5 प्रतिक्रिया

गुगल+ :- भाग १


साधारण दीड महिन्यापूर्वी गूगलने फेसबुकला टक्कर म्हणून गूगल+ ही सेवा सुरू केली. सगळ्यात पहिल्यांदा फेसबुकच्याही आधी.गूगलने ऑर्कुट सुरू केलं होतं. त्याला जगभरातल्या जनता जनार्दनाने डोक्यावर घेतले. काही काळ ऑर्कुट ने जनमानसावर राज्य केलं पण फेसबुकच्या येण्याने सगळं मुसळ केरात गेलं. त्याला पर्याय म्हणून गूगल ने वेव्ह आणलं आणि त्यावर बसून स्वत:च हेलकावे खाल्ले कारण; त्या वेव्ह च्या निर्मात्याशिवाय; ते प्रकरण काय आहे….हे कुणाला कळलं असेल तर शपथ ! त्यावर उतारा म्हणून गूगलने बझ आणलं. हा प्रकार त्यातल्या त्यात बरा होता. एक खाजगी किंवा सार्वजनिक कट्टा असं याचं स्वरूप आहे. पण फेसबुकच्या प्रभावापुढे हे ही फिकं पडलं. आता याचीच सुधारीत आवृत्ती म्हणून गूगलने गूगल+ सुरू केलंय. त्याला जी+ असंही म्हटलं जातं.

जी+ ने प्रवेश केला खरा, पण त्याकरता फक्त काही ठराविक निमंत्रितांनाच त्यात शिरकाव करू दिला. झालं ! अटकाव केला; की नेमकं काय चालू आहे हे बघायची उत्सुकता जास्तच वाढते या नियमाला जी+ तरी अपवाद कसं असेल ? त्यामुळे प्रत्येकालाच जी+ नेमकं काय आहे ? त्यात काय सोयी आहेत ? ते फेसबुकपेक्षा बरं आहे की वाईट ? हे बघायची इच्छा होती. मग प्रत्येकजण दुसर्‍याकडे निमंत्रणाची भीक मागू लागला. आणि सरतेशेवटी जी+ मध्ये प्रवेश मिळवला.

स्वच्छ पांढर्‍या पार्श्वभूमीवर, मोजके टॅब्ज आणि मोजके दुवे. फेसबुकसारखे जाहिरातींनी न भरलेले, कोणत्याही ऍप्स च्या आमंत्रणांनी न सजलेले असे साधेसेच रूप. वरच्या बाजूला मोजून चार टॅब्ज. एक तुमच्या स्वत:च्या माहितीकरता राखून ठेवलेला, दुसरा तुमचे फोटोआल्बम्स लावण्याकरता, तिसरा तुमच्या वर्तुळातल्या मित्र-मैत्रिणींनी दिलेले लेख,दुवे,फोटो,व्हिडियोज पाहण्याकरता आणि चौथा….. खुद्द तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्हाला हव्या त्या वर्तुळात घेण्याकरता. उजवीकडे दोन टॅब्ज एक मित्रमैत्रिणींना आमंत्रण द्यायला आणि दुसरा म्हणजे एकाच वेळी आपल्या १० मित्र-मैत्रिणींशी वेब कॅमेराच्या साहाय्याने प्रत्यक्ष भेटू-बोलू शकण्याकरता. या सोयीमुळे भल्या-भल्यांच्या उड्या जी+ वर पडल्या. आठवड्याभरात सगळीकडे फेसबुकला जी+ चा  देधक्का सारख्या इमेज फाइल्स फिरायला लागल्या.

पण हाय रे दैवा ! फेसबुकची सवय असलेल्यांना जी+ मधली झुंबड काही लक्षात येईना. फेसबुकवरच्या त्रासदायक जाहिराती आणि ऍप्स जरी इथे नसल्या तरी तिथल्यासारखे ग्रुप्स, पेजेस आणि वाढदिवस रिमाइंडर्स देखील इथे नाहीत याची रुखरुख होतीच. फेसबुकवर माहितीच्या गोपनीयतेत सातत्याने बदल होत असतात, पण तरी देखील कोणी धाडकन येऊन तुम्हाला त्यांच्या वर्तुळात ओढू शकत नाही किंवा तुमच्या वर्तुळात घुसू शकत नाही. खरं तर असं जी+ मध्येही होत नाही. पण……

इथला सर्कल ( वर्तुळ) हा भाग समजायला थोडा किचकट वाटू शकतो. कोण कोणाबरोबर पाठशिवणीचा खेळ खेळतंय हे कळायला जरा वेळ लागतो. त्याचप्रमाणे एकचव्यक्ती एकापेक्षा जास्त वर्तुळात सामावून घेता येत असल्याने , कोणत्या व्यक्तीला….कोणत्या वर्तुळात ठेवावं…कोणती पोस्ट कोणत्या वर्तुळाशी शेअर करावी याबाबत जरासंभ्रम निर्माण होऊ शकतो. आपल्या कोणत्याही वर्तुळाशी संबंधित नसलेल्या पोस्ट्स पब्लिक असतात.त्यामुळे  कोणीही त्या वाचू शकतं, री-शेअर करू शकतं, त्यावरप्रतिक्रिया देऊ शकतं. अर्थात आपल्या पोस्ट्स री-शेअर करणं किंवा त्यावर प्रतिक्रिया घेणं आपण नाकारू शकतो.

जी+ चा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे…..एकदा टाकलेल्या पोस्टमध्ये….अगदी दिलेल्या प्रतिक्रियेतदेखील पुन्हा जाऊन बदल करता येतो. अगदी कधीही आणि कितीही वेळा. शिवाय स्टेट्समधील एखादा मजकूर ठळकईटालिक्स किंवा लिहून खोडता येतो; जे फेसबुकमध्ये अजिबात शक्य नाहीये.

अर्थात जी+ मध्ये त्रुटीही आहेतच.

मुख्य म्हणजे जी+ हे फक्त जीमेलाचे खाते असणार्‍यांनाच वापरता येते.फेसबुकचे तसे नाही, कोणत्याची ईमेल सेवेचा खातेधारक असला तरीही फेसबुक ची सेवा वापरता येते.

गूगलच्याच क्रोम मध्ये जी+ करता अनेक ऍड-ऑन्स तयार आहेत आणि रोज नवीन ऍड-ऑन्सची भर पडत असलीतरी इतर न्याहाळकां( ब्राउझर) मध्ये जी+करता अजून तरी काही ऍड-ऑन्स तयार झालेली नाहीत. त्यामुळे कोणत्याही ब्राउझरमध्ये फेसबुक हाताळणे सोपे जाते त्याप्रमाणे क्रोम शिवाय इतर कोणत्याही ब्राउझरमध्ये जी+वापरणे सोपे जात नाही.

पुढच्या भागात जी+च्या क्रोम मधील काही ऍड-ऑन्स विषयी लिहीन. तूर्तास इतकेच पुरे.

मला जी+वर इथे भेटू शकता.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “गुगल+ :- भाग १

 1. Dear sir ,
  Your Article is so nice ,impresive.
  Now, we all friends knows What is Actual Google Plus……

  thanks,
  President,
  winner wings!
  magic to win!!

 2. छान लिहिलंय… एकदम माहितीपूर्ण.

  जी+ ने खूप त्रास दिलाय, त्यामुळे ते बंद केलंय. बिटा वर्जन आहे अजुन, एकदा फुल्लफ्लेज्ड सुरु झालं की, विचार करेन..:)

 3. अरे वा! मस्त!
  तुझ्या अभ्यासूपणाची कमाल आहे.
  मला नाही इतकं सविस्तर लिहिता/सांगता येणार!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: