१ प्रतिक्रिया

विमा कोणी घ्यावा?


“घरातला सदस्य कमावता नसेल तर त्याचा विमा काढायची गरज नाही. पण कमावत्या व्यक्तीचा, त्याच्या उत्पन्नाच्या १० ते १२ पट विमा काढावा. ऑनलाईन विमा स्वस्त पडत असल्याने तोच घ्यावा. न कमावत्या व्यक्तींकरता विम्याच्या गरज नसली तरी घरातील सगळ्यांचा आरोग्य विमा अवश्य काढावा.” हा सल्ला माझा नव्हे.

एका इंग्रजी दैनिकात एका व्यक्तीने एका विमा सल्लागाराला  आपल्या बायको मुलांकरिता विमा सुचविण्यास सांगितल्यावर त्याला मिळालेला हा सल्ला होता.

पण माझे म्हणणे नेमके याउलट आहे. व्यक्ती कमावती नाही म्हणून तिच्या असण्याला काहीच महत्त्वाची नाही? उलट ती व्यक्ती कमावतीदेखील नाही म्हणजे मग तिच्याकरिता विम्याची जास्तच गरज नाही का? आयुष्याच्या अखेरीस आजारपणाच्या वाढत्या खर्चाला भागवण्यासाठी गाठीशी पैसा तर हवा! सगळ्या विमा सल्लागारांचे एक लाडके तत्त्वज्ञान आहे की ‘विमा घेताना संरक्षण आणि गुंतवणूक अशी गल्लत करू नये’. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विमा केवळ संरक्षण म्हणूनच घ्यावा. पण का? जर विम्यात केलेली गुंतवणूक कर सवलत ही देते शिवाय मुदतीअखेर त्यावर मिळणारे उत्पन्न देखील करमुक्त आहे तर विम्याचा विचार चांगला आणि सुरक्षित परतावा देणारी गुंतवणूक म्हणून का पाहू नये ?

ज्याच्यावर घर अवलंबून आहे त्याने स्वत:ची टर्म पॉलिसी काढावी. या प्रकारच्या विम्याचा हप्ता कमी असतो पण मुदत पूर्ण होईपर्यंत  त्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाले तर नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. मात्र मुदत पूर्ण होईपर्यंतविमाधारकाला काहीही झाले नाही तर विम्याचे भरलेले हप्ते परत मिळत नाहीत. अर्थात ही रक्कम मिळावी म्हणून आपल्या जिवलग व्यक्तीचे काही बरे वाईट व्हावे ही अपेक्षा कोणीच करणार नाही. पण वेळ काही सांगून येत नाही त्यामुळे कमावत्या व्यक्तीच्या नावे टर्म पॉलिसी अवश्य घ्यावी.

आता त्या सल्ल्यात म्हटल्याप्रमाणे उरलेल्या व्यक्तींचा फक्त आरोग्य विमा काढून उपयोगी नाही. बरेचसे रोग असे आहेत ज्यांच्यावरच्या खर्चावर आरोग्य विमा खर्चाची रक्कम देत नाही. शिवाय एखादा असाध्य रोग झाला आणि त्याकरता केलेल्या खर्चावर एकदा विम्याची रक्कम मिळाली की पुन्हा त्या रोगाकरता म्हणून विम्याची रक्कम मिळू शकत नाही. एकूणच बर्‍याचश्या आरोग्य विमा कंपन्यांनी थर्ड पार्टी असोसिएट नेमल्यामुळे विमा रक्कम नाकारणे, उशीरा मिळणे हे प्रकार बरेच कानावर येतात. पण म्हणून आरोग्य विमा देखील न काढता उपयोगी नाही.

त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे विमे घेऊन झाल्यावर गुंतवणुकीकरता रक्कम शिल्लक असल्यास मनी बेक पॉलिसी अथवा एंडॉवमेंट पॉलिसी अवश्य घ्यावी. या दोन्ही प्रकारच्या विम्यामध्ये मुदतपूर्तीनंतर आपण भरलेले विम्याचे हप्ते त्यावर दिलेल्या बोनस सकट(असल्यास) एकरकमी परत मिळतात. मनी बॅकमध्ये तर दर पाच वर्षांनी विम्याच्या रकमेच्या १५% रक्कम परत मिळायची सोय आहे.  अजूनही अनेक प्रकारचे विमे विकले जातात, आपली गाज काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे विमा घेणे हे श्रेयस्कर. आयुष्यात जेव्हा मिळकत शून्य असते आणि खर्च वाढलेले असतात तेव्हा हीच पुंजी कामाला येते.

विमा सल्लागार भले तुम्हाला सुरक्षा आणि गुंतवणुकीची गल्लत करून नका म्हणून सांगेलही, आणि तशी ती करूही नये पण म्हणून विम्याचा विचार केवळ सुरक्षा म्हणून न करता  चांगला आणि सुरक्षित परतावा देणारी गुंतवणूक म्हणून करायला हरकत नसावी.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “विमा कोणी घ्यावा?

  1. मनी बॅक मधे पैसे गुंतवण्यापेक्षा एक टर्म पॉलिसी काढून उरलेल्या पैशांची आरडी केली तरीही पंधरावर्षानंतर मनिबॅक पेक्षा दुपप्ट रिटर्न्स मिळतात. स्वतः कॅलक्युलेट करून पहा लक्षात येईल. मनिबॅक मधे हप्ता जास्त असतो, टर्म मधे कमी- तेंव्हा टर्म मधे कमी हप्ता भरून उरलेले पैसे सोन्यात किंवा आरडी मधे दर महा गुंतवावे.. रिटर्न्स खूप जास्त मिळतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: