5 प्रतिक्रिया

शून्य व्याजाचा फंडा


सणासुदीचे दिवस आले की बाजारात सवलतीत खरेदी करा, शून्य व्याजावर खरेदी करा, सुलभ हप्त्यांवर खरेदी करा असे फलक झळकू लागतात. शून्य व्याजावरची खरेदी सगळ्यांनाच भुरळ घालते. पण खरोखरच शून्य व्याजावर हप्त्यांमध्ये आपल्याला खरेदी करता येते का? “देअर इज नथिंग लाईक ए फ्री लंच” हे सूत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग शून्य व्याज आकारणारी ही माणसे खरोखरच शून्य व्याजावर खरेदी करू देतात का?

खरं तर याचं उत्तर नाही असेच द्यावे लागेल.

अशी शून्य व्याजावर खरेदी करताना आपल्याला काही रक्कम ताबडतोब द्यावी लागते आणि उरलेली रक्कम आपण मान्य करू तितक्या सुलभ (?) हप्त्यात द्यावी लागते. याखेरीज आपल्याला काही रक्कम प्रोसेसिंग फी च्या रूपात देखील द्यावी लागते. थोडक्यात हिशोब केला तर हप्त्यांवर पैसे भरण्याची सुलभता असली तर शून्य व्याज आकारले जाणे निव्वळ अशक्य आहे..जी रक्कम आपण प्रोसेसिंग फी पोटी देतो ती त्या वस्तूच्या रकमेत मिळवली तर लक्षात येईल की जवळपास १० ते २० टक्के रक्कम आपण जास्त भरली आहे.

यात दुसरा मुद्दा असा देखील आहे, शून्य व्याजाची रक्कम ही त्या वस्तूच्या एम.आर.पी.(MRP) वर दिली जाते. समजा एखादी वस्तू रु.१९०००/- ला आहे…ती सवलतीत रु.१७,२००/- ला उपलब्ध असेल समजा तर शून्य व्याजावर ती वस्तू घेणार्‍यांना मात्र ती रु.१९,०००/- नेच घ्यावी लागेल. प्रोसेसिंग फी देखील त्याच हिशोबाने द्यावी लागेल.

आता मला सांगा……आहे का ’शून्य व्याजावर खरेदी’ ही संकल्पना खरोखरच अस्तित्वात?

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “शून्य व्याजाचा फंडा

  1. जगात काहीही फुकट मिळत नाही हे पक्के माहिती असूनही लोक ह्या शून्य व्याजाच्या फंड्याला भुलतात हयाचेच नवल वाटते. शेवटी “दुनिया झुकटी है झुकानेवाला चाहीये” ह्याचे पदोपदी प्रत्यंतर येत असते

  2. सद्ध्या पुण्यात ’Orbit’ किंवा तत्सम नावाची एक गृहौद्योग कंपनी शुन्य टक्के व्याजाने गृहकर्ज देण्याचा दावा करते आहे. शेवटी महेंद्रदादा म्हणतात तसे ’जगात काहीही फ़ुकट मिळत नाही’ हेच खरे 😉

  3. जगात काहीही फुकट मिळत नाही, हा एक अलिखित नियम आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: