यावर आपले मत नोंदवा

वाहन विमा


एका परिचिताला नुकताच गाडी चालवताना अपघात झाला. जवळपास दिड महिना झोपून काढावा लागणार आहे, तशात इतकी वर्षे भारताबाहेर असल्याने मेडीक्लेम काढलेला नाही आणि वाहनाचा फक्त ’थर्ड पार्टी’ विमा काढला असल्याने त्याच्या नुकसान झालेल्या गाडीचे कोणतेही विमा संरक्षण नाही, त्यामुळे बराच मोठ्ठा आर्थिक खड्डा त्याला पडला. वास्तविक ‘थर्ड पार्टी’ वाहन विमा असल्यावर काळजीची गरज काय असे मला वाटले होते. पण मग विमा सल्लागाराशी बोलल्यावर मला वेगळीच माहिती मिळाली.

वाहन विमा दोन प्रकारात काढता येतो १) थर्ड पार्टी, २) कॉंम्प्रिहेन्सिव्ह. थर्ड पार्टी विम्याचा हप्ता तुलनेने कमी असतो, पण त्याचा आपल्याला स्वत:ला व्यक्तिश: काही फायदा होत नसतो. आपल्याकडून झालेल्या वाहन अपघातात समोरच्या व्यक्तिने त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई जर मागितली तर आणि तरच थर्ड पार्टी विम्याचा आपल्याला उपयोग होतो. या विम्याअंतर्गत आपले स्वत:चे झालेले नुकसान विमा कंपनी आपल्याला भरून देत नाही. या उलट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रकारच्या बाहन विम्यात आपले अधिक समोरच्या पार्टीचे नुकसान भरून देण्याची विमा कंपनीची जबाबदारी असते. आपण काढलेला वाहन विमा कोणत्या प्रकारचा आहे हे त्यावर स्पष्टपणे नमूद केलेले असते. त्यानुसार भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारे विमा काढायचा आहे हे ठरवून मगच विमा प्रतिनिधी गाठा अथवा पूर्ण माहिती करून घ्या आणि मग विमा काढा.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: