यावर आपले मत नोंदवा

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! 3


पारंपारिक जाहिरातबाजी

मागच्या लेखांमधून आपणimage-13-600x460 आपल्या व्यवसाया्च्या आपण करत नसलेल्या पण अतिशय आवश्यक असलेल्या  मार्केटींग विषयी वाचले. या लेखात पाहूया की मार्केटींग कशा प्रकारे करता येईल. आजपर्यंत आपण जाहिरातीचे जे प्रकार पाहिले आहेत, ते सगळे पारंपारिक प्रकार आहेत. म्हणजे माझा व्यवसाय जर अगदीच घरगुती स्वरूपाचा असेल तर मी पॅम्प्लेट्स छापून पेपरवाल्यामार्फत घरोघरी वाटीन. माझा व्यवसाय जर मी रहात असलेल्या भागापुरता मर्यादीत असेल तर बहुदा मी माझ्या भागात एखाद्या खास जाहिरांतीकरता असलेल्या वार्तापत्रात माझी जाहिरात देईन. माझा व्यवसाय त्याही पेक्षा मोठा असेल तर अनुक्रमे एखादे मासिक, एखादे स्थानिक वृत्तपत्र, संपूर्ण राज्यभरात वाचले जाणारे वृत्तपत्र, संपूर्ण देशभरात वाचले जाणारे वृत्तपत्र, स्थानिक रेडीयो वाहिनी आणि सर्वात शेवटी टि.व्ही. वर जाहिराती देईन. आपल्या व्यवसायाचा आकार आणि त्या्च्याकरता किती खर्च करावा हे गणित प्रत्येकानेच ठरवलेले असते. त्यानुसार ती व्यक्ती तसा तसा खर्च करत असते. यापैकी पॅम्प्लेट्स छापणे आणि वाटणे हाच खर्च त्यातल्या त्यात कमी आहे. पण यात दुसरा एक मुद्दा आहे तो असा की, अश्या पारंपारिक पद्द्धतीने दिलेली जाहिरात किती काळ लोकांच्या स्मरणात राहाते? जितका जास्त काळ लोकं आपले उत्पादन / सेवेबद्दल वाचतील-पाहातील तितक्या जास्त वेळा ते त्यांच्या मनावर बिंबले जाईल हे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. पण याचाच दुसरा अर्थ असा की जास्तीत जास्त वेळा आपल्याला जाहिरात म्हणून लोकांच्या नजरेस किंवा कानावर पडू द्यावे लागेल त्यामुळे सहाजिकच खर्च वाढेल.  

एक तुलना म्हणून सांगते, आपल्या राज्य पातळीवर वितरण असणा-या एखाद्या वृत्तपत्रात एक छोटीशी २० शब्दांची जाहिरात आज रु.१०००/- ला पडते. अश्या किती जाहिराती दिल्याने आपला व्यवसाय भरभराटीला येईल असे वाटते? indexएकदा बरकत आल्यावर जर जाहिराती करणे सोडून दिले तर नुसत्या आधी केलेल्या जाहिरातींवर व्यवसाय वाढू शकेल? तसे जर असेल तर मोठ्या मोठ्या ब्रॅंडेड कंपन्या वेगवेगळी माध्यमे वापरून आपली जाहिरात का करत असतात? एकदा तो ब्रॅंड प्रसिद्ध झाला तरी सुद्धा मोठे मोठे ब्रॅंड्स टी.व्ही., वृत्तपत्रे यांच्यामार्फत जाहिराती करतच असतात कारण त्यांना माहिती असतं की आपण जाहीरात करणं थांबवले तर कालांतराने बाजारात आपलं स्थान शिल्लक रहाणार नाही. म्हणूनच वेगवेगळ्या कल्पना घेऊन, त्यावर वारेमाप पैसा खर्च करून प्रत्येक ब्रॅंड आपले अस्तित्व टिकवू पहात असतो. मग कधी सणांच्या निमित्ताने ’कुछ मिठा हो जाये’ तर कधी ’कोई अच्छा काम करने से पहले मिठा हो जाये’ अश्या क्लृप्त्या लढवत नव्या नव्या जाहिराती आणाव्याच लागतात, कारण एकाच प्रकारची जाहिरात बघून प्रेक्षक / वाचक कंटाळताच.

आपण मात्र छोटे उद्योजक असल्याकारणाने या ब्रॅंडच्या तुलनेत इतका भरमसाठ पैसा जाहिरातीकरता नाही खर्च करू शकत. मग ग्राहकांकडे तर नियमित आपले उत्पादन पोचावे पण खर्चही कमी व्हावा ही आपली सगळ्यांची अपेक्षा रास्त आहे नाही का! असे असेल तर मग ’सोशल मिडिया’ ला हाताशी धरून आपण आपल्या उत्पादनाचे मार्केटींग कमी खर्चात किंवा काही वेळा मोफतही करू शकतो.

नुसताचा खर्च कमी व्हावा हा एकच फायदा नाहीये. तर सोशल मिडिया मार्केटींग चे अनेक फायदे आहे जे आपण पुढच्या लेखातून पाहूच पण त्याहीपेक्षा 3G इंटरनेटच्या गतीमुळे आणि मोबाईल च्या स्मार्टनेसमुळे आज अवघं जग आपल्या हातातल्या फोनमध्ये सामावले गेले आहे. लोकं सतत कनेक्टेड असून फेसबुonline-advertising-methodsक, ट्विटर सारख्या सोशल मिडीयावर लिहिते झालेले आहेत. विविध विषयांवरच्या चर्चा ठिकठीकाणी वाचायला मिळत असतात , त्यावरचे व्हिडियोज बघायला मिळतात. गुगलवर एखादा सर्च मारा,  त्याविषयीचे इतके व्हिडियोज, फोटोज, माहिती आपल्यापुढे आणून टाकली जाते की ती विचारायची सोय नाही. असे असताना आपण त्याचा वापर करून न घेता मागे राहिलो तर कुठच्याकुठे फेकले जाऊ. आज जर आपल्या व्यवसायाची वेबसाइट, ब्लॉग, फेसबुक पेज, ट्वइटर अकाउंट, युट्युब पेज नसेल तर आपल्याला फारसे कोणी विचारत नाही. याचे कारण असे की, लोकांना जे हवे आहे ते आपल्याकडे आहे की नाही, आपण त्यांच्या उपयोगाला येऊ शकतो की नाही, आपली उत्पादने यापूर्वी ज्यांनी वापरलेली आहेत त्यांना ती कशी वाटली हे तपासून बघायला आपण आपल्या ग्राहकांना काही मार्गच ठेवलेला नाही. तेव्हा जितक्या लवकर आपण व्यवसायाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करू तितका तो आपल्या ग्राहकांना पारदर्शी वाटेल, अन्यथा सोशल मिडीयाच्या वावटळीत कुठल्या कुठे जाऊन पडू याचा आपल्याही पत्ता लागणार नाही.

Advertisements

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: