यावर आपले मत नोंदवा

वॉटपॅड


मान्य आहे की हातात पुस्तक घेऊन….पानं उलटंत लोळून वाचण्यात जी गंमत आहे ती ईबुक्स मध्ये नाही. पण किंडल , टॅबलेट्स यांनी ते सुख सुद्धा आपल्या हाताशी आणून ठेवलं. तरीही हे सुख अजूनही इंग्रजीपुरतंच मर्यादित आहे.युनिकोडामुळे देवनागरी संगणकावर टाईपता आली आणि समोरच्याला जशीच्या तशी दिसली तरी अजूनही ती इ बुकात फारशी सापडत नाही. मराठीत फारशी ईबुक्स निघतच नाहीत. आणि असली तरी ती इमेज पीडीएफ मध्ये रूपांतरितकरून तयार केली जातात. याचा परिणाम असा होतो की संगणकावर जरी मराठी पिडिएफ्स व्यवस्थित वाचता आली तरी टॅबलेट्स किंवा स्मार्ट फोनच्या छोट्या स्क्रीनवर मात्र ती इमेज मोठी करून वाचता येत नाही. इंग्रजी पुस्तके Adobe Reader मधला Text Reflow चा पर्याय वापरून छोट्या स्क्रीनवर सुद्धा आरामात वाचता येतात. पण देवनागरी ईबुक्स करता हा पर्याय वर लिहिलेल्या कारणामुळे वापरता येत नाही. वेगवेगळी ऍप्स उपलब्ध आहेत पण मुळात मराठी ईबुक्सच फारशी नाहीत त्याला काय करणार!

पण नुकतंच वॉटपॅड हे एन्ड्रॉइड ऍप माझ्या पाहण्यात आलं. याची खासियत अशी आहे की….

१) यांची http://www.wattpad.com ही वेबसाइट आहे. त्यावर खाते उघडून तुम्ही स्वतः: युनिकोड मजकूर टाईप करून इ बुक्स तयार करू शकता. समजा तुम्ही लेखक नसाल; पण इतरांचे लिखाण तुम्हाला तुमच्याकडे कॉपी करून वाचावेसे वाटत असेल तर ते ही करू शकता.

२) याची दुसरी खासियत अशी की तुमचे लिखाण तुम्ही खाजगी ठेवू शकता अथवा हवे तेव्हा प्रकाशित देखील करू शकता.

या दोन्ही सुविधा आज कोणत्याही मराठी संकेतस्थळावर मिळतात, त्यात काय विशेष असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. पण मला आवडलेली खासियत पुढे आहे.

३) तुम्ही इथे एखादी अनेक प्रकरणे असणारी कादंबरी, दीर्घकथा टप्प्याने लिहू शकता. हवी ती प्रकरणे खाजगी ठेवू शकता, हवी ती प्रकरणे देखील प्रकाशित करू शकता. आणि मुख्य म्हणजे अश्या पद्धतीने ह्या संकेतस्थळावर प्रकाशित इबुक्स वॉटपॅडच्या एन्ड्रॉइड ऍप च्या माध्यमातून इतरांना उतवून घेऊन सोयीने वाचता येतात. अगदी इंग्रजी ईबुक्स वाचतो त्या पद्धतीने देखील. जशी जशी पुढची प्रकरणे प्रकाशित होतात तशी तशी ती डेटा कनेक्शन च्या माध्यमातून अपडेट करता येतात.

 एकच अडचण आहे, ती म्हणजे फक्त टेक्स्ट स्वरूपातला मजकूरच इथे वापरता येतो…. इमेजेस वापरता येत नाहीत.

त्यामुळे समस्त लेखकू मंडळींना माझे आवाहन आहे की, या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपले जास्तीत जास्त लिखाण या माध्यमात उपलब्ध करून द्यावे.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: