6 प्रतिक्रिया

तुमचे पैसे बॅंकेत सुरक्षित आहेत का ?


परवा शनिवारी एका राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक भरून आणले. ते भरल्यावर आधीच्या पानावरच्या एक-दोन एन्ट्रीज पुन्हा पुढच्या पानावर आल्या. सहज म्हणून नजर टाकली आणि पाहिले तर आधीच्या शेवटच्या एन्ट्रीसमोरचा बॅलन्स आणि पुढच्या पानावरच्या त्याच एन्ट्रीसमोरचा बॅलन्स जुळत नव्हता. पासबुक भरून देणार्‍या मुलीला विचारून घेतले तेव्हा तिने सांगितले ते धक्कादायकच होते.

तिच्या म्हणण्याप्रमाणे २०१० सालापासून हे बॅलन्स न जुळणे चालू आहे असे लक्षात आले. सदर बॅंकेची नेट बॅंकींग सोय वापरत असल्याने घरी येऊन ताबडतोब संगणकावरून आणि आधीच्या पास्बुकावरून छडा लावायचा प्रयत्न केला. खरोखरच फेब,२०१० मधील तब्बल ५ एन्ट्रीज पासबुक अपडेट करताना आल्या नव्हत्या. त्यामुळे आधीच्या एन्ट्रीचा बॅलन्स पुढच्या एन्ट्रीच्या बॅलन्स शी जुळत नव्हता.पण आश्चर्य म्हणजे आधीचा बॅलन्स समजा १०००० असेल आणि पुढची एन्ट्री १००० क्रेडीट ची गाळली गेली असेल, तर त्याच्या पुढची असलेली ५०० डेबीट ची एन्ट्री धरून बॅलन्स ९५०० दाखवत होता. वास्तविक प्रिंटरने एन्ट्री जरी गाळली तरी बॅलन्स १०५०० दिसायला हवा. हे जर घडते तर त्याच वेळी ती चूक लक्षात आली असती पण तसे घडले नाही. इतके झाले हा एक योगायोग असू शकतो. पण आज पुन्हा एका सहकारी बॅंकेत हाच अनुभव आला. नेमका मार्च – एप्रिल २०१०  मधल्या २ एन्ट्रीज पासबुकात गायब होत्या. मान्य आहे की २०१० नंतर बर्‍याचश्या राष्ट्रीयकृत बेंकांच्या संगणकीकरणास वेग आला त्यामानाने तिथे कुशल कर्मचार्‍यांचा अभाव होता. निवृत्तीला पोचलेला हा कर्मचारीवर्ग संगणकीकरणाला अनुकूल नव्हता म्हणून की बॅंका वापरत असलेल्या संगणकीकृत प्रणालीत काही दोष म्हणून ही चूक झाली ? दोन्ही बॅंकांमधील कर्मचार्‍यांना ही चूक कशी झाली याचे स्पष्टीकरण देता आले नाही, कारण बहुदा त्यांना स्वत:लाच ही चूक त्यांची आहे की संगणक प्रणालीची हेच लक्षात आलेले नाही. हा अर्थाअर्थी घोटाळा देखील म्हणता येणार नाही कारण कालांतराने त्या गायब झालेल्या एन्ट्रीज पासबुकात दिसत नसल्या तरी अपडेटेड बॅलन्स मात्र घेतला गेला आणि म्हणूनच तो आधीच्या बॅलन्सशी जुळेना. पण हे एखाद्याच्या बाबतीत घडले आहे की त्या कालावधीत पासबुक अपडेट केलेल्या / न केलेल्या सगळ्या खातेदारांच्या बाबतीत ही घडले आहे हे कळायला काही मार्ग नाही. त्यातून लहान रकमा आणि विशेष काही नोंदी नसल्याने पासबुक नियमित अपडेट करून घेतले न गेल्याने हे आमच्या लक्षातही आले नाही पण जर या रकमा ५-६ आकडी मोठ्या असत्या तर ? मुख्य म्हणजे हा दोष जर संगणक प्रणालीत असेल तर तो दुरुस्त झाला आहे की अजूनही बिघाड कायम आहे ? हे गुलदस्त्यातच आहे. याखेरीज जर हाच  बॅलन्स प्रमाण मानून एखाद्याने काही चेक्स कोणाला दिले आणि मूळ बॅलन्स कमी असल्याकारणाने तो चेक बाऊन्स झाला असता तर कायद्याप्रमाणे खातेदाराला दुप्पट रक्कमेचा दंड भरावा लागतो. अश्या वेळी बॅंकांनी ही स्वत:ची चूक मान्य केली असती का? 

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

6 comments on “तुमचे पैसे बॅंकेत सुरक्षित आहेत का ?

 1. २०१० सालापासून प्रणालीमधे त्रूटी आहे हे धक्कादायक आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे खातेदाराने ही त्रूटी लक्षात आणून देईपर्यंत बॅंकेच्या कर्मचार्‍यांना त्याचा पत्ता न लागणे. अशा परिस्थितीत बॅंक आपली चूक मान्य करणार नाहीच. भूर्दंड खातेदाराने भरायचा असतो हे अध्यहृत असतं.

  माझ्या असेही लक्षात आले आहे की खातेदाराने जर बॅंकेच्या खात्यासाठी कुणालाही नॉमिनी किंवा जॉइंट अकाउंट होल्डर म्हणून घोषित केलं नसेल, तर बॅंक ही गोष्ट खातेदाराच्या लक्षात आणून देत नाही. अशा वेळेस दुर्दैवाने जर त्या खातेदाराचं काही बरं-वाईट झालं तर बॅंकेच्या खात्यातील त्याच्या सर्व रकमेवर वारसाला आपला दावा लावताना बरेच कष्ट पडतात.

  • खरे आहे हे कांचन, म्हणूनच न राहवून एक पोस्टच टाकली. दोन्ही बॅंका खात्रीशीर आणि प्रामाणिक आहेत म्हणून त्यांची नावे न देता हे पोस्ट केले.

 2. when entries are made in passbook computer operator has to tally the balance in passbook with ledger balance and print otherwise there is a chance that some entries do not appear but that doesnot mean that your money is lost or some fraud has occured when computerisation has taken place there is no chance that any calculation error ocurs which is possible in manual operation final balance which is shown has to be correct as everyday the ledgers are tallied the precaution to be taken while updating passbook is to check immediately the entries and get them corrected if they are wrong

  • सुनिला, ज्या पद्धतीने तुम्ही या प्रणालीचे वर्णन केले आहे त्यावरून तुम्ही बॅंकेत काम केलेले आहे असे वाटते. मी लेखातच म्हटले आहे की, अर्थाअर्थी हा घोटाळा म्हणता येणार नाही. पण तरीही कोणाची तरी चूक यात नक्कीच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पासबुक भरून देणार्‍या व्यक्तिने आधीचा बॅलन्स आणि स्क्रिनवरचा बॅलन्स तपासूनच पासबुक भरून द्यायला हवे हे मान्य पण तसे ते होत नाही….इथेच तर मेख आहे ना!

 3. kharch kalaji karanya sarkhi gost —-anjali gadre

  • खराय ! अंजलीताई, म्हणूनच आज हा लेख तातडीने लिहिला. माझ्यासारखे अनेकजण असू शकतील, निदान हे वाचून तरी आपापली पासबुक्स अपडेट करून घेतील. माझ्या लेखाने इतके परिवर्तन घडले तरी मिळवले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: