2 प्रतिक्रिया

या चिमण्यांनो……….


२० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. कुणाच्याही अध्यात मध्यात नसणारा हा चिमुकला पक्षी मला फार आवडतो. मी घरात नेहमी म्हणते देखील की, “पुढचा जन्म मला चिमणीचा यावा”. अर्थातच यावर नवरा आणि चिरंजीव दोघेही माझी यथेच्छ चेष्टा करतात. म्हणतात की, “मागून मागून चिमणीचा जन्म काय मागितलास!” पण मला बुवा ती चिमणीच आवडते त्याला कोण काय करणार!

पण आजकाल चिमण्यांची संख्या देखील झपाट्याने कमी व्हायला लागली आहे. मोबाईल टॉवर , शहरीकरण इ. मुळे  बहुदा आता वाघांसारखी चिमण्या बचाव आंदोलन करायची  वेळ येणार असे दिसतेय. शहरीकरणाकरिता जुन्या झाडांची मोठया प्रमाणावर तोड आणि नवीन झाडे न लावल्यामुळे चिमण्यांच्या विणीच्या काळात त्यांना घरटे बांधून अंडी घालायला जागाच शिल्लक नाही. साधारणत: अडीच-तीन वर्षांपूर्वी मी सकाळ्च्या एका पुरवणीत गुडमॉर्निंग या सदरात  असाच चिमण्यांविषयी एक लेख वाचला होता. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे एका संकेतस्थळाचा पत्ता दिला होता, जे चिमण्यांकरता कृत्रिम घरटी तयार करतात. मला ती कल्पना फार आवडली. पण त्याच सुमारास आमच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू व्हायचे होते; जे किमान दोन अडीच वर्ष तरी चालणारे होते. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण झाले की ते बसवून घ्यावे असा विचार केला. आमचे घर आहे तळमजल्याला आणि इमारतीत मांजरांचा भरपूर राबता आहे. इमारतीचे काम चालू असताना जेव्हा बांबूच्या पराती बांधल्या गेल्या तेव्हा खिडकीखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर आणि पुढे बांबूवर चढून अनेकदा मांजरे घरात येऊ पहायची तेव्हा मात्र आपण चिमणीचे करवून घेणार असलेले घरटे मोठी चूक ठरेल हे लक्षात आहे. कारण चिमणी मोठ्या विश्वासाने त्यात पिल्लांना जन्माला घालेल खरी आणि आपल्यामुळे ती आयती मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडायची हे काही मानवण्यासारखे नव्हते. त्यामुळे चिमणीच्या घरट्य़ाचा विषय बाद केला. कालांतराने पुन्हा एक लेख वाचनात आला, त्यात पुठ्ठ्याच्या खोक्याचे दोन्ही बाजूला भोक पाडून, चारा घालून घरटे तयार केलेले दाखवलेले होते. जानेवारी-फेब्रुवारी हा चिमण्यांच्या विणीचा काळ असतो तेव्हा हे खोके तयार करून ठेवावेत असे लिहिले होते. त्याप्रमाणे मे महिन्यात एक्स्पोर्ट  तोडीच्या अल्फान्सो मॅंगोचे जे खोके मिळतात ते साठवून खिडकीच्या ग्रील्मध्येच ठेवले. पण काही कारणाने ते खराब झाल्याने टाकून द्यावे लागले. त्यामुळे आता हे घरटे देखील बारगळले. मात्र इतक्या दिवसांच्या कालावधीत एक कावळा रोज मी पोळ्या करत असताना खिडकीत येऊन कावकाव करायचा, तव्यावरची गरम गरम पोळी त्याला घालायचे, कधी खायचा..कधी घेऊन जायचा, एप्रिल – मे मध्ये त्याची काव काव वाढली, गरम पोळी त्याला नकोशी होऊ लागली पण येऊन बघून जायचे काही सुटेना. आणि अचानक एक दिवस साक्षात्कार झाला की त्याला तहान तर लागली नसेल ना? त्या दिवसापासून श्रीखंडाच्या प्लास्टीकच्या भांड्यात त्याला पाणी ठेवणे सुरू झाले. आश्चर्य म्हणजे नुसता कावळाच नाही तर चिमण्या देखील येऊन ते पाणी पिऊ लागल्या. कावळ्याला उकीरड्यावर सामिष आहार मुबलक मिळत असावा म्हणून तव्यावरच्या गरमागरम पोळीची महती त्याला कळली नसावी पण चिमण्यांची काहीतरी दाण्याची अपेक्षा असावी. तेव्हा त्यांच्याकरता देखील एका वेगळ्या डब्यात कधी तांदळाचे दाणे, कधी ज्वारी-बाजरीचे दाणे असे घालणे सुरू केले. पण बाजरीचे दाणे चिमण्या खात नाहीत असे लक्षात आले.  फक्त ज्वारी आणि काही प्रमाणात तांदूळ हा त्यांचा आहार, तो घेऊन वर शेजारच्या डब्यतले पाणी पिणे  हा त्यांचा मुख्य कार्यक्रम. सकाळी उन्हे तापायच्या आधी आणि संध्याकाळी उन्हे उतरल्यावर अश्या दोन वेळी त्या ये-जा करतात. आता चिमण्यांकरता वाटणारी हळहळ काही प्रमाणात कमी झाली, त्यांच्या वाढीकरता मी घरटे उभे करू शकले नाही तरी त्यांच्या अस्तित्वाकरता दाणा-पाणी पुरवण्याचे काम मला खूप समाधान मिळवून देतात.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “या चिमण्यांनो……….

  1. छोट्या छोट्या गोष्टींमधुन आपण किती आनंद मिळवतो नाही का???
    चिमणीचे मला ही खुप आकर्षण….छोटीशी असुनही..घरटे बांधताना किती जिद्दीने उभी रहाते..
    मस्त लिहीले आहेस श्रेया.
    तुझ्या ब्लॉगला मी पहिल्यांदाच पहाते आहे..मस्त आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: