यावर आपले मत नोंदवा

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! २


मध्यंतरी मी माझ्या लेकाबरोबर काही कामाकरता बाहेर गेले होते. जाताना आम्ही शॉर्टकट म्हणून कोर्टाच्या आवारातून चाललो होतो. आम्ही शिरल्या शिरल्या तिथे ठिकठिकाणी ग्रुप करून उभे असलेले वकील काही ‘बकरा’ 😉 मिळतोय की काय आणि तो कोणाला मिळतोय याकडे आशाळभूतपणे पहात होते. तिथे जवळपास पन्नासएक तरी काळे डगले घातलेले वकील गि-हाईक शोधत उभे होते. माझ्या मुलाला आश्चर्य वाटले. इतके कठीण वकीलीचे शिक्षण घेऊन जर तुम्हाला कोर्ट बाहेर ग्राहक शोधावे लागणार असतील तर काय अर्थ आहे असे त्याचे म्हणणे होते. पण मला त्या वकीलांच्या वागण्याचे वावगे वाटले नाही. एक तर घरबसल्या आपल्याला आपली रोजीरोटी कुणीही आणून देणार नाही. म्हणजे त्याकरता बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. पण बाहेर पडायचे म्हणजे एखाद्या कोप-यात दुकान थाटून सुद्धा उपयोगी नाही कारण आपला व्यवसाय काय आहे हे लोकांना कळावे यासाठी आपला नियमित जनसंपर्क असणे अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात लोकांना आपल्याबद्दल माहिती होण्यासाठी लोकांनी आपल्यापर्यंत पोचायची वाट बघत न बसता आपण त्यांच्यापर्यंत पोचणं आज खूप महत्वाचे झाले आहे.

इथे मी जेव्हा व्यवसाय असा उल्लेख करते, तेव्हा ढोबळमानाने त्याचा अर्थ म्हणजे एकतर ती आपण देऊ केलेली सेवा असते किंवा आपण करत असलेल्या एखाद्या उत्पादनाची विक्री असते. वर उल्लेखलेला व्यवसाय हा सेवा या सदरात येतो त्यामुळे प्रत्यक्ष रित्या दुकान न थाटता देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो. पण जर आपण एखादे उत्पादन विकण्याचा व्यवसाय करत असू तर काय? तर अर्थातच ते उत्पादन लोकांना दिसण्याकरता, त्यांनी येऊन पाहण्याकरता दुकान थाटणे भागच आहे नाही का? उदाहरणार्थ आता समजा मी उत्तम चवीच्या, पातळ, मऊसूत रेशमासारख्या अश्या पुरणपोळ्या करू शकते आणि त्या करून विकायची जर मला हौस असेल तर मी काय करायला हवं? एकतर ओळखीच्या लोकांना त्या खायला घालून; त्यांच्या कानावर घालायला हवे की मी ऑर्डर्प्रमाणे उत्तम क्वालिटीच्या पुरणपोळ्या करून देऊ शकते. पण तितक्यानेच भागेल का? शिवाय पुरणपोळीसारख्या केवळ एका प्रॉडक्ट करता दुकान घ्यायची जोखीम कोण घेणार? म्हणून मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या पुरणपोळ्या पोचण्याकरता मला एखाद्या खाद्यपदार्थांच्या दुकानाशी बांधील रहावं लागेल, त्यांच्याकडे नियमित पोळ्या करून देऊन, माझ्या पुरणपोळ्यांना कसा काय खप आहे याचा अंदाज घ्यावा लागेल. पुरणपोळी हा बारमाही खपेलच असा पदार्थ नाही. त्यामुळे त्या व्यतिरिक्त इतर पदार्थांचीही गरज लागते आहे का? याचा अदमास घेऊन, कोणते पदार्थ लागू शकतात आणि मी ते करून देऊ शकते का? याचाही मला विचार करावा लागेल. हा खाद्यपदार्थ (उत्पादन) असल्याने तो नुसता पाहून आवडला आणि येता जाता लोकांनी विकत घेतला असे होणार नाही. स्वत: चाखून पाहिल्याशिवाय ग्राहक तो पदार्थ घेतीलच असे नाही, मग ग्राहकांनी तो चाखून पहावा म्हणून काही सॅंपल उपलब्ध करून देता येईल का यावर काही उपाय शोधावा लागेल. थोडक्यात एक हौस म्हणून सुरू केला तरी त्या व्यवसायात यश आणि पैसा मिळवायचे असेल तर लोक आपल्यापर्यंत कधी येतील याची वाट बघत न बसता आपणंच त्यांच्याकडे ऍप्रोच झाले पाहिजे.

आता या दोन्ही केसेसमध्ये आपला ग्राहक कोण असेल याची निश्चित खात्री देता येऊ शकत नाही. काही सेवा  किंवा उत्पादने ही काही विशिष्ट ग्राहकांकरता असतात तेव्हा त्यांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अपिल होतील अश्या जाहिरात करणं एक वेळ सोप्पं पडतं पण वकीलाची सेवा काय किंवा पुरणपोळी्ची गरज कुणालाही केव्हाही लागू शकते. नेमका ग्राहकवर्ग जेव्हा डोळ्यासमोर नसतो तेव्हा जनरलाइज्ड मार्केटींग करणं खूप अवघडं असतं पण तिथेच आपल्या कल्पनाशक्तीचा कस लागू शकतो. आम पब्लिक ला आपली सेवा / आपले उत्पादन कसे, कुठे आणि कुणी वापरणे उपयुक्त आहे हे आपणंच त्यांना दाखवून द्यायचं असतं. आपल्या व्यवसायाचा ज्याच्याशी संबंध आहे असा थोडासा हटके मुद्दा घेऊन त्या दॄष्टीने केलेली जाहिरात जास्त फायदेशीर ठरू शकते. उगाच नाही सर्फ एक्सेल च्या “दाग अच्छे है!” च्या जाहिराती यशस्वी होत असतात.

Advertisements

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: