2 प्रतिक्रिया

ई-दिवाळी अंक २०११

मराठी माणसाला दिवाळीत दिवाळी अंकांशिवाय चैन पडत नाही. पूर्वी घरोघरी काही विशेष दिवाळी अंक विकत घेऊन वाचले जायचे आणि उरलेले अर्थातच वाचनालयातून आणून वाचले जायचे. काळाप्रमाणे आता तंत्रही बदलले आहे. किंडलने आणलेल्या क्रांतिने एका छोट्याश्या पेटीत शेकड्याने पुस्तके एकाच वेळी साठवायची सोय झाली आणि महाजालावर ई-पुस्तकांचे, ई-मासिकांचे, ई-अंकाचे पेवच फुटले. जालरंग प्रकाशन हे अश्याच एका ई प्रकाशनाचे नाव. काही हौशी साहित्यिक मंडळींच्या सहय्याने आकाराला आलेल्या या प्रकाशनाने आत्तापर्यंत २ वर्षात तब्बल ९ ई-अंक प्रकाशित केलेले आहेत. १० वा अंक दीपज्योती २०११ हा त्यांचा दिपावली विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या आणि चाखा हा जालरंगने तयार केलेला साहित्यिक फराळ. आणि हो, या अंकाची सजावट, आवश्यक ते  तांत्रिक बदल मीच केलेले आहेत. त्या निमित्ताने बरेच काही उपयुक्त शिकता आले हे देखील नसे थोडके.यावर्षीचे इतर ई दिवाळी अंक. जसे जसे प्रसिद्ध होतील तस तसे इथे माहिती देत राहीनच.

रेषेवरची अक्षरे
२०११

ऐसी अक्षरे २०११

 सृजन ई-दिवाळी २०११
Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “ई-दिवाळी अंक २०११

 1. दिवाळी अंक विश्वकोश साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

  जयसिंगपूर / प्रतिनिधी
  मराठी संस्कृतीला भरभरून देणाऱ्या दिवाळी अंकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्या करिता व दिवाळी अंकांच्या वैश्विक पातळीवरील संवर्धनासाठी जयसिंगपूर येथील “अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज” च्यावतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात. 103 वर्षाची दिवाळी अंक परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतिक आहे. मनोरंजनापासुन सुरू झालेला दिवाळी अंकाचा प्रवास आज वेगवेगळ्या विषयावर विशेष अंक काढण्या पर्यंत आलाय. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ मध्ये ‘मनोरंजन’ मासिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला आणि आजच्या दिवाळी अंकाच्या समृद्ध वाटचालीला सुरुवात झाली. दिवाळी अंकाचा हा प्रवास अतिशय समृद्ध असा आहे. दिवाळी अंकाची परंपरा अखंड राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या सदहेतूने दिवाळी अंक विश्वकोश ची निर्मीती करण्यात येणार आहे.

  अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज च्यावतीने आयोजित विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धे च्या यशस्वी आयोजन नंतर अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज च्यावतीने दिवाळी अंक विश्वकोश मंडळाची स्थापना प्रसिद्ध कवी अनिल धुदाट (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली केली असून, साहित्य विश्वातील सर्व विक्रम तोडणारा “दिवाळी अंक विश्वकोश” ची निर्मीती प्रधान संपादक राज धुदाट (पाटील) यांच्या मार्गदर्शना खाली केली जाणार असून संपूर्ण जगाला दिवाळी अंक विश्वकोशाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  माणसांची वेडं अनेक आहेत. त्यातलंच एक वेड दिवाळी अंकाचं. मराठी साहित्य व्यवहाराचं ते एक विशेष रूप आहे. असा उपक्रम इतरत्र कुठेही दिसत नाही. बंगालीत दुर्गापूजा निमित्ताने अंक निघतात; पण किती? हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. कॅनडा, अमेरिका, सिंगापूर, नवी दिल्ली, सह महाराष्ट्र, कर्नाटक, गोंवा, गुजरात इत्यादी राज्या मधून मराठी आणि गुजराती भाषे मधून सुमारे ८०० पेक्षा अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. (ही अतिशयोक्ती नसून आमच्या संस्थे कडे 800 दिवाळी अंकांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे) त्यामध्ये आरोग्यविषयक, करमणूकपर, कृषि, काव्य, ज्योतिष, धार्मिक, पर्यटन, पर्यावरण, पाकशास्त्र, बालसाहित्य, ब्रेल लिपीतील दिवाळी अंक, व्यापार, व्यवस्थापन, राजकीय, वास्तुशास्त्र, ज्ञान – विज्ञान, शिक्षण, संत साहित्य – आध्यात्मिक, स्त्री विषयक, साहित्य, आदी व अन्य विषयावर दिवाळी अंक निघतात. दिवाळी अंकांमध्ये सर्व प्रकारचे वाङ्मयीन साहित्य वाचण्यास मिळत असल्याने ते वाचकांच्या पसंतीसही उतरत आहेत. मराठी संस्कृतीची दोन वैशिष्टये सांगितली जातात एक म्हणजे नाटक आणि दुसरे म्हणजे दिवाळी अंक. केवळ एखाद्या सणाच्या निमित्ताने फक्त मराठीतच विशेषांक काढले जातात. त्या मुळे ही समृद्ध परंपरा आजही जोपासली जाते.

  दिवाळी अंक हे मराठीचे वैशिष्ट्य म्हणूनच शतकभर जोपासले गेले. अनेक वर्ष दिवाळी अंक म्हणजे पाच दहा कथा, एखाद दुसरी कादंबरी, पाचपन्नास कविता, व्यंगचित्रे, सामाजिक प्रश्नांची चर्चा, गाजलेल्या वा चर्चेतल्या व्यक्तींच्या मुलाखती, पाककला-शिवणकलेचे मार्गदर्शन, स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग आणि काही प्रमाणात पर्यटन, किशोरवयीन मुलांसाठी धाडसी कथा वा वर्तणुकीचे सल्ले, पेन्शनरांची सुखदु:खे, आकर्षक मुखपृष्ठ अशी चौकट जणू घट्ट ठरून गेल्याचे पहावयास मिळायचं माञ काळ बदलत गेला तशी दिवाळी अंकानीही कात टाकली आणि बदलत्या प्रवाहाबरोबरच अंकात बदल व्हायला लागले. दिवाळी अंकाच्या या बदलाच लेखकांनी स्वागत केलंय.

  दिवाळी अंकांची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. मुंबई आणि पुण्यापुरती दिवाळी अंकांची चळवळ मर्यादित राहिलेली नाही. दिवाळी अंक आता अगदी छोट्या-छोट्या शहरांतूनही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. या अंकातही दर्जेदार साहित्य देण्याचा प्रयोग केलेला असतो. एवढी वर्षे (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे. कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे,. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत. त्याचबरोबर बदलत्या तंत्रानुसार अनेक प्रकाशक आपला अंक इंटरनेटच्या विश्वात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगणकाच्या युगात दिवाळी अंक मागे नाहीत ही एक आनंदाची बाब आहे. २५ – ३० ई-दिवाळी अंक या वर्षी महाजालावर उपलब्ध झालेले आहेत. हे सर्व दिवाळी अंक संपूर्ण जगभरातून कोणालाही अगदी कोठूनही मोफत वाचता येतात व हवे तर हे सगळी दिवाळी अंक मुद्रित करून घेता येतात. ई-दिवाळी अंक ही मराठी साहित्य संस्कृती प्राप्त झालेली एक देणगी आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांच्या बाबतीत जेवढे प्रयोग केले गेले तेवढे अन्यत्र कमीच असतील. त्या मुळे आजही लोक दिवाळी अंक खरेदी करतात. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक बाब झाली आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरुप त्यात बदल झाला आहे.

  साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांचे स्थान मोठेच आहे. अनेक नामवंत लेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात दिवाळी अंकांमधूनच केली आहे, हे विसरता येणार नाही. मराठी साहित्यामध्ये दिवाळी अंकांचा प्रवाह कमी झाला नसून त्याचे स्वरूप बदलले आहे. केवळ कथा, कादंबऱ्या, कविता इतक्यापुरतेच हे अंक मर्यादित राहिले नसून अनेक विषयांना ते स्पर्श करीत आहेत. साहित्य चळवळ पुढे जाण्यासाठी दिवाळी अंकांचा वाटा मोठा आहे, यात शंका नाही. दिवाळी अंकांचा उपक्रम कितीही अडचणी आल्या तरी अनेकजण चालवत असतात. मराठी दिवाळी अंक आता सातासुद्रापार गेलेत . अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्विर्त्झलंड, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथे दिवाळी अंकांना सर्वात जास्त मागणी आहे. अंध लोकांसाठी ब्रेल लिपीतील दिवाळी अंक हे त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण ठरले आहेत. अंध मुलांना साहित्य वाचायला मिळावे. त्यांची जगाशी ओळख व्हावी, या विचाराने हे अंक ब्रेल लिपीत काढण्यात येतात, मुख्य म्हणजे पूर्वीसारखे हे काम किचकट राहिलेले नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने असे अंक काढणे सहज शक्य झाले आहे.

  सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या किमती ११ रुपया पासून ६०० रुपया पर्यंत आहेत, तर पृष्ठे ८ पासून ४८० पर्यंत आहेत. काही दिवाळी अंकांची छपाई सर्वोत्तम असून, कागदही चांगल्या प्रतीचा वापरला आहे. मराठी साहित्यात दिवाळी अंकांना अनन्य साधारण महत्व आहे. पण अनेक वेळेस असे लक्षात येते कि ज्या पद्धतीने दिवाळी अंकांचा गौरव अपेक्षित होता तो होत नाही ही खेदाची बाब आहे. दिवाळी अंकांना जागतिक स्तरावर पोहचवण्या साठी व सर्व दिवाळी अंकांची इत्यंभूत माहिती वाचक, ग्रंथालय, लेखक, कवी, वितरक, यांना उपयोगी होईल असा विश्वविक्रमी खंड ग्रंथ रूपाने प्रकाशित करत आहोत.

  दिवाळीला जशी नवीन कपडे, सोने, वस्तू, घरांची खरेदी ठरवून केली जाते तसेच दिवाळी अंक आवर्जून विकत घेणारे वाचकही असतात. एरवी पुस्तकांना हात न लावणारे देखील दिवाळीच्या दिवसात एखादा अंक वाचतात. तर दर्दी वाचकांचा दिवाळी अंकांचा ब्रॅण्ड ठरलेला असल्यामुळे त्या ब्रॅण्डशिवाय त्यांची दिवाळी पूर्णच होत नाही. १०३ वर्षाची गौरव शाली परंपरा असलेले दिवाळी अंक हे वाचन संस्कृतीचे अविभाज्य घटक बनले आहेत. परंतु दर वर्षी नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या शेकडो दिवाळी अंकांची साधी यादी सुद्धा कुठेच उपलब्ध नाही, जी सूची काही ठराविक दिवाळी अंक वितरक वाचनालयाला पाठवितात ती सुद्धा परिपूर्ण नसते. अनेक वेळा काही ठराविक दिवाळी अंकच त्या सूची मध्ये असतात त्यामुळे अनेक नाविन्य पूर्ण व वेगळे दिवाळी अंक वाचका पर्यंत पोहचू शकत नाहीत. या करिता अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज ने दिवाळी अंक विश्वकोशची निर्मीती करण्याचे ठरविले आहे. हा एक विश्वविक्रमी उपक्रम असून सर्वच स्तरामधून त्याचे स्वागत होत आहे.

  या दिवाळी अंक विश्वकोश मध्ये दिवाळी अंक, स्थापना, कमाल मूल्य, किमान मूल्य, कमाल पृष्ठे, किमान पृष्ठे, पुरस्कार / सन्मान, वेगळेपण, प्रकाशन संस्था, संस्थापक, मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, प्रकाशक, मुद्रक, मुद्रणालय, वितरक, नामवंत लेखक, नामवंत कवी, मुखपृष्ठ, मुखपृष्ठा वरील व्यक्ती इत्यादी प्रमुख विभाग असतील व त्या अनुषंगाने संबंधित दिवाळी अंकांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल. हा एक संग्राह्य विश्वकोश ठरावा व सर्वांनी त्याचा एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करावा असा निर्मितीकार डॉ. सुनील पाटील यांचा प्रयत्न आहे.

  भारतीय संस्कृतीमधील शिखर उत्सव असलेला दीपावलीचा सण आणि त्यानिमित्ताने समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे दिवाळी अंक आपल्या संस्कृतीचा एक भाग बनून राहिले आहेत. तथापि त्याची दाखल घेणे, मूल्यमापन करणे व प्रोत्साहन देणे या बाबी तितक्याच अवघड आहेत. तथापि अनेक संस्था हे महत्वाचे काम निष्ठेने, निस्वार्थी भावनेने करत आहे ही गोस्ट आजकालच्या Money Oriented जमान्यात केवळ दखलपात्र अशीच आहे. ३० – ३५ शासकिय व निमशासकिय संस्था, संघटना, मंडळे आणि ग्रंथालये यांच्या द्वारा दिवाळी अंकांच्या स्पर्धा व प्रदर्शने आयोजित केली जातात. परंतु संबंधित आयोजका बाबत माहिती नसल्या मुळे अनेक संपादक / प्रकाशक आपला दिवाळी अंक त्यांच्या पर्यंत पोहचवू शकत नाही, ही अडचण समजून या दिवाळी अंक विश्वकोशा मध्ये दिवाळी अंक स्पर्धा व प्रदर्शने आयोजित करणारयाची सविस्तर माहिती दिलेली असेल याचा सर्वाना फायदा होईल.

  ज्या संपादक / प्रकाशक यांना या दिवाळी अंक विश्वकोश मध्ये आपल्या दिवाळी अंकांची माहिती प्रसिद्ध करावयाची इच्छा असेल त्यांनी अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर – 416101, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२३२२ २२५५०० / ९९७५८७३५६९ किंवा alishaadvertisingagencies@gmail.com वर संपर्क साधावा. असे आवाहन अलिशा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज च्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आलेले आहे.

 2. दिवाळी अंक विश्वकोश साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: