यावर आपले मत नोंदवा

गणपतीssबाप्पाsss मोरयाssss


मंडळी, सध्या गणपतीची धावपळ असल्याने आणि इतर कामात अडकल्याने देखील बरेच दिवस काही लिहिता आलेले नाही. तुम्ही वाचक मंडळी मोठ्ठ्या अपेक्षेने इथे येता आणि इथे नवीन काहीच नाही या निराशेने परत जाता, याची कल्पना मला आहे. येत्या काही दिवसातच हा ब्लॉग ५ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण करेल……त्यावेळी बहुदा मी इथे नसेन कारण….. अर्थातच पुढचे सहा दिवस घरातल्या गणपती-गौरींचे लाडकोड पुरवण्याचे. आमच्या गौरी-गणपतीचे फोटो मागाहून इथे पोस्ट करीनच पण तूर्तास नवीन वाचकांकरता, २००६ साली आमच्या घरातल्या गौरी-गणपतीबद्दल इथेच लिहिलेली पोस्ट नव्याने जोडते आहे.

घरचा गणपती १

या वर्षी मी म्हटल्याप्रमाणे ब-याच सार्वजनिक मंडळांनी आणि घरी गणपतीची स्थापना करणा-यांनी पुष्कळ ‘इकोफ्रेंडली’ पणा दाखवला. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ठाणे , पुणे यांसारख्या शहरांत गणेश विसर्जनाकरता काही ठिकाणी कॄत्रिम तलावही तयार करण्यात आले होते. गेले १० दिवस …Continue reading →

घरचा गणपती २

माझ्या सगळ्यात धाकट्या मामाने त्याचे लग्न झाले त्या वर्षापासून घरी दीड दिवस गणपती आणायला सुरूवात केली. त्याने लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाल्यावर ते बंद केले. मलाही खूप वाटायचे की आपल्या घरी सुध्दा गणपती आणावा. अर्थात त्याचे सोवळे – ओवळे किती … Continue reading →

घरचा गणपती ३

देशस्थ असल्याने आमच्या गौरी मराठमोळ्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, नऊवारी साडीतल्या असतात. काहीजणांकडे अशी प्रथा आहे की नविन साडया घेऊन गौरींना त्या नेसवून मग घरातली बाई त्या स्वतः नेसते. पण आमच्या कडे मात्र गौरींच्या साडया इतर कोणी वापरत नाही. कारण दरवर्षी … Continue reading →

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: