7 प्रतिक्रिया

लेखकांनी स्वतःचा ब्लॉग सुरू करायला हवा….


images

 

 

 

नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लेखन हे प्रभावी माध्यम आहे पण ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लेखक, प्रकाशक नेट सेव्ही झाले आहेत. अनेक प्रकाशक वेबसाइटच्या माध्यमातून पुस्तकाची जाहिरात आणि विक्री करत आहेत. पण लेखक मात्र अजूनही म्हणावे तितके या माध्यमाला आपलेसे मानत नाहीत. पण वाचकांशी संवाद साधणे, स्वत:च्या आगामी लेखनाची स्वत:हून जाहिरात करून वाचकांची उत्सुकता चाळवणे, क्वचित वाचकांची मते जोखणे, कुणाही प्रकाशकाच्या मागे न लागता स्वत:च्या साहित्याची ऑनलाईन विक्री करणे हे अनेक मुद्दे लेखक लक्षात घेत नाहीत.

आजकाल लेखक, लेखाखाली स्वत:चा ईमेल आयडी आवर्जून देतात, कधीतरी संपूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक देखील सतो. सहाजिकच वाचकांनी, प्रकाशकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा या हेतूनेच तो दिलेला असतो. मग स्वत:चा ब्लॉग काढून वाचकांशी संपर्कात रहाण्याची सुवर्णसंधी का सोडायची?

यंदाच्या दिवाळी अंकांच्या किमती बघता, इतका खर्चिक अंक काढण्यापेक्षा ब्लॉगसारखे स्वस्त आणि कालानुरूप बदलते माध्यम लेखकांनी / प्रकाशकांनी निदान प्रायोगिक तत्वावर हाताळून पहायला हरकत नसावी.

मी स्वत: एक ब्लॉगर, ब्लॉग डिझायनर, कंटेट राईटर आहे, काही ई मॅगेझिन्स देखील मी तयार केली आहेत. आपणास या बाबतीत काही मदत हवी असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा.

My Personal Blog – [https://majhimarathi.wordpress.com]
My Website – [http://digitalsoltions.netbhet.in]
Promote your product thru me –
[http://digitalsolutions.netbhet.in/Help]

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

7 comments on “लेखकांनी स्वतःचा ब्लॉग सुरू करायला हवा….

  1. पूर्णपणे सहमत. मराठी ब्लॉगर्स इतर भाषांच्या तुलनेत खूपच मागे पडलेले दिसतात. आणि यात गूगलचा देखील दोष आहे.

  2. इंजिनीयरस् ने सुद्धा ब्लॉग लिहायला हवे।

    • काहीच हरकत नाही…. ज्यांना ज्यांना काही सांगावेसे वाटते, लिहावेस वाटते त्यांनी त्यांनी ब्लॉग माध्यमाचा आधार घेऊन ते मांडायला हवे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे इंजिनिअर्सनी देखील ब्लॉग लिहायला सुरूवात करावी, आपल्या शिक्षणाबद्दल लिहावे, करिअर मधल्या अडचणीविषयी लिहावे, त्यातून काढलेल्या मार्गाविषयी लिहावे. एक प्रकारे तुमच्याच मार्गावर चालू इच्छिणा-यांना ते डॉक्युमेंटेशन ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: