7 प्रतिक्रिया

अण्णांचे आंदोलन…आणि राजकारणी नेतेमंडळी


काल पुन्हा एकदा स्वातंत्र्य सैनिक अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल बिला साठी आंदोलन छेडले आणि १२० कोटी भारतीय जनतेला आवाज केले. जणू ही भारताच्या स्वातंत्र्याचीच लढाई होती की काय असे वाटले. फरक फक्त इतकाच होता की ते स्वातंत्र्य परकीयांकडून मिळवावे लागले आणि हे मात्र लाचखोर, देश विकायला निघालेल्या, भ्रष्ट स्वकीयांकडून मिळवावे लागत आहे.अण्णांना सरकारने अटक केली……त्यांनी काय कुणाचा खून केला होता की दंगली घडवल्या होत्या ? अहिंसेच्या मार्गाने शांततेने त्यांचे आंदोलन चालू होते. सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या कारण निवडणुका जवळ येत आहेत आणि या वर्षात सत्ताधार्‍यांचे दर दिवशी घोटाळे बाहेर पडत आहेत. जनता एकीकडे हालात जगत असताना…..राजकारण्यांची पोटं भरतच नाहीत अशी स्थिती आहे.त्यामुळे साहजिकच आपणच निवडून दिलेल्या सरकारपासून त्रासलेल्या जनतेने अण्णांना उदंड प्रतिसाद दिला.त्यात कहर म्हणजे अण्णांना अटक करून एक चूक सरकारने केली तर दुसरी चूक म्हणजे त्यांच्यासारख्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्‍या नेत्याची रवानगी भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक केलेल्या राजकारणी लोकांना जिथे ठेवले आहे…त्या तिहार तुरुंगात केली. लोकशाही ची याहून वेगळी शोकांतिका ती काय असेल ?

संध्याकाळी पश्चातबुद्धी होऊन सरकारने अण्णांना सोडून द्यायचे ठरवले पण कधी ? तर पंतप्रधानांनी त्यांचे टिनपाट युवराज राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यावर ! आपला हुद्दा, वय, शिक्षण याचा पंतप्रधानांना विसर पडावा ? साधे शिक्षण पूर्ण करता न आलेल्या या टिनपाट राहुल गांधीची…..रग्गड पदव्या असलेल्या, वयाने ज्येष्ठ आणि अनुभवाने श्रेष्ठ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी हुजरेगिरी करावी ? या टिनपाटाला….. अण्णा हजारे कोण ? कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात लढले ? हे तरी माहिती असेल का ? ही इटालियन बाई आणि तिचा हायब्रीड मुलगा यांच्या तालावर अजून किती नाचायचे आपण ?

जन लोकपाल बिल नेमकं काय आहे ? आणि एकही राजकीय पक्ष त्याला उघडपणे पाठींबा का देत नाही ? हे वाचा….

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

7 comments on “अण्णांचे आंदोलन…आणि राजकारणी नेतेमंडळी

  1. भारतीयांना अध्यक्षशाहिच परवडेल.

Comment navigation

Newer Comments →

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: