यावर आपले मत नोंदवा

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! ४


मी आजकालच्या व्यवसायांना बसल्या जागी लोकांपर्यन्त पोचण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साधनांचा उल्लेख केला होता. त्यातले एक प्रामुख्याने वापरले जाणारे आणि आपल्या मार्केटिंग तंत्राला पूरक ठरणारे मुख्य साधन म्हणजे आपल्या व्यवसायाची व्यावसायिक वेबसाइट. प्रत्येक व्यवसायानुसार आपल्या वेबसाइटवर काय माहिती असावे हे ठरते. पण मुख्यतः

  1. About us – उद्योजक म्हणून आपल्याबद्दल थोड़ी माहिती, आपली ध्येय, आणि आजपर्यन्त मिळवलेली पत
  2. Products – आपले देऊ करत असलेली सेवा / उत्पादन, ग्राहकांनी आपल्याकडूनच त्या का घ्याव्या?
  3. Contact Us – आपली सेवा/उत्पादने कुठे उपलब्ध आहेत त्याचा ठावठिकाणा, अडचणीच्या काळात ग्राहकांनी कुठे संपर्क करावा त्याचा ठावठिकाणा.
  4. फ़ोटो गँलरी किंवा विडियोज

अशी काही ठराविक पेजेस तर असतातच. पण या व्यतिरिक्त इतरही पेजेस त्यात असू शकतील.

वेबसाइट तयार करण्याकरता काय लागते?

  1. जागा (वेब स्पेस)
  2. नाव (डोमेन नेम)
  3. जागेकरता सुरक्षा व्यवस्था (सिक्युरिटी)
  4. तंत्रज्ञ (वेब डिझायनर)

या चारही गोष्टींकरता आपल्याला पैसा मोजावा लागतो आणि त्यातल्या पहिल्या तीन गोष्टींकरता तर दरवर्षी मोजावा लागतो.

वेबसाइट असण्याचे फायदे काय?

  1. ब-याचदा ग्राहक आपण विकत असलेल्या उत्पादनांच्या / सेवांच्या शोधात असतात. वेबसाइटच्या माध्यमातून आपण एकमेकांपर्यत पोचू शकतो.
  2. अनेकदा आपले उत्पादन किंवा सेवा आपण स्थानिक पातळीवरच विकत असतो. आपल्याला ते गाव-जिल्हा-शहर-देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर विकण्याची संधी मिळू शकते.
  3. आपण सेवा देणारे, कोणतेही उत्पादन विकत नसलो तरी आपल्या व्यवसायाची माहिती ग्राहकांशी शेअर करुन त्यांच्याबरोबर एक प्रकारची बांधीलकी निर्माण करू शकतो.
  4. आजकाल ग्राहक पैसा टाकून सेवा किंवा वस्तू विकत घेताना त्याकरता ऑनलाइन शोध घेतल्याशिवाय,  वेगवेगळ्या वेबसाइट्स वरुन माहिती काढल्याशिवाय घेत नाहीत. अश्यावेली आपल्या वेबसाइटला भेट देऊन आपल्याला त्यांच्याकडून व्यवसाय मिळण्याची शक्यता वाढते.
  5. इंटरनेट 24 x 7 चालूच असते. त्यामुळे आपले ऑफिस / दुकान जरी बंद असेल तरी वेबसाइट मार्फत आपल्या ग्राहकांना आवश्यक ती माहिती मिळू शकेल.
  6. वेबसाइटवर दिलेल्या ईमेल वर किंवा एखादा फॉर्म भरून आपले ग्राहक आपल्याशी संपर्क साधू शकतात.
  7. हातात स्मार्ट फोन्स आणि त्यावर डेटा पैक गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपली माहिती बसल्या बसल्या कुठेही आणि केव्हाही शोधू शकतात. आपली वेवसाइट रिसपॉन्सिव्ह* स्वरूपाची असेल तर मोबाईलवरसुद्धा आपले ग्राहक त्यावरची माहिती सहज वाचू शकतात.
  8. आपल्या व्यावसायिक अडचणी, त्यावर आपण केलेली मात अश्या नियमित गोष्टीरूपात दिलेली माहीती ग्राहक आवर्जुन वाचतात आणि आपल्याशी व्यवसायिक बांधीलकी जपतात.
  9. जाहिरातींवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा एक वेबसाइट तयार करणे, ती नियमित अपडेट करणे आणि सोशल मीडिया वरुन आपले मार्केटिंग करणे केव्हाही कमी खर्चिकच आहे.
  • *रिसपॉन्सिव्ह स्वरूपाच्या वेबसाइट डेस्क्टॉप, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट फोन्स अश्या कोणत्याही माध्यमावर तितक्याच सहजतेने वाचता येतात. कितीही इंची स्क्रिन असला तरी या प्रकारच्या वेबसाइट्स त्या त्या स्क्रिननुसार स्वत:ला जुळवून घेतात.

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: