5 प्रतिक्रिया

लवासा


लवासा हे प्रकरण रोजच वर्तमानपत्रातून गाजतयं, रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अगदी प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून हा प्रकल्प बेकायदेशीर म्हणून उभा रहात आहे अशी त्याची प्रसिद्धी केली जात आहे.  ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी लवासा नावाचं पुस्तक देखील यावर लिहिलं आहे. ते नुकतंच माझ्या वाचनात आलं. त्याविषयी काही…..

पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या काठाने जी आदीवासी वस्ती गावांमध्ये रहाते आहे, तिथे हा प्रकल्प उभा रहात आहे. इथल्या जमिनी ९७%निकस आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शेतजमिनीवर उभा रहात नाही. इथल्या आदिवासींची / स्थानिकांची परिस्थिती उत्पन्न नसल्याने हलाखीची होती. दळणवळणाची कोणतीही साधने इथे नव्हती. लवासा प्रकल्प तयार होत असल्याने स्थानिकांना रोजगार मिळालाच शिवाय गावाचा विकास झाला. जी जमिन प्रकल्पाकरता वापरली आहे ती स्थानिकांचीच असली तरी सुरूवातीला कोणताही विकास झाला नसल्याने अल्प किमतीत ती आदिवासींनी लवासाला विकली, पुढे विकास होऊ लागला तसा जमिनीचा भाव वधारू लागला, त्यामुळे लवासाने स्थानिकांना फसवलं अशी ओरड स्थानिकांनी सुरू केली.काही बाबतीत तर जमिनीचे भाऊबंदकीत वाद चालू असल्याने लवासाकडून एकाने पैसे घेतल्यावर दुसर्‍याने येईन लवासावर आरोप केल्याची उदाहरणे देखील घडली आहेत. मेधा पाटकरांनी स्थानिकांच्या मदतीने लवासावर ’स्थानिकांच्या जमिनी लुबाडल्या’ असा आरोप केला आहे तर लवासाच्या मते स्थानिकांच्या फसवणूकीलाच लवासा बळी पडत असल्याचे म्हटले आहे.

१९९० मध्ये इंग्लंड मध्ये नदीकाठचे शहर शरद पवारांनी पाहिले तेव्हापासून हा प्रकल्प त्यांच्या डोक्यात घोळत होता. पुणे हे त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने ह्या प्रकल्पाची जागा  म्हणून मुळशी तालुक्यात जागा निश्चित केली गेली. लवासाच्या मते हा प्रकल्प शरद पवारांचा असल्याचा गैरसमज समाजात पसरला आहे, तो दूर व्हायला हवा. कारण जनतेच्या मते शरद पवार ह्यांचे कर्ता करविते असल्याने लवासासारखा महत्वाकांक्षी प्रकल्पाला हकनाक आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले आहे. महाराष्ट्रात हे असं शहरच्या शहर वसवण्याचा प्रयत्न पहिल्यांदांच होत आहे. हे काम खर्चिक असल्याने म्हणा, किंवा ह्याची जाहिरात करताना अनिवासी भारतीयांच्या यातल्या गुंतवणुकीला अवाजवी महत्व दिल्याने म्हणा किंवा उच्च मध्यमवर्गीयांकरता असलेले एक शहर असे सांगितले गेल्याने म्हणा..सर्वसामान्य जनता यापासून वंचित राहीली आणि सहाजिकच हा प्रकल्प सर्वसामान्यांकरता नसल्याचे ठरविले गेले. लवासाच्या मते मात्र अगदी वडपाव खाणार्‍यांकरता देखील इथे जागा असेल असं सांगितलं गेलं. पण तशीच जाहिरातीबाजी केली तर मग उच्चमध्यमवर्गीय लोकांचा ओघ इथे येणार नाही, असं लवासाला वाटतं.”मार्केटींगचे काही फंडे आहेत. एखादे प्रॉडक्ट बाजारात ठेवायचे असेल तर ते वरच्या पातळीवर ठेवावे, वरून खाली येता येतं पण खालून वर सहजासहजी जाता येत नाही. वरच्या वर्गामध्ये वापरली जाणारी वस्तू वापरावी असं खालच्या वर्गातील ग्राहकाला वाटतं. पण खालच्या वर्गात लोकप्रिय झालेली वस्तू वरच्या वर्गाला वापराविशी वाटत नाही”.

लवासा हे नाव कसं मिळालं या प्रकल्पाला ? लॅंडोर नावाच्या कंपनीने हे काम केले. त्यांच्या मते नावाला काहीही अर्थ असू नये. स्वर्ग, आनंद, निसर्ग असा अर्थ असलेली नावे असू नयेत. गावांची / ठिकांणांची नावे असू नयेत कारण त्याला बरावाईट असा इतिहास चिकटलेला असतो. त्याचे विपरीत अर्थ काढले जातात. त्यापेक्षा निरर्थक नाव घ्यावे. नावात वापरलेल्या आद्याक्षरांतून काहीतरी ध्वनी निघावा, तो उच्चारण्यात गंमत असावी. त्यामुळे स्क्रॅबल खेळता खेळता ALSAVA या अक्षरांतून LAVASA ( लवासा) हे नाव सापडले, आवडले, ही  जुळणी कानाला बरी वाटली.

इथली जमीन जरी शेतजमीन नसली तरी वापरण्यायोग्य करताना अनेक जंगलं तोडावी लागली. पण लवासाच्या मते,”त्यांनी जेवढी झाडं तोडली त्याच्या कैक पटीत नवीन झाडं लावली आहेत. कोणतीही वस्ती झाडं तोडल्याशिवाय होत नसते. प्रश्न असतो तो फक्त जुन्या, अनेक वर्ष वाढायला लागणार्‍या झाडांचा. पण असे वृक्ष वैज्ञानिक दृष्ट्या स्थलांतरित करता येतात. तसे ते त्यांनी केलेही आहेत. पर्यावरण नावाचं एक खातंच लवासात आहे. वनस्पतीची एक गंमत आहे.ती कधीही मरत नाही. तिच्यातली मूलद्रव्यं, वनस्पती जाळल्यावर / कुजल्यावर  पुन्हा मातीत मिसळतात त्यातून नवी वनस्पती आकार घेते.  झाड तोडलं जातं तेव्हा ती कायमची तोड नसते. वनस्पतीचे भाग नीट वापरले तर त्यातून नवं झाड तयार होतंच होतं हे तत्व लक्षात घेऊन लवासमध्ये सर्व निसर्ग पुन्हा प्रस्थापित केला आहे.”.

लवासा हे शहर स्पेशल प्लानिंग ऑथॉरीटी अतंर्गत तयार होत आहे. धड नगरविकास खात्यात मोडत नाही धड हीलस्टेशन मोडत नाही असं त्रांगंडं असल्याने ह्या प्रकल्पाकरता मागितलेल्या अनेक मंजुर्‍या संबंधित अधिकार्‍यांना नसलेल्या अनुभवापोटी रखडायच्या. या प्रकाराला कंटाळून लवासाने स्पेशल प्लानिंग ऑथॉरीटी अंतर्गत ह्या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. ज्यामुळे आता नागरविकास खाते किंवा हिलस्टेशन कायद्यांतर्गत लवासाला प्रत्येक गोष्टीकरता मंजुरी मिळवत बसायला नको.

लवासा ह्या शहराकरता लागणारं पाणी-वीज लवासा स्वत:च उपलब्ध करणार आहे. पावसाचं पाणी जिरवणार आहे, साठवणार आहे. त्यापासून वीज निर्मिती देखील् करणार आहे. थोडक्यात पर्यावरणाचे भेडसावणारे यक्षप्रश्न सोडवायला लवासा आपल्या पद्धतीने मदत करणार आहे.

लवासाकरता अनिवासी भारतीयांची मोठ्ठी गुंतवणूक असल्याने , लवासाने कितीही म्हटलं तरी सामान्य मध्यमवर्गीय लवासापासून बिचकूनच राहील. एकूणच लवासातल्या सगळ्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, भारतात कोणी पैसा कमावताना दिसला की जनता आक्षेप घेते. एखाद्या केलेल्या कामाचे पैसे घेणे, मागणे म्हणजे जणू आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहाणे. म्हणजे जर पैसा हा मुद्दा घेतला तर कायमच मध्यमवर्ग आणि लवासा परवडू शकणारे श्रीमंत ही तफावत नेहमीच रहाणार. पण इतकं सगळं असूनदेखील लवासा प्रसारमाध्यमांच्या सुळावर का उभे ? रोज नवीन आरोप लवासावर केला जातोय पण समोर येऊन एकही राजकारणी हे म्हणून सांगत नाहीये की, ह्या प्रकल्पाला आम्ही मंजुरी दिली आहे. स्थानिक जनता खरी ? की लवासा खरे ? की ज्या राज्यकर्त्यांच अभय मिळाले ते राज्यकर्ते खरे ? तत्कालीन मुख्यंमत्र्यांचे अभय असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी मिळणे शक्य नाही. मग ते तत्कालीन मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी का ठेऊन बसले आहेत ?

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “लवासा

 1. सदर पुस्तकातले मुद्दे चूक की बरोबर हे ठरवण् सामान्य माणूस म्हणून खूप कठीण आहे. लवासा प्रकल्प म्हणजे काही जीवनावश्यक प्रकल्प नव्हे. की जो झाला नाही तर तर तिथली जनता उपाशी मरणारे! व्यक्तिशः शरद पवार किंवा देशातले तत्सम राजकारणी आपल्या सत्तेचा णी अधिकारांचा उघड उघड गैरफायदा घेत आहेत. त्याला सामान्य माणसाकडून विरोध असायलाच हवा. एकीकडे आर्थिक विकेंद्रीकरण आणि शेतकऱ्यांच्या हिताची भाषणबाजी करायची आणि दुसरीकडे लवासा, मद्यापासून दारू असली सोयीची धोरणे राबवायची… आणि वर हेच कसं योग्य हे आपण ऐकत बसायचं.
  लवासाच्या संदर्भातले काही मुद्दे असे
  १) लावासाचा भाग निसर्गदत्त सुंदर आहे (त्यात प्रकल्पाने भर घातली नाही.)
  २) हा प्रकल्प येण्यापूर्वीही तिथे माणसे राहत होती मात्र तरीही २००० साला पर्यंत तिथे धड रस्ताही नव्हता
  ३) आज महाराष्ट्रातला दृष्ट लागेल असा ४० किमी रस्ता पुण्यातून थेट लवासाला पोहचतो.
  ४) शिवाय यां रस्त्यासाठी सामान्य जनता रोज टोल भरते. यातील ९०% जनतेचा लावासाशी काहीही संबंध नाही. (यावर कायदेशीर युक्तिवाद आहेच की हा कोलाड-पुणे हाय-वे आहे पण वास्तविकतः कोलाड यां रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यापेक्षा लवासा रस्ता अधिक चांगला आहे. आणि लवासा रोड झाल्यावरच इथे टोलनाका झाला. असो.)
  ५) आर्थिक विकेंद्राकरण आणि शेतकऱ्यांचे हित जपणारे नेते लवासाला सांगून हा प्रकल्प भूपुत्रांच्या हिताचा कसा होईल यांसाठी झटायला हवेत. ते लांबच वर ( सुरूवातीला कोणताही विकास झाला नसल्याने अल्प किमतीत ती आदिवासींनी लवासाला विकली, पुढे विकास होऊ लागला तसा जमिनीचा भाव वधारू लागला, त्यामुळे लवासाने स्थानिकांना फसवलं अशी ओरड स्थानिकांनी सुरू केली. ) हे अशी स्वतःची सामार्थानेच करीत बसले आहेत.
  ६) बाकी पाणी आणि वीज हे मुद्दे आपल्या डोक्याच्या बाहेरचे आहेत. गेले कैक वर्षे अतोनात पावसाने महाराष्ट्रात बळी जातात पूर येतात तरी आमच सरकार आम्हाला वर्षभर पुरेसं पाणी देऊ शकत नाही. औद्योगिक क्षेत्रात अव्वल नंबर असूनही महारष्ट्रात पुरेशी वीज नाही. याला जबाबदार कोण? उत्तर नाही.

  अल्प किमत का असेना… आपले पुढारी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पैशाचा नेमका कसा विनियोग करावा याचे मार्गदर्शनही करीत नाहीत. उलट ज्यांना अधिक रक्कम मिळते त्याना पक्षात घेऊन पदे देतात आणि त्यांचा पैसा पक्षासाठी वापरतात. किंवा चार चाकी गाड्यांचे एजंट पेरून विल्हेवाट लावतात. (हा प्रकार लवासा इथे नव्हे तर अन्य एसईझेड प्रकल्पात सर्रास चालू होता .. आजही आहेच.)
  असो … आपण जय महाराष्ट्र म्हणत २०२० साली भारत विकसित होईल यां भ्रमात (त्यानीच दाखवलेल्या स्वप्नात ) रमत बसूयात.

  • तुमच्या-माझ्या सारख्या सर्वसामान्यांच्या मनात नेमके हेच सगळे प्रश्न आणि हीच चीड आहे. मुळातच लवासा हे पुस्तक पेड न्यूज सारखं पेड बुक आहे का हा प्रश्न मला पडतो, इतकी निळू दामल्यांनी लवासाची भलावण त्या पुस्तकाद्वारे केलेली आहे.

 2. L–Lalit Thapar
  A–Anuradha Desai
  V–Vinay Vitthal Maniyar
  A–Ajit Gulabchand
  S–Sadanand Sule
  A–Aniruddha Deshpande

 3. निळू दामले हे वरिष्ठ पत्रकार आहेत. भरवसा ठेवण्यालायकही आहेत…तरीही त्यांच्या नावातच दाम ले असल्यामुळे उगाच शंका वाटत राहाते की त्यांनी ही खरोखरची माहिती दिलेय/बाजू मांडलेय की अजून काही. शरद पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणातले एकूण वजन पाहता ते कुणालाही,कधीही विकत घेऊ शकतात..आपल्या विरोधकांना सहजपणाने अंगाखांद्यावर खेळवतात हे आपण पाहतोच आहोत.
  आदर्शप्रमाणेच तथाकथित विरोधकांना गप्प बसवण्यासाठी लवासात जागाही दिल्या असतील…आज ना उद्या येतील ती प्रकरण बाहेर…शरद पवार म्हणजे अंगाला तेल चोपडलेला मल्ल असे कुणीसं म्हटलंय तेच खरं…इतक्या सहजासहजी पकडीत येणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: