25 प्रतिक्रिया

आधार कार्ड प्रत्यक्ष अनुभव….


आमच्या घरापासून जवळच महानगर पालिकेचे एक नवीन कार्यालय उघडले आहे. तिथेच आधार ओळखपत्र भरण्याचे केंद्रही आहे. इतके दिवस हे माहीत नव्हते. हल्लीच ते कळले……पण त्याचबरोबर एकेकांचे अनुभवही ऐकायला मिळत होते. त्यामुळे नको ती कटकट, काय फरक पडणार आहे अजून एखादे ओळखपत्र घेऊन ? आहेत त्या ओळखपत्रांचे काय लोणचे घालायचे ? असंच मत होतं. असंही वाटतं होतं की….आमचं अर्ध आयुष्य गेलं…पण आमच्या मुलाचं काय ? तो अजून कायद्याने सज्ञान नाही….पण एकदा अठरा वर्ष पूर्ण झाली की……सगळीकडे त्याला बदल करावे लागणार, त्याची कागदपत्रे जोडावी लागणार, पुरावे द्यावे लागणार, पॅन – पासपोर्ट ह्यांशिवाय तर कोणतही खातं उघडणं मुश्किल. अश्या परिस्थिती हे आधार ओळखपत्र जर भविष्यात सक्तीचे केले गेले तर ? त्यापेक्षा आत्ताच काय आहे ते पाहून , अर्ज करू…. असा सूज्ञ 😉 विचार करून त्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला.

दुपारचे १२.३० झाले होते. २५-३० जणांची एक रांग लागलेली होती. आत ५-६ मेजांवर कामं चालली होती. रांगेतल्या शेवटच्या मुलीला, तिच्या हातातला अर्ज बघून “मला अर्ज कुठे मिळेल ?” याची माहिती विचारली. ती म्हणाली,”सकाळी १०० अर्ज मिळतात. सकाळचा साठा संपला, आता पुन्हा २ वाजता या, त्यावेळी ५० अर्ज मिळतात”. विचार केला घरी जाऊन पटकन जेऊन, कामं आटपून यावं.दरवाजावर लिहिलेल्या माहितीवरून येताना काय काय आणायचे हे वाचून घेतलं. त्याप्रमाणे आटपून सव्वा वाजल्यापासून रांगेत उभी होते. दोन वाजता तिथल्या कंत्राटदाराने खिडकीतून माझ्याकडचे पुरावे पाहून मगच मला अर्ज सुपूर्त केला. तत्पूर्वी त्याने त्या दिवसातला / त्या वेळेतला हा कितवा अर्ज आहे हे प्रत्येक अर्जावर नोंदवलेले होते. रांगेतला माझा क्रमांक पहिलाच असला तरीदेखील जेवणाच्या सुट्टीआधी सकाळच्या अर्जातले १० अर्ज बाकी होते, त्यामुळे माझ्या अर्जावर ११ असा क्रमांक घातला गेला.

अर्ज हाती आल्यावर आधाशासारखं एक बाकडं शोधून त्यावर बसून अर्ज भरला. बरीच माहिती भरायचे रकाने होते, पण प्रत्यक्षात नाव, पत्ता याव्यतिरिक्त कोणीच काही भरत नव्हतं. मतदार ओळखपत्राचा तपशील, बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक नोंदवण्याचे टाळले. पण ईमेल पत्ता मात्र भरला.

काही वेळाने आत बोलावणे आले. प्रत्यक्ष काम जेमतेम ८-१० मिनिटांचे होते. सरकारी काम असूनदेखील सगळी टेबलं न फिरता एकाच टेबलावर संपूर्ण काम होतं होतं. प्रत्येक टेबलाला आवश्यक ती सुविधा, यंत्रणा पुरवलेली होती. आधी डाव्या हाताचे-मग उजव्या-मग दोन्ही अंगठ्यांचे ठसे घेतले गेले. कसलं तरी यंत्र डोळ्यासमोर धरून बुबुळळांच चित्रण झालं. मग छायाचित्र काढलं गेलं. त्यानंतर माझा अर्ज माझ्यासमोरच त्या कर्मचार्‍याने भरायला सुरूवात केली. तो लॅपटॉप वर काम करत असला तरी माझ्या समोरदेखील मॉनिटरवर तो टंकत असलेले मला दिसत होते. त्यात चूक झाल्यावर तो ताबडतोब ती दुरुस्त देखील करत होता. गंमत म्हणजे विंग्रजीत टंकलेला मजकूर…शेजारीच मराठीतदेखील दिसत होता. मराठीत चुकलेला मजकूर तो गुगल ट्रान्सलिटरेशनच्या सह्हाय्याने चटकन दुरुस्त करत होता. सगळ्या टेबलवर कर्मचारी म्हणून जे काम करत होते ते सगळे महाविद्यालयात शिकत असलेले किंवा नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले तरूण-तरूणी होते. त्यामुळे संगणक आणि इतर तंत्र हाताळण्याचे काम ते सफाईदारपणे करत होते. फक्त तरूण पिढी असल्याने कामं करता करता कानाचा भ्रमणध्वनी काही सुटत नव्हता. टंकत असलेली माहिती वाचून पुन्हा एकदा त्या त्या व्यक्तिला विचारून खात्री करत होते. ते झाल्यावर मी नेलेले मूळ पॅन ओळखपत्र आणि शिधापत्रक, पुरावे म्हणून स्कॅन करून घेतले, झेरोक्ष काही मागितली नाही. आणि मला नमुना म्हणून मीच दिलेल्या माहितीचा तात्काळ एक प्रिंटआऊट काढून दिला. तशाच एका प्रिंटआऊटवर माझी सही घेतली. ओळखपत्र पोस्टाने घरी येईल तीन महिन्याने असे सांगून माझी बोळवण केली. सरकारी काम असलं तरी विप्रोसारख्या मातब्बर संगणकीय कंपनीला हे कंत्राट मिळालेले असल्याने यात तरी भ्रष्टाचार होणार नाही अशी आशा वाटते.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

25 comments on “आधार कार्ड प्रत्यक्ष अनुभव….

  1. गेल्या वर्षी म्हणजे 8 जुलै 2011 ला मी आधार नोंदणी केली पण 13 महिने झाले तरी अजुन आधार कार्ड आले नाही

  2. marraje certifate asel tar baki kahi document nahi lagat ka plz reply

    • रेश्माताई, निवासी पुरावा आणि तुमचा फोटो असलेले मान्यताप्राप्त कार्ड ह्या दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. आणि रेशन कार्डावर तुमचे नाव असेल तर मॅरेज सर्टिफिकेट असण्याची काही गरज नाही

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: