१ प्रतिक्रिया

जाब विचारणार?


047 of 365

(Photo credit: Yogesh Mhatre)

बृहन्‌ अशी बिरुदावली मिरवणार्‍या मुंबईत नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. प्रभाग पाडल्याने बरीच समीकरणे बदलली, वृत्तपत्रातील बातम्यांवरून एक कळले की तरूणाईने मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. बर्‍याच ठिकाणी नावे यादीत सापडली नसल्याने कदाचित तरूणाईला आणि पर्यायाने त्या तरूणाईची मते मिळू शकणार्‍या पक्षाला याचा फटका नक्कीच बसला. पण तरीही मतदान केवळ ४५ टक्क्यांच्या आसपासच झाले. आता निवडून आलेला/ली नगरसेवक/सेविका आपल्याला हवी असलेली असो किंवा नसो, आपल्याला आणि त्यांना पुढची पाच वर्षे एकमेकांबरोबर नांदावेच लागणार. अश्यावेळी नगरपालिकेची कामे ,कायदे-कानून आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. नुसतेच मतदानाच्या वेळी सुजाण नागरिकाचे मतदानाचे पवित्र कार्य पार पाडून; नंतरची पाच वर्षे झोपून रहाण्यापेक्षा त्या त्या वेळी केलेल्या / न केलेल्या कामाचा जाब विचारणे हे जास्त योग्य. अर्थात त्याकरता आपल्याला स्वत:ला हे माहित असणे आवश्यक आहे की महानगर पालिका चालते तरी कशी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केलेली ही पुस्तिका वाचून त्याचा अभ्यास करून हे काम आपण नक्कीच करू शकतो, नाही का?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “जाब विचारणार?

  1. धन्स ताई…. खूप उपयोग होईल या पुस्तिकेचा. डालो केलं आहे 🙂 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: