4 प्रतिक्रिया

सबकुछ पिडिएफ


पिडिएफ स्वरूपातल्या फाईल्स वाचकांना नवीन नाहीत. एखादी माहिती समोरच्या व्यक्तिला विशिष्ट स्वरूपातच दिसू द्यायची असेल, किंवा त्याने त्यात बदल करून स्वत:च्या नावावर खपवू नये असे वाटत असेल तेव्हा या पिडिएफ स्वरूपाचा सर्रास वापर केला जातो. पण प्रत्येकवेळी आपल्याकडे पिडीएफ तयार करण्याची प्रणाली उपलब्ध असेलच असे नाही. त्यावेळी काही ऑनलाईन संकेतस्थळांचा वापर करून आपण हे काम करू शकतो. अश्याच काही पिडिएफ संबंधित संकेतस्थळांची ही माहिती….

जॉलीप्रिंट – ब्राऊजर मधील एक साधीशी बुकमार्कलेट, कोणत्याही नोंदणीची गरज नाही. कोणतीही प्रणाली संगणकावर उतरवून घ्यायची गरज नाही. वेबपेजेस आणि गुगल रीडर मधील लेख प्रिंट करता येतील अश्या क्षमतेची पिडिएफ बनवते. तयार पिडिएफ संगणकावर उतरवून घ्यायची सोय अथवा इतरत्र पाठवण्याची सोय.

प्रायमोपिडिएफ – ऑनलाईन पिडिएफ तयार करून मिळते. १० एम्बी पर्यंतची आपली फाईल किंवा संकेतस्थळाच्या पानाचा दुवा द्यायचा, आपला विरोप (ईमेल) पत्ता द्यायचा की त्या पत्त्यावर आपल्याला आपली तयार पिडिएफ पोचती होते.

पिडिएफ टू वर्ड – आपल्याकडे पिडिएफ तयार आहे पण जर ती आपण स्वत: तयार केलेली नसेल आणि त्यात काही बदल जर आपल्याला करायचे असतील तर ह्या संकेतस्थळावर आपल्यकडची मूळ पिडिएफ चढवायची, आपला विरोपाचा पत्ता द्यायचा की मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या स्वरूपात मध्ये आपल्याला फाईल मिळते.

आय वेब टू प्रिंट – एखाद्या संकेतस्थळावरची पृष्ठे पिडिएफ स्वरूपात मिळवायला अनेक प्रणाल्या आहेत, वर उल्लेखल्या प्रमाणे अनेक संकेतस्थळे देखील आहेत. पण ती पिडिएफ बनवताना आपल्याला पिडिएफच्या दृष्य स्वरुपात बदल करायला फारशी मुभा नसते. पण हे संकेतस्थळ मात्र आपल्याला कागदाचे माप, आडवे-उभे ,रंगीत की साधे, चित्रे-पार्श्वभूमी निवड करायची संधी देतं. कोणत्याही नोंदणीची, विरोपाच्या पत्त्याची गरज नाही, अमर्यादीत वापर असे याचे स्वरूप आहे. एचटीएमएलटूपिडिएफ चा वापर करून देखील एखादे वेब पृष्ठ आपण पिडिएफ मध्ये परावर्तित करू शकतो.

पिडिएफ एस्केप – ऑनलाईन पिडिएफ रीडरच नाही तर पिडिएफ मध्ये बदल करू शकणे(एडीटर), ऑनलाईन पिडिएफ अर्ज भरणे( फॉर्म फिलर), अर्ज तयार करणे(फॉर्म डिझायनर), पिडिएफ वर नोंदी करणे(ऍनोटेटर), फाईलची व्याप्ती (साईज) कमी करणे.. अश्या अनेक खुब्या या संकेतस्थळावर आहेत. कुठलीही प्रणाली संगणकावर उतरावायची गरज नाही, कुठेही नोंदणी करायची गरज नाही, संकेतस्थळाची कोणतीही खूण (वॉटरमार्क) पिडिएफवर दिसणार नाही. क्रोकोडॉक देखील काहीसे अश्याच प्रकारचे संकेतस्थळ आहे.

आय लव्ह पिडिएफ – ८ एम्बी ची एक फाईल अश्या जास्तीत जास्त १० फाईली एकत्र जोडणे किंवा जास्तीत जास्त १० एम्बीच्या पिडीएफ मधील पाने वेगळी करणे यासारखी कामे हे संकेतस्थळ लीलया करते.

पिडिएफ अनलॉक – बर्‍याचदा आपल्याला हवी असलेली एखादी पिडिएफ छापण्याचा (प्रिंट) किंवा त्यातला मजकूराची प्रत( कॉपी/पेस्ट) करण्याचा आपल्याला अधिकार नसतो. किंवा आपल्याकडे असलेल्या पिडिएफ फाईलला पासवर्ड दिलेला असतो. पिडिएफ उघडण्यापासून ते छापण्यापर्यंतचे प्रतिबंध नको असतील अश्या वेळी हे संकेतस्थळ उपयोगी पडेल.५ एम्बी पर्यंतची पिडीएफ फाईल इथे अपलोड करून आपला कार्यभाग आपला साधता येऊ शकतो. फ्रि माय पिडिएफ या संकेतस्थळाचा वापर देखील याकरता करता येईल.

डिजीसाईनर – पिडिएफ वर डिजिटल सही टाकण्याकरता याचा वापर करता येतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईनही वापरता येईल.

फ्लॅश पेज फ्लिप – साध्या पिडीएफ फाईल चे रुपांतर पेज उलटवू शकणार्‍या फ्लॅश पिडिएफ मध्ये करण्याकरता हे संकेतस्थळ वापरता येईल. जास्तीत जास्त १० एम्बी ची फाईल एका वेळी वापरता येईल.

पिडिएफसीव्ही – नोकरीकरता अर्ज करताना ठिकठिकाणी आपली माहिती आपल्याला पाठवावी लागते. बर्‍याचदा असा अनुभव येतो की, आपण कष्टाने व्यवस्थित तयार केलेली वर्ड फाईल जेव्हा आपण ऑनलाईन साठवतो किंवा इतरांना पाठवतो तेव्हा त्याचे दृष्य स्वरूप बदलते. नोकरीकरता म्हणून पाठवलेली अशी माहिती पाहिली की उमेदवाराबद्दलचे प्राथमिक मतच वाईट होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून या संकेतस्थळावरची सोय वापरता येईल. आपण फक्त माहीती भरायची, त्यांनी दिलेल्यापैकी टेम्पलेट निवडायची की आपला बायोडेटा पिडिएफ स्वरूपात तय्यार !

पिडिएफ कम्प्रेस – पिडिएफ फाईलची व्याप्ती(साईज) कमी करण्याकरता निविया संकेतस्थळावरची ही सोय वापरता येईल. याच संकेतस्थळावरची पिडिएफ रिसाईज ही सोय वापरून फाईलचे आकारमान बदलता येऊ शकते. जास्तीत जास्त ५ एम्बी ची फाईल याकरता वापरता येऊ शकते.

पिडिएफटूजेपिजी – बर्‍याचदा असेही होऊ शकते की, आपण मारे पिडिएफ तयार करून पाठवली पण समोरच्या व्यक्तिकडे पिडिएफ वाचण्याची सोय नाहीये किंवा इंटरनेटवरून तशी प्रणाली उतरवून घ्यायची सोय देखील नाहीये. अश्या वेळी काय कराल ? अश्या वेळी पिडिएफ फाईलचे प्रत्येक पृष्ठ पानागणिक तसेच्या तसे चित्ररूपात बदल्याची सोय हे संकेतस्थळ देते. ती चित्रे आपण कोणालाही पाठवली की पिडिएफ वाचता येण्याची सोय नसली तरी काही बिघडत नाही.

वॉटरमार्क – अनेकदा आपण घाईघाईत पिडिएफ तयार करतो आणि मग लक्षात येतं की अरेच्च्या ह्या पिडिएफ वर ती आपण तयार केली असल्याचा/ आपल्या मालकीची असल्याचा काहीच पुरावा नाही. अश्या वेळी आपलं एखादं ओळखचिन्ह पटकन टाकायचे असल्यास पिडिएफ एड या संकेतस्थळावरची वॉटरमार्क पिडिएफ ही सुविधा वापरून हे काम करता येईल. क्वचित एखाद्या पिडिएफ मध्ये असलेले दुवे जर काम करत नसतील तर ते बदलण्याकरता देखील याच संकेतस्थळावरची रिब्रॅण्ड पिडिएफ ही सुविधा वापरता येईल. जास्तीत जास्त २० एम्बीची फाईल वापरता येईल, पण या दोन्ही सुविधांचा वापर करून तयार केलेल्या पिडिएफवर या संकेतस्थळाचे ओळखचिन्ह मात्र असेल.

पिडिएफटूईपब – आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात. ३ जी मुळे इंतरनेट चा फोनवरचा वापर देखील वाढलेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापल्या प्रणाल्या तयार करून त्यायोगे फोन चा वापर संगणकाला पर्याय म्हणून कसा करता येईल हे पाहिले आहे. स्मार्ट फोन्सवर वापरण्याकरता अडोबचे पिडिएफ रीडर उपलब्ध आहे. पण फोनवर पिडीएफ वाचणे काहीसे कटकटीचे असते त्यापेक्षा ईपब ह्या प्रमाणित ईबुक स्वरूपात पुस्तके वाचणे केव्हाही सोप्पे. आपल्याकडे असलेली पिडिएफ ईपब स्वरूपात परावर्तित करायची झाल्यास ह्या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

स्कॅनर – समजा आपण प्रवासात आहोत , ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर आहोत, एखाद्या मिटींग मध्ये आहोत. आपल्या हातात एखाद्याचे बिझिनेस कार्ड आहे, मिटींगमध्ये प्रेझेंटेशन किंवा समोरच्या फळ्यावर काही आकृत्या आहेत ज्या आपल्याला पुढेमागे उपयोगी पडण्याची शक्यता आहे. अश्या वेळी हे संकेतस्थळ उपयोगाला येते. आपण मोबाईलवर फोटो काढून ठेऊन, विरोपाने त्यांना पाठवला की उलट टपाली आपल्या अशी एक पिडीएफ मिळते ज्यात आपण मजकूर शोधू शकू.

पिडिएफ प्रोटेक्ट – यापूर्वी आपण पिडिएफ ला दिलेला पासवर्ड कसा काढायचा हे पाहिले. पण आता जर आपल्याच एखाद्या पिडिएफला आपल्याला पासवर्ड द्यायचा असेल तर हे संकेतस्थळ वापरून आपण ते करू शकतो. अर्थात वर दिलेल्यापैकी पर्याय जर समोरच्या व्यक्तिला देखील माहित असतील तर हा पासवर्ड ती व्यक्ति निकामी करू शकते हे देखील ध्यानात ठेवायला हवं.

सेव्ह ऍज डब्ल्यू डब्ल्यू एफ – आपण एखादी पिडिएफ तयार केली. पण ती छापल्याने कागदाच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान होऊ नये असे आपल्याला जर वाटत असेल तर एक तर आपण कोणी प्रिंट काढू नये असा पर्याय देऊ शकतो. पण अशी बंधन काढून टाकता येतात हे मी वरच सांगितलं आहे. त्यामुळे ह्या संकेतस्थळाचा वापर करून आपली पिडिएफ पिडिएफ स्वरूपाच्या ऐवजी डब्ल्यू डब्ल्यू एफ या स्वरूपात साठवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

आत्तापर्यंत दिलेली ही माहीती ही ऑनलाईन म्हणून वापरण्यायोग्य संकेतस्थळांची होती. आता काही ऑफलाईन म्हणजे संगणकावर प्रणाली उतरवून घेऊन वापरण्यायोग्य माहीती.

पिडिएफ९९५ – एकदा ही प्रणाली संगणकावर उतरवून घेऊन (डाऊनलोड) प्रस्थापित(इन्स्टॉल) केली की, आपण छापण्याची(प्रिंट) आज्ञा देऊ शकत असलेल्या कोणत्याही प्रणालीमधून त्या त्या कागदपत्रांची पिडिएफ तयार करू शकता. इतकेच नव्हे तर ही प्रणाली एकापेक्षा जास्त पिडिएफ एकत्र जोडणे, एका पिडीएफ मधून नको असलेली पृष्ठे वगळणे, जर काही दुवे टाकलेले असतील तर ते दुवे जोडणे, पार्श्वभूमी किंवा शिर्षलेख(हेडर) जोडणे. इ. कामे देखील ही प्रणाली करू शकते. याच प्रणालीत सिग्नेचर९९५ या ऍड-ऑन ची भर घातली की पृष्ठ क्रमांक, वॉटरमार्क, फाईलविषयीची माहिती आणि बरेच काही बदल करता येतात.

गोव्हर्टचे सिंपल इंपोझिशन टूल – एखाद्या महत्वाच्या पिडीएफचा प्रिंट आऊट घ्यायचाच असल्यास तो पुस्तकासारखा हवाय की आणखी कोणत्या पद्धतीने हे ठरवायचा पर्याय ही प्रणाली देते आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रिंट आऊट मिळतो.

मार्टव्ह्यू – ह्या प्रणालीमुळे आपल्याला आपल्या संगणकावर असलेली पिडिएफ सुलभतेने वाचायला अनेक पर्याय उपलब्ध होतात. हातातल्या पुस्तकासारखी पाने उलटणे / स्लाईड्स सारखी सरकावणे, स्क्रोल करणे सारख्या सुविधा ही प्रणाली देते. इतकेच नव्हे तर आपल्याला आपली एखादी पिडिएफ मार्ट स्वरूपात परावर्तित करून प्रकाशित करता येते. इतर उपलब्ध पुस्तके देखील संगणकावर उतरवून घेता येतात.

महाजालावर अनेक मुबलक सामग्री उपलब्ध आहे. कदाचित यापेक्षा देखील अधिक सफाईने काम करणारी संकेतस्थळे / प्रणाल्या उपलब्ध असतील पण मला योग्य वाटलेली माहिती मी आपल्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे.

 सदर लेख दीपज्योती २०११ या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.
Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “सबकुछ पिडिएफ

  1. हो पण ह्या मराठी font ला support नाही करत. आता तुमच्या ह्या पानाची pdf बनवायची झाली तर ती नाही होत आहे. font च्या जागी नुसते चौकोन दिसतात. ह्यावर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. kunal.deshpande@gmx.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: