4 प्रतिक्रिया

मुजोरी


गेले काही दिवस म्हणजे साधारणता: एप्रिल,२०१२ पासून रिक्षाच्या इ मीटरचे घोंगडे भिजत पडले आहे. खरं तर परिवहन खात्याने योग्य पाउले उचलली आहेतच, पण शरद राव सारख्या हरामखोर नेत्यामुळे ना धड रिक्षावाले खूश ना धड ग्राहक खूश अशी परिस्थिती आहे. रिक्षांचे भाडे वाढायला हवे…… पण वाजवी. मीटरचा टप्पा देखील कमी करायचा आणि किमान भाडे देखील अव्वाच्या सव्वा वाढवायचे हे कितपत योग्य आहे?

त्याखेरीज मनासारखे भाडे मिळत असूनदेखील रिक्षावाले मीटर मध्ये फेरफार करतच असतात. अगदी इ मीटर मध्ये फेरफार करता येणार नाहीत अशी ग्वाही परिवहन खात्याने देऊन देखील, हे रिक्षावाले त्याला पुरून उरले आहेत. कदाचित या फेरफारामागे….. रिक्षावाल्यांना रिक्षा रस्त्यावर आणण्याकरता …….इ मीटर बसवणे सक्तीचे केले होते…..याचा राग असावा. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार या इ मीटर करता फुकटचे ४-५ हजार त्यांना खर्च करावे लागतात. परिणामी इ मीटर मध्ये फेरफार केले गेले असावे आणि ते केलेल्या रिक्शाचालकांची मुजोरी जास्तच वाढली. इ मीटर लावलेली रिक्षा म्हणजे योग्य भाडेमापक अशी स्थिती निर्माण व्हायच्या ऐवजी इ मीटरमध्ये सुद्धा फेरफार होऊ शकतात हे कळल्याने जनता जनार्दनला फसवणूक झाल्याचीच भावना निर्माण होते.  आजकाल स्मार्ट फोन्स मध्ये अंतर-भाडे मोजणारी काही ऍप्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रिक्षांत बसल्यावर आपोआप ती ऍप्स वापरली जातात, जेव्हा इ मीटर सुद्धा चुकीचे अंतर दाखवतोय हे लक्षात आले की रिक्षावाल्याशी बा-चा-बा-ची होतेच. तेव्हा समस्त रिक्षावाल्यांची जमात निर्लज्जपणे मावा खाऊन किडलेले दात दाखवत जिंकल्याच्या थाटात,”ये मीटर ऐसा ही है” चं पालुपद चालू करतात.  चीड येऊन त्यांची तक्रार करावी तर परिवहन खात्याने दिलेला टोल फ्री नंबर १८००-२२०-११० बर्‍याचदा लागतच नाही. घरी येऊन वेबसाइट वर तक्रार टाईप करेपर्यंत मध्ये वेळ गेल्याने……ती वाफ जिरलेली असते. मला कळतच नाही की…जर हे रिक्षावाले इमानदारीने धंदा करत आहेत म्हणतात……. तर इ मीटर बसवायला विरोध का करावा? की खाई त्याला खवखवे?

भाडे नाकारणे हा तर रिक्षावाल्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. यांना जर भाडी नाकारायचीच आहेत तर रिक्षा चालवतातच कशाला ? खाजगी वाहन चालवा की! कोणी थांबवणार नाही, इ मीटरची कटकट नाही, दंड नाही अन काहीच नाही. ज्या ग्राहकांच्या जिवावर या गमजा हे रिक्षावाले करत आहत त्यांनाच वेठीला धरायचा हा कुठला न्याय?

परवा १३ सप्टेंबर रोजी जवळपास तीन लाख रिक्षाचालक मोर्चा काढणार आहेत. त्यानंतरही शासन बधले नाही तर शरद राव च्या म्हणण्याप्रमाणे १४ सप्टेंबर पासून……..हकीम समितीच्या शिफारशींप्रमाणे………नव्या भाड्याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. ही शरद रावाची मुजोरी नव्हे काय? रिक्षावाल्यांचा नेता झाला म्हणून भाडे ठरवायचा हक्क याला कसा काय? एरवी मोर्चेबांधणी करणार्‍यांना धरपकड करणारे शासन….. जनसामान्यांच्या बाजूने उभे राहायची वेळ आली की बोटचेपे धोरण का स्वीकारते? माझ्या मते कुणाच्याही भरवशावर न राहता जनतेनेच आता या रिक्षावाल्यांना धडा शिकवायला हवा आहे. १३ तारखेला रिक्षावाले स्वतः:च लाक्षणिक संप करणार आहेत ना……मग १४ पासून जनतेनेच रिक्षांत बसणे बंद करायला हवे.  थोडा त्रास होईल आपल्याला सगळ्यांनाच….. पण या मुजोरीला आळा तर बसेल……वाढत्या महागाईने…..सरकारच्या निष्क्रियतेने आधीच जनसामान्य मेटाकुटीला आलेले आहेत…….जो उठतोय तो आपल्याला चिरडू पाहतोय…त्याला वेळीच रोखायला हवं……..करा मग निश्चय……..आजपासूनच……..अगदीच गरज पडल्याशिवाय रिक्षांत बसणार नाही……..प्रत्येकाने महिनाभर हा निश्चय पाळला तरी हे रिक्षावाले रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. इतके दिवस तुमचे भाडे नाकारणारे रिक्षावाले आता तुम्ही म्हणाला तिथे तुम्हाला सोडायला तयार होतील.

करताय मग असा निश्चय? तुम्हाला आवश्यक असलेला चालण्याचा व्यायामही होईल, पैसाही वाचेल( मनी सेव्हड इज मनी गेन्ड, आणि आता भाडे वाडेल ते किमान रु.१५/- असेल, त्यामुळे आतापर्यंत जे रु.१२/- प्रमाणे वाचले असते ते आता रु.१५/- प्रमाणे वाचतील नाही का? 😉  )आणि आपल्यापरीने आपण ह्या मुजोरीला उत्तर दिल्याचे समाधानही मिळेल….बोला, बोला, करताय  का निश्चय ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “मुजोरी

  1. 100% sahamat…. ya rikshawalyancha approach pahun tar mala kadhich automadhye basu naye asa vatate…… majorde aahet….. tyana dhada shikvaylach hava…..

    • अगं सारीका, आज लोकसत्तामध्ये बातमी वाचली की; शासनाने शरद राव आणि टीम ला चपराक दिली आहे. स्वत:हून भाव वाढवून घेतलेत तर पोलिस कारवाईचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: