यावर आपले मत नोंदवा

भेसळमुक्त दूध?


आमच्याकडे रोजच्या वापराला गोकुळ चे गाईचे आणि विरजणाकरता म्हणून एक दिवसाआड अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतो. पण या दोन्ही दूधामध्ये भेसळ असते. मी मुंबई ग्राहक पंचायत पेठेच्या दिवाळी पेठेत गोकुळचे प्रात्यक्षिक पाहिले होते त्यामुळे आमच्याकडे येणार्‍या दुधाच्या पिशव्या रोज तपासून घेते. पण पहिल्यांदा जेव्हा हे लक्षात आले तेव्हा आमच्या दुधवाल्याला खडसावले होते. दुर्दैवाने त्याच्या बायकोच्या बाळंतपणाकरता काही रक्कम त्याने आमच्याकडून उसनी घेतली होती ती अजून फिटायची असल्याने दगडाखाली हात होता. त्याला खडसावून ही फरक पडेना तेव्हा गोकुळ कडे तक्रार केली. गोकुळचा प्रतिनिधी घरी येऊन न उघडलेल्या पिशव्या तपासून गेला, त्याने यात भेसळ होत असल्याचे कन्फर्म ही केले. पोलिस कम्प्लेंट करून फायदा नसतो म्हणाला कारण त्याने त्याला आलेले अनुभव सांगितले. एकाच इमारतीत किमान दहाजण असतील तर डायरेक्ट दूध इमारतीशी उतरायची व्यवस्था करता इथल्या डिलरपाशी बोलून करता येईल असे म्हणाला. पण आमच्या को ऑपरेटीव्ह इमारतीत को ऑपरेशन न देणारे सदस्यच जास्त आहेत. त्यामुळे त्या दूधवाल्याकडून सगळे पैसे वसूल होईपर्यंत रोज पिशव्या तपासून घेणे आणि टॅम्पर्ड पिशव्या आढळल्या त्या ताबडतोब बदलून घेणे इतकेच करू शकतोय आम्ही सध्या.

दूधाची बंद पिशवी पाहिलीत तर वर आणि खाली दोन्ही बाजूंना जी शिवण असते ती एकसारखी असायला हवी. बर्‍याचदा साईडने छोटेसे ब्लेड ने कापून त्यातून दूध काढून घेऊन पाणी मिसळले जाते. पुन्हा मेणबत्तीने ते टोक जुळवले जाते. पण नीट पाहिले असता शिवण बदललेली कळते.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: