5 प्रतिक्रिया

डेलिमोशन, पोर्न विडियोज आणि फेसबुक


गेल्या आठवडयात माझ्या फेसबुक मित्रमैत्रिणींच्या यादीतील दोन जणांच्या न्यूज फिड मध्ये त्यांनी डेलिमोशन या संकेतस्थळावर पोर्न विडियो पाहिल्याचा उल्लेख होता, इतकेच नाही तर त्या विडियोचा दुवा देखील होता. आता महाजालावर मोफत उपलब्ध असलेले सगळे काही वाचू / पाहू शकतो हे जरी खरे असले तरी आपण हे पाहिले अथवा वाचले हे उघडपणे सांगण्याची मानसिकता अजून तरी माझ्या पहाण्यात नाही. असे असताना या दोन्ही व्यक्तिंनी हे का केले असावे? बरं दोन्ही व्यक्तिंनी ज्या संकेतस्थळावर हे विडियोज पाहिले ते होते ’डेलिमोशन’ चे त्या अर्थी डेलिमोशनचाच काहितरी घोळ असावा हे लक्षात आले. अधिक खोलात जाऊन पहाता लक्षात आले की जेव्हा फेसबुकच्या लॉगिनवरून डेलिमोशन चे ऍप आपण वापरतो तेव्हा , डेलिमोशन ला आपण पहात असलेल्या विडिजोचा दुवा आपल्या वॉल वर आपल्या वतीने पोस्ट करण्याची चक्क परवानगी देत असतो. खरं नाही ना वाटतं? हे पहा काही पुरावे…..इथेच पोस्ट केलेल्या स्लाइडशो मध्ये मिळतील, ते पुरावे कसे ठेऊ नयेत याचे देखील उत्तर तुम्हाला इथे सापडेल. तेव्हा जर तुम्ही डेलिमोशनवर पोर्न विडियोज बघत असाल तर ही काळजी घ्यायला विसरू नका…..कारण तुमची ही बातमी ज्यांच्या न्यूज फिड मध्ये दिसते त्यांना माझ्यासारखे खजील व्हायची वेळ आणू नका.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “डेलिमोशन, पोर्न विडियोज आणि फेसबुक

  1. यापूर्वी सुद्धा काही महिन्यापूर्वी फेसबुक वर जावास्क्रिप्ट बग आला होता त्यातही असेच काही विडीयो आपल्या पेज वर दिसायचे मित्राच्या नावाने
    लाईक केलेले आणि ते हाइड करायला युजर गेले कि तोच विडीयो आपण लाईक केला असं आपल्या मित्रांच्या पेज वर डिस्प्ले व्हायचं, आपण काळजी घेऊच पण फेसबुक सारख्या मोठ्या सोशल नेट्वर्किंग ने हि काळजी घ्यायला हवी कि त्यांच्या सिस्टीम मध्ये असे Malfunctuning किंवा घूसघोरी होऊ नये.

  2. खरं आहे. मला पण असे अपडेट्स नेहेमी येत असतात, पण त्या व्यक्तीला वैय्यक्तिक मेसेज देऊन सांगतो.. बाकी पोस्ट एकदम टाइमली.. आणि मोस्ट रिक्वायर्ड.. एफ बी वर शेअर करतोय.

  3. 🙂
    तात्पर्य: डेलीमोशनवर पॉर्न बघू नये!😛

    खरंतर, बघूच नये. पण असो…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: