8 प्रतिक्रिया

केबल डिजिटलायझेशन


१ जानेवारी २०१२ पासून निदान महानगरांमध्ये डिजिटलायझेशन होणे आवश्यक होते. पण स्वत: केबल चालकच यात चालढकल करत आहेत. खरं तर हे डिजिटलायझेशन होण्यामागे फायदा नक्की कुणाचा ? वाहिनीवाले आपल्केयाला योग्य तो कर भरत नाही असे सरकारचे म्हणणे आहे तर चालक आपल्याला योग्य तो ग्राहकांचा आकडा सांगत नाहीत अशी ओरड वाहिनीवाले करतात, यातलं कोण खरं नी कोण खोटं याची शहानिशा न करता केंद्र सरकारने ग्राहकांवर डिजिटलायझेशनची सक्ती केली. अर्थातच ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराची सेट टॉप बॉक्स ची उत्पादन कंपनी असून त्याचे उखळ पांढरे करण्याकरता ही सक्ती केलेली असू शकते असं मानायला काही हरकत नाही.

वास्तविक पहाता जानेवारीपासून ह्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती पण इतके दिवस केबलचालकांच्या नाडया न आवळल्याने ते देखील स्वस्थ बसून होते, अर्थातच त्यांचा यात फायदा होताच कारण योग्य ग्राहकांचा आकडा वाहिन्यांना न कळवता; दरमहा ग्राहकांकडून मिळणारा मलिदा मात्र केबलचालकांच्या खिशात जात होता. आता सेटटॉप बॉक्स बसल्याने आणि ते रजिस्टर्ड करण्यात येणार असल्याने हा प्रकार कमी होईल. आपण सामान्य ग्राहक मात्र सरकार जे काही निर्णय घेईल ते निमूटपणे पाळण्याचे काम फक्त करू शकतो.

सेटटॉप बॉक्सचा अनुभव थोडाथोडका नाही तर ५ वर्ष घेतल्याने, गेल्याच वर्षी पुन्हा केबलवाल्याची मनधरणी करून केबल कनेक्शन घेतले होते. त्यामुळे पुन्हा जर डिश टी.व्हि. वाल्यांच्या नाकदुर्‍या काढायच्या असतील तर वैतागच नाही का! मग आता डिश टी.व्ही. सोडून टाटा स्काय वाल्यांकडे जावे की केबलवाल्यालाच गाठावे ? हा प्रश्न माझ्याप्रमाणेच अनेकांना पडला असेल.  त्याकरता हा लेखनप्रपंच….

सेट टॉप बॉक्स बसवल्याने ग्राहकांचा फायदा काय ?

 • चित्र सुस्पष्ट दिसते
 • बर्‍याचशा नवीन टि.व्ही. मध्ये देखील आपल्याला हव्या त्या वाहिन्यांना गुच्छ बनवून ठेवायची सोय असतेच असे नाही. समजा घरात चार माणसे आहेत; प्रत्येकाच्या प्रत्येकी १० वेगवेगळ्या वाहिन्या आवडीच्या आहेत, तर प्रत्येकाच्या आवडीच्या वाहिन्या एकत्र करून एक गुच्छ प्रत्येकी तयार करता येतो. ज्यामुळे वाहिन्या धुंडाळत बसायची वेळ येत नाही.
 • सेट टॉप बॉक्स मुळे काही एफ.एम्‌ वाहिन्या देखील टि.व्ही.वर ऐकता येतात.
 • समजा आपण आत्ता एखादा कार्यक्रम बघत आहोत, तो संपला की दुसर्‍या वाहिनीवरचा दुसरा कार्यक्रम जर आपल्याला पहायचा असेल तर ते विसरू नये म्हणून आपण आपल्याला हवे ते सगळे कार्यक्रम हवे शेड्युल करून ठेवू शकतो, जेणेकरून आत्ताचा कार्यक्रम संपला की लगेचच पुढचा हवा तो कार्यक्रम वाहिनी शोधत न बसता, डोकं खाजवत न बसता विनासायास पहायला मिळतो.
 • सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे आपल्याला नको असलेल्या वाहिन्यांना कुलुप घालायची सोय सेटटॉप बॉक्स  मुळे मिळते, जी बर्‍याचश्या दूरचित्रवाणी संचात देखील उपलब्ध नसते. त्यामुळे परीक्षांच्या काळात कार्टून्सच्या सगळ्या वाहिन्या कुलुपबंद करायची सोय पालकांकडे असेल.

आता हे सगळे पर्याय टाटा स्काय काय / डिश टि.व्ही. काय किंवा इतर कोणताही सेट टॉप बॉक्स घेतला तरी मिळतीलच. मग कोणता घ्यावा ? रेकॉर्डींग ची सोय असलेला घ्यावा ? की हाय डेफिनेशन वाला घ्यावा ? की आपला साधा केबलवाल्याचा डब्बाच घ्यावा ?

इथे प्रत्येकाने आपल्याला कशाची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे सेट टॉप बॉक्स घ्यावा. मात्र काही गोष्टी इथे नमूद करते…..

 • केबलवाल्याकडून घेतल्यास ११००/- च्या आसपास हा सेटटॉपबॉक्स मिळतो मात्र खाजगी कंपन्यांचे महाग असावेत. (डिश टि.व्ही. च्या सेटटॉप बॉक्स करता ५ वर्षापूर्वी ५०००/- मोजले होते + इन्स्टॉलेशन चे वेगळे पैसे द्यावे लागले होते)
 • केबल च्या सेटटॉप बॉक्स बरोबर वेगळी डिश ची छत्री बसावायची गरज पडत नाही, जी खाजगी कंपन्यांच्या सेटटॉपबॉक्स बरोबर बसवावी लागते.
 • पावसाळ्यात ४ महिने डिश च्या प्रक्षेपणाची बोंबच असायची…..केबलच्या सेट टॉपबॉक्सचा अंदाज नाही.
 • काहीही दुरूस्ती करायची वेळ आली तरी खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन बघायला देखील वेगळा खर्च आपल्याकडून घेतात, आमच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या वेळी डिश काढून ठेवायला आणि पुन्हा लावून द्यायला बराच खर्च आमच्याकडून घेतला गेला.
 • शिवाय डिश घेतली म्हणजे सगळ्या वाहिन्या दिसतील या भ्रमात राहू नये, वेगवेगळ्या वाहिन्यांचे वेगवेगळे गुच्छ घ्यायला वेगळे जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. त्यापेक्षा केबलवाल्याकडे दरमहा रू.३००/- भरले की सगळ्या वाहिन्या दिसतात, हव्या त्या बघा.

या सगळ्या कटकटींमुळे भिक नको पण कुत्रा आवर च्या धर्तीवर म्हणीन की डिश नको पण खर्च आवर. त्यामुळे खाजगी कंपन्यांपेक्षा मी केबलवाल्याकडच्या सेटटॉपबॉक्स ला प्राधान्य देईन.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

8 comments on “केबल डिजिटलायझेशन

 1. छान माहिती आहे …..केबल digitalization वर

 2. kebalvaalyaa set top box paavasaalyaat sudhhaa vyavasthit chaalato.

 3. khop sunder lihile ahe tumhi. mazya manatale ase apan lihilya padhal aple aabhar.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: