11 प्रतिक्रिया

मागे वळून पाहतांना…..


माझ्या या ब्लॉग ला लवकरच 6 लाख वाचकांच्या भेटी पूर्ण होतील. हा मराठी ब्लॉग मी २००६ साली २२ जून ला सुरू केला होता त्यामुळे अजून ६ वर्षे देखील पूर्ण झाली नाहीत त्यामानाने ६ लाखाचा आकडा एक समाधान देऊन जातो. २००८ मध्ये लोकसत्तेत पहिल्या प्रथम या ब्लॉगचा उल्लेख मार्च च्या एका रविवार पुरवणीत आला आणि त्या दिवसापासून या ब्लॉग ने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर सातत्याने या ब्लॉगचा उल्लेख प्रसिद्धी माध्यमात येत गेल्याने वर्षाला लाखभर वाचक भेटींचा आकडा सहज गाठला जातो.

आता हा ब्लॉग वाचनीय आहे की नाही हा कळीचा मुद्दा आहे. अनेक जणांच्या मते ह्या ब्लॉग मध्ये वाचनीय असे काहीही नसते अहो इतके कशाला…माझ्या ओळखीतल्या सहब्लॉगर्सना देखिल माझा हा ब्लॉग उघडून वाचायची इच्छा होत नसणार हे त्यांच्या न मिळणार्‍या प्रतिसादांवरून लक्षात येतेच म्हणा पण माझ्या ब्लॉगचे बोधवाक्यच मुळी “जे जे आपणासी ठावे ते ते इतेरांसी सांगावे……” आहे. त्यामुळे एकला चालो रे च्या धर्तीवर हे ब्लॉग लेखन चालूच राहणार. मला असलेली माहिती मी देत राहणार, ज्याला उपयोगी वाटेल त्याने ती घ्यावी….ज्याला नको त्यांनी ती दुर्लक्षावी…..शेवटी माहिती आत्मसात न करण्याने नुकसान कोणाचे?

असो, इथे थोडा वेगळाच मुद्दा मांडायचा आहे. या ब्लॉग लेखनाने मला नेमके काय दिले? म्हणाल तर खूप काही म्हणाल तर काही नाही….काही नाही अशाकरता की ब्लॉगिंग म्हणजे निव्वळ टाईमपास, लष्कराच्या भाकर्‍या भाजणे असे मानणारा देखील एक वर्ग आहे आणि ब्लॉगिंग म्हणजे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे साधन म्हणून पाहणारा एक वर्ग देखील आहे. एक स्त्री ब्लॉगर…जिचा देवनागरी भाषेत…वर्डप्रेससारख्या ब्लॉगिंग प्लॅटप्फॉर्मवर ब्लॉग आहे ही ओळख याच ब्लॉग मुळे च मिळाली, मी लिहिते ते चांगले की वाईट हे वाचकच ठरवू शकतील पण ज्या संगणकीय तंत्राची मला
आवड आहे तो विषय सोपा करून समजावून द्यायला मला जमत असावे अशी निदान माझी समजूत आहे. त्यामुळे अश्या तंत्रज्ञानी विषयावर लिहिलेले या ब्लॉगवर सर्रास सापडेलच.

त्याखेरीज जेव्हा आमच्या ब्लॉगर्स मंडळींनी नियमितपणे इ अंक काढायचे ठरवले तेव्हा ते अंक ब्लॉग रुपी तयार करण्याची जबाबदारी मी आपणहून माझ्या खांद्यावर घेतली होती. एक नाही दोन नाही तब्बल १२ इ अंक काढले होते. त्याच्या सजावटीत सर्वस्वी माझा वाटा होता. त्यापैकी काही इ अंकांचे दुवे खाली देत आहे.
http://goo.gl/uVsQO
http://goo.gl/hPTLA
http://goo.gl/BFqGm
http://goo.gl/EeRvv
http://goo.gl/6Ia8b
दर दोन अडीच महिन्यांनी हे इ अंक काढताना प्रत्येक वेळी काही ना काही नवीन शिकता आले. प्रत्येक वेळी येणारा इ अंक आधीच्यापेक्षा सरस कसा असेल याचा शोध घेताना नवे काही गवसत गेले. आणि त्यामुळेच पहिले व्यावसायिक संकेतस्थळ http://goo.gl/h4TJn तयार करण्याची संधी मिळाली.

मध्ये एका मैत्रिणीने तिचे बाजारात विकले जात असलेले पुस्तक जालावर देखील विक्रीला ठेवण्याचा मानस व्यक्त केला, पण त्याचबरोबर तिला या गोष्टीचे ज्ञान नसल्याचे देखील तिने स्पष्ट केले त्यामुळे तिच्या गरजेप्रमाणे उपलब्ध पर्याय शोधण्याची जबाबदारी शिरावर घेतली. ही शोधाशोध करताना काही एक योजना डोक्यात घोळू लागली. ती अशी की, समजा याच माझ्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या वाचकांना करून दिला तर?

थोडक्यात ज्यांना कुणाला आपला ब्लॉग बनवून हवा असेल, त्या संबंधी काही मार्गदर्शन हवे असेल, आपले लिखाण ऑनलाईन फुकट न वाटता जर माफक मोबदल्यात ऑनलाईनच वितरित करायचे असेल तर त्यांनी माझ्याशी अवश्य संपर्क साधा. मी आपणास सर्वतोपरी साहाय्य करू शकेन अर्थात योग्य तो मोबदला घेऊनच बरं का ! 🙂

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

11 comments on “मागे वळून पाहतांना…..

  1. आज आपला ब्लॉग पहिला.
    एका वेगळाच आणि माहितीपूर्ण ब्लॉग आवडून गेला,
    माहितीच्या युगात ह्या विषयाला वाहिलेल्या ब्लॉग मी नेहमीच वाचत जाईन.
    मात्र वर्ड प्रेस सारखा तुम्ही ब्लोग्गेर साठी सुद्धा लेख लिहिला तर दुधात साखर

    • धन्यवाद निनाद, माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल, तो आवडल्याबद्दल आणि तसा तो आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल देखील. ब्लॉगरकरता खरं तर बर्‍याच ब्लॉग्ज्स वर तुम्हाला माहिती पूर्ण लेख मिळतील, माझे स्वत:चे देखील ब्लॉगरवर अनेक प्रयोग चालू असतात. तुम्ही नेमकी काय माहिती ब्लॉगरकरता हवी आहे हे कळवले तर जास्त उत्तम, त्या अनुषंगाने लेख लिहिता येईल.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: