4 प्रतिक्रिया

मराठी नाटकांचे तिकिटबुकिंग….


आज पु.लं. चे पुनरुज्जीवित ’वार्‍यावरची वरात’ चे तिकिट काढायला गेले होते. काही कामे आटपून जाईस्तोवर अंमळ उशीरच झाला. तिकिट विक्रीची वेळ सकाळी ८.३० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ अशी असल्याकारणाने साहजिकच तिकिटे मिळाली नाहीत. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात नाट्यगृह वेळ बीळ पाळू शकतात हे फक्त भारतातच घडू शकेल. आश्चर्य म्हणजे शेजारी करंट बुकिंगचा , एक हिंदी आणि एका गुजराती नाटकाचे(ऍडव्हान्स करता) असे तीन बुकिंग प्लान्स उघडून ठेवलेले होते. मग मराठी नाटकालाच असा दुजाभाव का? तो देखील मराठी नाट्यगृहात? आणि साक्षात सेनाप्रमुखांनी उद्‍घाटन केलेल्या?

बरं , तिकिटे उपलब्ध नव्हती अश्यांतला काही भाग नव्हता, कारण काउंटरवरचा माणूस म्हणाला, “भरपूर तिकिटे आहेत पण ५ ला या”. अरे भल्या गृहस्था ! जर तिकिटे जर उपलब्ध आहेत, घेणारी व्यक्ती जर समोर पैसे घेऊन उभी आहे तर काळ-वेळ पाहायचा हा माजोरडेपणा फक्त मराठी माणसेच करू जाणे :-( .

त्यावेळी डोक्यात विचार आला की, मराठी नाटकांचे ऑनलाईन बुकिंग का करता येत नाही? टिकीट्स प्लीज किंवा बुक माय शो सारख्या संकेतस्थळांवर ऑनलाईन बुकिंग करून चित्रपट पाहता येतात. अगदी सगळी चित्रपटगृहे नाही पण काही ठराविक चित्रपटगृहे त्या संकेतस्थळावर असतात. ऑनलाईन तिकिट बुक करायचे, पैसे भरायचे, तिकिट बुक झाल्याचा प्रिंट आऊट किंवा एसेमेस काउंटर वर दाखवून तिकिट ताब्यात घ्यायचे…कसलीही झंझट नाही. अर्थात प्रत्येक तिकिटामागे १२-१५/- बुकिंग चार्ज द्यावे लागतात पण ऑनलाईन बुकिंगच्या सोयीपुढे ते नगण्य आहेत, कारण प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करायचा खर्च जास्त येतो. या संकेतस्थळांवर काही हिंदी , इंग्रजी, गुजराती नाटकांचे देखील बुकिंग करता येते, मग मराठी नाटकच यात मागे का? प्रशांत दामले सारख्या एखाद्या निर्माता-अभिनेत्याचा अपवाद वगळता मराठी नाट्य संघ, मराठी नाट्य निर्माते यावर काही उपाय काढू शकतील?

अवांतर : मध्यंतरी ’सुबक’ निर्मित ज्या ५ पुनरुज्जीवित नाटकांचे प्रत्येकी फक्त २५ च प्रयोग झाले, त्या प्रत्येक प्रयोगाला… सकाळच्या ८ च्या बुकिंगला…. मायबाप प्रेक्षक पहाटे ५ पासून लाईनीत उभी असायची. त्यांना चहापाणी द्यायचे पुण्यकर्म जरी ’सुबक’ ने केले असले तरी त्यांनी हा ऑनलाईन बुकिंग चा प्रयोग करून पाहायला हरकत नव्हती. 

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “मराठी नाटकांचे तिकिटबुकिंग….

  1. मराठी नाटकांसाठी प्रशांत दामले फान क्लूब तर्फे on line booking ची सोय आहे आणि इतर बर्याच नाटकांसाठी फोन बुकिंगची सोय असते नाटकाच्या जाहिराती मध्ये फोन नंबर देतात त्यावर फोन करून आपली तिकिटे बुक करायची ते row आणि seat number सांगतात मग अर्धा तास आधी जावून आपले नाव सांगून तिकिटे ताब्यात घ्यायची त्या साठी par तिकीट दहा रुपायी जास्त द्यावे लागतात आणि थोडे लवकर जावे लागते मध्ये काही काळ साई साक्षी हि संस्था घरपोच तिकिटे देत असे पण आता ती सोय बंद झाली आहे फोन बुकिंफ खूप सोयीचे पडते पण अनुभव असा आहे कि फक्त २०० रुपयीचीच मिळतात आणि ठराविक row च त्यासाठी reserve असतात

    • सुनिला, नवीन सोईप्रमाणे नाटकाच्या अर्ध्या तास आधीपर्यंत तिकिटे ताब्यात घ्यायची सोय उपलब्ध नाही असे मला काउंटर वर सांगितले गेले. ते फक्त याच नाटकाकरता की सगळ्याच हे कळले नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मागच्या रविवारी एक आठवडा नाटकाचा प्लान उघडला गेला होता, त्याच दिवशी वर्तमानपत्रात दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला होता. पण तुम्ही म्हणता तसेच त्यांच्याकडे विशिष्ट दराची आणि विशिष्ट आसन क्रमांकाचीच तिकिटे उपलब्ध असतात हे वास्तव आहे.

      आपण आवर्जून माझ्या ब्लॉगवर येऊन लेख वाचून त्यावर प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: