्याच व्यक्ति आहेत. अर्थात ईथन, सीताबाई गुंजे या चित्रपटातील व्यक्तिरेखा आहेत. पण अरूणा शानबाग ही व्यक्ति प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. मध्यंतरी एका गरोदर महिलेने एका प्रसूतितज्ञ पुरूषाच्या सहाय्याने असाच एक खटला चालवला होता. कायद्याने गर्भपाताला संमती नाही…..पण सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की ते जन्माला येणारं बाळ अनेक व्याधीग्रस्त असणार आहे. त्या महिलेला त्यावर उपचार करणं शक्य नसल्याने तिने आणि डॉक्टरने गर्भपाताला कायदेशीर परवानगी मिळवण्याकरता कोर्टात धाव घेतली. पण कोर्टाने पुन्हा असा कायदा नसल्याचे सांगत ती परवानगी धुडकावली. इथे दोन प्रश्न मला विचारावासे वाटतात. १) कोर्टात न जाता त्या महिलेने आणि डॉक्टरने परस्पर संमतीने गर्भपात घडवून आणला असता तर कोण काय करू शकलं असतं ? २) कोर्टाच्या पायर्‍या न चढता अश्या घटना घडत नाहीत असं कोर्टाला वाटतं का ? आणि घडत असतील तर त्या रोखण्याकरता कोर्टाकडे काय उपाययोजना आहे ? पुढे प्रसूतिच्या वेळी ते मूल मृत म्हणून जन्माला आलं. पण ते तसंच झालं की त्याकरता काही उपाययोजना केली गेली ह्याची कोर्टाने काही खातरजमा केली होती का ? वास्तविक कोणतीही आई आपल्या बाळाला स्वत:हून मारू इच्छिणार नाही. तरीही त्या महिलेने हे पाऊल उचलंल यातंच सगळं काही आलं….पुढेमागे आर्थिक परिस्थितीवाचून त्या बाळाचे हाल पहाण्यापेक्षा आत्ताच काय ते झालेले बरे. म्हणूनच म्हटले की उडदामाजी काळे-गोरे असणारच. कायदा केला म्हणून घरोघरी लोक परावलंबी लोकांना यात ढकलून देतील असं मानणं चुकीचं आहे आणि कायदा न करता असं घडत नाही ह्या भरवशावर रहाणं हे ही चुकीचंच आहे. पण त्या व्यक्तिला केवळ जीव आहे म्हणून जगवण्यात काय अर्थ आहे ? जगून त्या व्यक्तिच्या शारिरीक अवस्थेत काही फरक पडणार आहे का ? सुधारणार आहे का ? नुसतं पालापाचोळा म्हणून जगण्यापेक्षा जर मरण पत्करायला ती व्यक्ति स्वत: तयार असेल तर कोर्टाने त्याआड का यावं ? त्या व्यक्तीच्या चांगल्या जगण्याकरता कोर्ट काहीच करू शकत नाही…मग त्या व्यक्तिला जगवण्याचा अट्टहास का ? कशासाठी ? अर्थात म्हणून कोर्टाने हा निर्णय सरसकट घ्यावा असेही नाही. हा निर्णय व्यक्तिसापेक्ष घेण्यात यावा. त्या व्यक्तीची परावलंबित्वाची अवस्था, शारिरीक अवस्था, डॉक्टरांचे मत, आर्थिक स्थिती, त्या व्यक्तिची स्वत:ची इच्छा या गोष्टीही विचारात घ्यायल्या हव्या. नाहीतर कोर्टाने मरण नाकारालयं पण परावलंबित्वामुळे स्वत:ला होत नाही आणि करायला कोणी नाही अश्या तिढ्यात माणसं भरडली जायला नकोत. गंमत म्हणजे कोर्टाची परवानगी काढून रीतसर मरणाची याचना करणार्‍यांना कोर्ट अडवतं पण कोर्टाला भीक न घालता लोकं आत्महत्या करतातच की. सुखांत मध्ये सीताबाई गुंजे यांच्या तोंडी एक वाक्य आहे. ” सरकारने मरणाची सूट देऊन जगण्याची शिक्षा बंद करावी” सुखांतमधीलच एक विडियो या समस्येचं उत्तर देऊन जातोय पहा. पण दुर्दैवाने हा कटू निर्णय घ्यायची जबाबदारी कोणालाच नकोय.

याच विषयावरचे मान्यवरांचे लिखाण :-

वैद्यकभान : जीवनाला नकार..!

दयामरण का ? कसे ?

डॉक्टर्सना दयामरणाची अ‍ॅलर्जी का? – केईएम हॉस्पिटल सरकारी नसतं, खासगी असतं तर तिथल्या डॉक्टर्सनी अरूणावर ३७ वर्षे फुकट उपचार केले असते का? आज या सरकारी हॉस्पिटलमधल्या नर्सेस डय़ूटीवर असताना पगार घेत अरूणाची सेवा करतायत. हॉस्पिटल खासगी असतं आणि तिथल्या डॉक्टर्सनी अरूणाला ठेवून घ्यायला नकार दिला असता तर या नर्सेसनी अरूणाला आपल्या स्वत:च्या घरी ठेवून तिची सेवा केली असती का?

परिचारिकांचा आनंद जल्लोश कशासाठी?पिंकी विराणी यांनी आपल्या याचिकेतून बरंच काही मिळवलं. भविष्यातील समस्त स्वस्थ समाजजीवन याकरिता त्यांचे कायम ऋणी राहील. अरूणाचा निकाल आला तेव्हा एका वाहिनीवर तिचे काका सांगत होते, ‘आता ती मरेल तर खरंच खूप बरं होईल! तिचे हाल पाहवत नाहीत!’ सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केलंय की, अरूणाच्या दया-मरणाचा प्रस्ताव केईएमकडून आला तर त्यावर मुंबई उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते. आता चेंडू केईएम हॉस्पिटलच्या आवारात आहे. कवी पाडगांवकरांच्या प्रश्नाला केईएमने उत्तर द्यावे. बोला! सौंदर्यवती अरूणाने कसे जगावे? लाचार, रडत, लोळत, विद्रूप होत की मरावे गाणे म्हणत?

मृत्यूचेही इच्छापत्र हवे! रोगाला वेदनातून व क्लेशातून मुक्ती जेव्हा मृत्यू हाच देवू शकतो व सर्व उपाय निष्फळ आहेत हे ज्ञान असते तर जवळच्या नातेवाईकांनी रोग्याला भयानक अवस्थेत ठेवून नुसते आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले हे न दाखवता आयुष्य लांबवू नये हेच खरे; अर्थात सर्व प्रयत्न करून झाले असतील तेव्हाच वेदना शमन हाच एक उपाय चालू ठेवून रोग्याला नैसर्गिक मृत्यूला सामोरे जावू देण्यात म्हणजेच दयामरणाला संमती देण्यात अर्थ असतो.

खरंच कायद्यात बदल हवा का?कायदे खरोखर बदलण्याची गरज आहे का? याचाही विचार करण्याची पाळी आता आली आहे. दयामरण खरोखरच हवे का नको या वादातीत प्रश्नाला उत्तर नाही; परंतु दयामरण जर खुले केले तर त्याचा गैरवापर होईल व कॅन्सरसारख्या असाध्य रोग्यांनीही दयामरणाची मागणी केली तर ती वावगी ठरू नये. डॉक्टरांच्या संस्थांनी, पोलीस खात्याने व कायदेतज्ज्ञांनी यावर एकत्र येऊन गंभीरपणे विचार करण्याची पाळी मात्र आली आहे हे मात्र निश्चित.

जीवन आणि मरणाच्या फेऱ्यात डॉक्टरांची भूमिका – सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत इच्छामरण नक्की कशा प्रकारचे आहे? जो माणूस वेंटिलेटरसारख्या कुठल्याच साधनावर नाही आहे, त्याला इच्छामरण मिळू शकेल का? डॉक्टरांनी नक्की हा निर्णय कसा घ्यायचा? स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट मंडळींच्या जमान्यात, ‘तुमच्यापेक्षा आम्ही किती सरस आहोत’ या अहमहमिकेत, आणि ‘अध्र्या भरलेल्या ग्लासाला, भरलेला म्हणायचे की रिकामा’ या अवस्थेत संवेदनशीलता बाळगत रुग्णासाठी ‘चांगले काय?’ हे नक्की कसं ठरवायचे? शालिनीसारख्या केसेस जर २० आठवडय़ांच्या पलीकडे गेल्या तर त्या बाळांना जन्म देऊन मग आईने इच्छामरण मागायचे का?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

7 comments on “सुखान्ताची गुजारीश ?

  1. I think, there should be some modifications according to the situation.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: