4 प्रतिक्रिया

अप्रकाशित लेख आणि कवितांना ’ईबुक्स’ नाहीतर ’ब्लॉग’ चा आधार


सोशल नेटवर्किंगचे माध्यम हाताशी असल्यावर प्रतिभेला धुमारे फुटणं नवीन नाही. कोणतीही घटना घडो…..भडाभडा बोलावे तसं आपली मतं लोक फेसबुकवर भसाभसा मांडत असतात. त्याची कुणी दखल घेतली नाही तर ज्या ग्रुपवर सभासद आहेत तिथे देखील आपल्या कविता, लेख असं काय काय मांडलं जातं. मग तिथून कोणीतरी ते साहित्य चोरतं आणि खुशाल आपल्या नावावर खपवतं. कधीतरी मूळ मालकाला पत्ता लागतो देखील पण आगपाखड करण्याशिवाय हातात काही राहिलेलं नसतं, कारण तोवर चोर त्या साहित्याचा मालक म्हणून प्रसिद्धीस आलेला असतो.

ब-याचदा सोशल नेटवर्किंग वर या लेख / कवितांना इतका तुफान प्रतिसाद मिळतो की, त्यांचं एखादं पुस्तक प्रकाशित करण्याची खुमखुमी येते. मराठी वाचक आपलं पुस्तकं विकत घेऊन वाचत आहेत, इतरांना भेट देत आहेत 🙂 असं स्वप्नरंजन ते करायला लागतात देखील. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी वेगळी असते. पुस्तकं कितीही ताकदीचं असो,  नवलेखकांना ते पुस्तक पदरमोड करूनच पुस्तकं छापावं लागतं, हे कोणताही लेखक अमान्य करू शकणार नाही.

माझ्या ओळखीतल्या एका वयस्कर आजोबांनी एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला. ते पुस्तक हिंदू धर्माविषयी होतं त्यामुळे सरसकट वाचक त्याला मिळतीलच असे नव्हते. त्यांच्या ओळखीच्याच एका प्रकाशकांनी त्याच्या एक हजार कॉपीज काढायची तयारी दाखवली त्याकरता त्या आजोबांकडून सत्तर हजार घेतले, पुस्तकाची किंमत रु.३००/- प्रत्येकी अशी छापली आणि एकूण हजार कॉपीज पैकी फक्त तीनेशी प्रती त्यांच्या हातावर टेकवल्या. आता ते आजोबा कुठे ती तीनशे पुस्तके विकायला जाणार? बरं, प्रकाशकांना काहीही न करता हातात रू.३००/- प्रत्येकी वाल्या सातशे कॉपीज मिळाल्या त्या सगळ्या अगदी सवलतीने रू.१००/- ला जरी दुकानात विकल्या तरी प्रकाशकांना त्यात रू.७०,०००/- चा फायदा झाला. मूळ छपाईचा खर्च आजोबांकडून वसून केलाच होता.  त्या सातशे प्रती विकल्या जरी नाही गेल्या तरी रद्दीत विकून काही पैसे तरी प्रकाशक कमावू शकतोच. आणि कुणी सांगावे त्यांनी एकूण हजार प्रती छापल्या असतील तरी का? कदाचित कराराप्रमाणे फक्त ३०० प्रती काढून आजोंबाना दिल्या असतील. सहाजिकच सातशे प्रती छापायचा खर्च कमी आणि त्या विकायची यातायात पणी नाही.

अश्या घटना पाहील्या; की वाटतं माणसं मोफत किंवा कमी खर्चाच्या सोई उपलब्ध असताना उगाचच भरमसाठ खर्चाच्या मागे का धावत बसतात ? आधी डिजिटल पुस्तक काढून, किती प्रतिसाद मिळतोय हे पाहून  मग ते छापाता येईल.

मला असे वाटते की दोन पर्याय आहेत.

१)छापील पुस्तक काढण्यापेक्षा आधी डिजिटल पुस्तक (pdf format) काढून पहावे.

 • माफक किंमतीत विकायला ठेऊन ते डाऊनलोड करू न देता किंवा पासवर्ड टाकून डाऊनलोड करू देता तुम्ही जनमत आजमाऊ शकता. तुफान विकलं जातयं हे लक्षात आले तर छापता देखील येईल.

२) pdf चा पर्याय मान्य नसेल तर तुमच्या निवडक/लेखांचा लेखांचा ब्लॉग तयार करता येईल. ब्लॉगचा फायदा असा की….

 • डोमेन न घेता मोफत ब्लॉग सुरू करता येईल,
 • तुमचा तुम्हाला हवा तेव्हा हवा तसा अगदी ईमेलद्वारे देखील अपडेट करता येईल.
 • आजकाल साहित्य चोरी सरसकट होत असल्याने काही उपाय योजून ब्लॉगवरचे लेख कॉपी करता येणार नाहीत अशी सोय (ही अर्थातच फ़ुलप्रुफ नाही, पण सामान्य वाचकाकडून कॉपी करणे टाळता येईल) करता येईल.
 • मर्यादीत लोकांनाच ब्लॉगवर प्रवेश देता येऊ शकेल. त्याकरता हवी तर तुम्ही माफक फी आकारू शकता.
 • त्याखेरीज तुमच्या पोस्ट्स देखील पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवू शकता.

काही मार्गदर्शन हवे असल्यास अवश्य संपर्क साधा.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “अप्रकाशित लेख आणि कवितांना ’ईबुक्स’ नाहीतर ’ब्लॉग’ चा आधार

 1. Definitely helpful tips for newbie bloggers like myself. Thanks for sharing it.

 2. नमस्कार, चांगली माहिती दिलीत. खूप उपयुक्त.

 3. नमस्ते श्रेयाताई…
  पुस्तकाचं वाचून गंभीर व्हायला झालं …
  ७ ० , ० ० ० /- ही रक्कम मुळात क्रूर वाटली …
  पण तुमच्या या लेखाने बरयाच गोष्टी सामान्य वाचकांना कळतील !
  धन्यवाद … !संगीता शेंबेकर

  • ब्लॉगवर आपले स्वागत आहे. इथे येऊन पोस्ट वाचल्याबद्दल आणि त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्याबद्दल धन्यवाद. संगीताताई, मी तुमच्यापेक्षा लहान असल्याने मला अहोजाहो करू नका प्लीज. तुम्ही देखील छान कविता करता, त्यांचा एखादा सुंदरसा ब्लॉग का नाही तयार करत?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: