यावर आपले मत नोंदवा

विमा – सेवा की फसवणूक?


“नमस्कार, मी इर्डा(IRDA) कस्टमर मॅनेजमेंट डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या अमुक अमुक विमा पॉलिसीवर बोनस जाहीर झाला आहे. पण तो एजंटकडे जात असल्याने तुम्हाला मिळत नाहीये, तुमची इच्छा असेल तर तो बोनस तुम्हाला मिळू शकेल”. हा किंवा अश्या अर्थाचा फोन तुम्हाला आला असेल तर सावधान !

हा फोन इर्डा कडून आलेला नाही. इर्डा ला बळीचा बकरा बनवत, बोनस चे आमिष दाखवत काही विमा एजंट ह्या क्लृप्त्या लढवत आहेत. बोनसाचे आमिष दाखवायचे पण हा बोनस मिळवायचा असेल तर सदर एजंट कडून दुसरी एखादी पॉलिसी घेणे बंधनकारक करायचे. गेल्या वर्षभरात तब्बल ४ हजाराच्या वर अश्या काही पॉलिसी ग्राहकांच्या गळ्यात मारण्यात आलेल्या आहेत. गेल्या तिमाहीत जवळपास १ हजार तक्रारी इर्डा कडे आल्यावर इर्डा आता सावध झाली आहे. सगळ्या विमा कंपन्यांना इर्डा मार्फत चौकशी करण्याचे आदेश गेले आहेत त्याखेरीज स्वतः: इर्डा देखील स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. पण शेवटी विमा कंपन्या देखील जास्तीत जास्त ग्राहकांनी पॉलिसी घेण्यावरच चालत असल्याने त्यांच्याकडून कितपत यावर चौकशी होईल याबाबत शंकाच आहे.

फोन करणारी व्यक्ती स्वतः: ग्राहकाला क्वचितच भेटते. बहुतेक वेळा फोनवरूनच सौदा होता. कागदपत्र घेण्यासाठी एजंट त्याच्याच माणसाला पाठवतो, ऑफिसचा पत्ता विचारला तरी देखील खोटाच दिला जातो. या कलियुगात आपणहून फोन करून बोनसाचे आमिष दाखवत असल्याने फोन करणा-यावर ग्राहक अविश्वास दाखवू धजावत नाहीत. त्या आग्रहाखातर नवी पॉलिसी घेतली जाते पण जुन्या पॉलिसीचा कबूल केलेला बोनस काही मिळत नाही. १५ दिवसांचा ट्रायल कालावधी सुद्धा उलटून गेल्याने घेतलेली पॉलिसी परत देखील करता येत नाही आणि पुढचे हप्ते भरायचे नाही असे ठरवले तर भरलेले पैसे बुडीत खात्यात जमा होतात.

हे सगळे टाळता येईल……कसे?

  1. फोनवर मिळालेल्या माहितीवर विसंबू नका. ती माहिती खरी आहे का हे स्वतः: ताडून पहा. तुम्ही ती आधीची पॉलिसी ज्या कंपनीकडून, एजंट कडून घेतली असेल त्याच्याशी संपर्क साधा.

  2. फोनवरच्या माणसावर विश्वास जरी बसला असला तरी त्याच्याशी प्रत्यक्षात भेटूनच नव्या पॉलिसीबाबत बोलणी करा.

  3. त्याने सांगितलेल्या पॉलिसीचा प्लॅन व्यवस्थित अभ्यासा. घाईघाईत कोणतीही पॉलिसी घेण्याचा निर्णय घेऊ नका. एखादा एजंट लवकरात लवकर अथवा एखाद्या तारखेपूर्वी पॉलिसी घेण्याची घाई करत असेल तर खात्री बाळगा तो फसवत असेल. एक दोन भेटीतच पॉलिसी घेण्याची तयारी दर्शवू नका.

  4. सदर पॉलिसीबद्दल इतरांशी चर्चा करून मग ठरवतो असे सांगा, फसवणारे एजंट या गोष्टीने अस्वस्थ होतात आणि शक्यतो कुणालाही याबद्दल न सांगण्याची विनंती करतात.

  5. इतके सगळे होऊन देखील पॉलिसी घेतल्यावर फसवणूक झाल्याचे, कबूल केलेले फायदे न मिळाल्याचे लक्षात येताच घेतल्यापासून १५ दिवसापर्यंत पॉलिसी परत करण्याचा ग्राहकाचा हक्क बजावावा.

मूळ बातमी इथे वाचता येईल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: