12 प्रतिक्रिया

बालगंधर्व


नेमका काळ आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी असेल; सुबोध भावे यांनी फेसबुकवरून एखादा चांगला नट जो गाऊही शकेल, असा सुचवण्याचे आवाहन केले होते. मी त्यांना झी सारेगमप च्या सेलेब्रिटी पर्वाचे विजेते, उपविजेते- प्रसाद ओक, सुमित राघवन, सुनिल बर्वे इ. सुचवले.( प्रसाद ओक यांनी सारेगमप पर्वात संगीत नाटकांकरता काहीतरी करायचे आहे असे जाहीरपणे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नव्हते. ) मग अचानक कानावर आले की सुबोध भावे बालगंधर्वांची भूमिका करत आहेत.पाठोपाठ त्यांचा राजबिंडा , फेटयातला फोटो देखील त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये दाखल झाला.

उत्सुकता वाढू लागली. माझ्या पिढीला बालगंधर्व म्हणजे आख्यायिकाच. पूर्वी नाटकांतून काम करायला स्त्रियांना आडकाठी असल्याने स्त्रीपार्ट बालगंधर्व करायचे इतकीच माहिती त्यांच्याविषयी होती. त्यामुळे जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा हा चित्रपट नक्की पहायचा हे ठरवून टाकलं होतं.

२९ एप्रिल रोजी बालगंधर्वची ही जाहीरात पाहिली आणि मन थोडं खट्टू झालं. चित्रपट फक्त मल्टिप्लेक्समध्ये दाखवला जाणार होणार होता. मी, नवरा,मुलगा,सासूबाई सगळ्यांना हा चित्रपट बघायची उत्सुकता होती. मल्टिप्लेक्सचे दर अडीचशे तीनशेच्या खाली नव्हते. चार जण म्हणजे हजाराचा खुर्दा. इतर प्रवास-खाणे वेगळेच. शेवटी १ मे रोजी आम्ही कौशल इनामदार यांना ( फक्त त्यांचाच दूरध्वनी क्रमांक होता) दूरध्वनी करून चित्रपट साध्या कमी दर असलेल्या चित्रपट गृहात दाखवायची विनंती केली. त्यांनी बघू,प्रयत्न करू पण नक्की आश्वासन देता येणार नाही असे सांगितले. नितीन देसाई, राहूल देशपांडे आणि कौशल इनामदार यांच्या फेसबुक भिंतीवर अशी जाहीर विनंती केली. ३मे रोजी पर्यंत परिस्थिती जैसे थे होती. ४ मे ला मात्र अचानक जाहिरातीत आमच्या इथल्या सोना गोल्ड या चित्रपट गृहाचे नाव झळकलेले पाहिले. तरीही खात्री वाटेना पण ५ मे ला चित्रपटाच्या खेळाची वेळ देखील जाहीर झाली. मग मात्र वेळ न दवडता लगोलग जाऊन तिकिटे आरक्षित करून आले.

चित्रपटाचा खेळ रात्री ८.१५चा होता. तो संपायला १०.१५ वाजणार असल्याने  घरून जेवून जायचेच ठरवले. जेऊन ७.३० ला बाहेर पडलो. वास्तविक गाडीने फक्त १५ मिनिटांत चित्रपटगृहात पोचलो असतो पण  सोबत सासूबाई असल्याने आणि त्यांना चालायला वेळ लागत असल्याने लवकर पोचलो तरी हरकत नाही पण अंधारात खुर्च्या धुंडाळणे नको असा विचार केला. वाटेत शिवसेनेचा कोणी नेता येणार असल्याकारणाने त्याच्या स्वागताकरता जमवलेल्या गर्दीमुळे वाहनांची गर्दी अडकून राहीली.  त्यामुळे ७.३० ला निघून ७.४५ला पोचायचा आमचा बेत शिवसेनेने धुळीला मिळवला. आठ वाजले तरी आम्ही जिथल्या तिथेच. आता सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली. नवर्‍याच पित्त खवळलं होतं. तो आठवे्ल त्या राजकारण्याच्या नावाने लाखोल्या वहात होता. करण्यासारखे काहीच नसल्याने शेवटी जेव्हा पोचू  तेव्हा चित्रपट पाहू असा तटस्थ विचार करून शांत बसून राहिलो.शेवटी गर्दी हलून चित्रपटगृहात पोचलो तेव्हा ८.१० वाजले होते. पाहिलं तर अजून कोणालाच आत सोडलेलं नव्हतं. त्यामुळे हुश्श ! असा निश्वास टाकला. नंतर कळलं की आधीच्या खेळात काही तांत्रिक अडचण आल्याने बालगंधर्वचा खेळ उशीरा होणार आहे. जेऊन खाऊन आल्याने आम्हाला काही फरक पडणार नव्हता. शेवटी ८.४५ ला आता जाऊन आसनस्थ झालो.

बालगंधर्व विषयी वाचायला उत्सुक असलेल्या तुम्ही माझं हे पाल्हाळ वाचल्याबद्दल धन्यवाद. आता प्रत्यक्ष चित्रपटाबद्दल पुढच्या भागात 😉 . तोपर्यंत चित्रपटातील काही गाणी ऐका.

पंचतुंड नररूंडमालधर

परवरदिगार

असा बालगंधर्व आता न होणे

चिन्मया सकल हृदया

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

12 comments on “बालगंधर्व

 1. श्रेया,
  तुम्ही गाणी विकत घेतलीत आणि हे जाहीर केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यामुळे तुम्ही गाण्यांच्या चोरी(पायरसी)च्या विरिद्ध एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन!

  • धन्यवाद कौशल,पण काल उरले्ल्या १७ गाण्यांचे देखील पैसे भरून डाऊनलोड करत असताना १३ गाण्यांनंतर पान रीफ्रेश होताना अचानक एरर आली. त्यामुळे दुसर्‍या सिडीतील शेवटची ४ गाणी डाऊनलोड करता आली नाहीत. मी तात्काळ तसा निरोप सारेगामा पोर्टलला पाठवला..पण त्यांच्याकडून अजून उत्तर आले नाही. पैसे तर खात्यातून वळते झाले आहेत. याबाबत काय करता येईल ?

 2. mi raj sakali hi ganni iktey mala khup avadatat hi ganni

 3. वा! छानच लिहिलंय. दोन-तीन तासात बालगंधर्वांना बसवणं शक्यच नाहीये हे अगदी खरंय.पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसा हा प्रकार आहे असे मानूया. बालगंधर्व कोण होते? कसे होते वगैरे बाबी तर पोचल्या ना ह्या पिढीपर्यंत…खूप झालं.
  बालगंधर्व चित्रपटामुळे नाट्यसंगीताला पुन्हा चांगले दिवस येवोत हीच इच्छा!

 4. ऑनलाईन पैसे भरून मला हवी होती ती उतरवून घेतली .. link dya ki kuthun utaravlit ti – amahal pan havi ahet !

  • http://www.saregama.com/portal/pages/music.jsp
   2 सिडीज मिळून २१ गाणी आहेत. प्रत्येक गाण्यापुढे डाऊनलोडचा बाण आहे. गाण्याच्या अलिकडे एक चौकोन आहे. त्यात टिचकी देऊन निवडून डाऊनलोडचे बटन दाबल्यावर हवी ती गाणी my cart मध्ये जमा होतात. मग पुढे ऑनलाईन बॅंकींगद्वारा पैसे भरल्यावर लगेच ती डाऊनलोड करू घेता येतात.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: