१ प्रतिक्रिया

आपल्या ऍन्ड्रॉईड फोन ची मेमरी कशी वाढवाल


ही पोस्ट ऍन्ड्रॉईड फोन वापरणार्‍यांसाठी आहे. हे स्मार्ट फोन्स स्वत:च्या इन बिल्ट १५० ते २०० एम्बी च्या मेमरीसकट येतात. खेरीज जास्तीत जास्त ३२ जीबी चे मेमरी कार्ड टाकून मेमरी वाढवता येते. आजकाल बरीचशी ऍप्स फोनवर इन्स्टॉल करूनच दिलेली असतात, त्यामुळे सहाजिकच ती फोनच्या १५० ते २०० एम्बीमधली मेमरी कमी करतात. त्यामुळे कालांतराने जेव्हा तुम्ही रोजच्या रोज ही ऍप्स वापरता तेव्हा फोन हळू हळू स्लो व्हायला लागतो. कारण फेसबुक, व्हॉट्सऍप, ब्राऊजर यांसारखी ऍप्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा फेसबुकवर बघितले जाणारे फोटो, व्हॉट्सऍप वर शेअर केले जाणारे फोटोज – व्हिडियो cache, data रुपाने तुमच्या मेमरीमध्ये साठत जातात….आणि फोन वापरण्याकरता लागणारी मेमरी कमी करत जातात…परीणामी फोन स्लो होतो. तीन प्रकारे तुम्ही याचे निराकरण करू शकता.

१) ऍप्स टू एसडी  :- आपल्या फोनवर हे ऍप डाऊनलोड करू घ्या.  त्यामुळे आधी इन्स्टॉल केलेली आणि नवीन इन्स्टॉल करत काही असलेली ऍप्स तुम्ही डायरेक्ट मेमरी कार्डवर इन्स्टॉल करू शकता. त्यामुळे इन बिल्ट मेमरी मधील काही मेमरी वाचू शकेल. सगळीच ऍप्स ट्रान्सफर नाही होणार पण निदान थोडीफार तरी करता येतील.

२) settings मधील Manage Application मध्ये जाऊन तुम्ही रोज वापरत असलेल्या ऍप्स वर क्लिक करा. त्यात ते विशिष्ट ऍप फोनची किती मेमरी वापरत आहे हे कळेल. त्यात ऍप ची व्याप्ती, त्यातल्या Data ची व्याप्ती आणि Cache ची व्याप्ती आपल्याला कळू शकेल. Cache च्या खालीच clear cache म्हणून बटण असेल, ते क्लिक करून त्या ऍप ची cache मोकळी करून घ्या. हे रोजच्या रोज केले तर फोन स्लो होणार नाही.

३) मुद्दा दोन मध्ये ज्या Data व्याप्ती चा उल्लेख केला. तो देखील clear data करून जागा मोकळी करता येईल, पण हे करताना त्या ऍप चे तुमचे फोनवरचे सेटींग जाते, त्यामुळे हे करताना अगदी गरज असेल तरच करा. नाहीतर काय! पुन्हा लॉगिन करून हवे ते सेटींग परत करत बसावे लागते. पण ते फारसे कठीण नाहीये म्हणा. विशेषत: व्हॉट्सऍप वापरता आठवड्यात एकदा तरी हा clear data चा उद्योग मला करावाच लागतो, नुसते cache clear करून भागत नाही.

आता व्हॉट्सऍप चा Data clear करण्यापूर्वी तो मेमरी कार्डवर इतरत्र कसा साठवून ठेवायचा हे पुन्हा केव्हातरी.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “आपल्या ऍन्ड्रॉईड फोन ची मेमरी कशी वाढवाल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: