यावर आपले मत नोंदवा

पुस्तकं ‘मायावी जगा’तली! (राजेंद्र खेर) | सकाळ


आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आलेल्या लेखातले ई बुक्स च्या बाबतीतले सगळेच तोटे पटण्यासारखे नाहीत. काही मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी त्यावर काही तोडगे निघू शकतात. त्यातल्या काही मुद्द्यांवरची माझी मते…
1. मुद्दा 4,5 – नवोदित लेखकांची पुस्तके सहजी खपत नाहीत, आपल्याच ओळखीच्या माणसांना एक तर ती फुकटात वाटावी लागतात. अश्यांना तर ई बुक्स म्हणजे पर्वणी वाटायला हवी. आपल्या पुस्तकातला टर्निंग पॉइंट असलेला भाग पीडीएफ ने किंवा प्लेन टेक्स्ट माध्यमातून ईमेल द्वारा जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचवणे हा एक मार्केटिंगचा फंडा ठरू शकतो.
2. मुद्दा 6,9,2,3 – उलंट पुस्तक फक्त ई बुक स्वरूपातच आहे आणि छापील आवृत्तीच नाही म्हटल्यावर वाचक ई बुक्स कडे वळतील.  अर्थात मराठी ई बुक्स साध्या अडोब रीडर मध्ये वाचता येणारी असावीत, तर ती वाचकांकडून सहज स्वीकारली जातील. एखाद्या विशिष्ट app मध्येच वाचावी लागत असतील तर वाचक टाळाटाळ करतात. अडोब रीडर मोफत उपलब्ध आहे आणि छोटेसेच app असल्याने फोनमधली फार जागा व्यापत नाही. खेरीज फोन-संगणक-टॅब अश्या कोणत्याही किंवा सगळ्या डिव्हाइस वर वाचता येत असल्याने आपल्या क्लाऊड स्टोअरेज किंवा त्या त्या डिव्हाइस वर ई बुक्स स्टोअर करुन ठेवून कधीही वाचता येतात.
3. मुद्दा 7 – पीडीएफ स्वरुपात ई बुक तयार करून आपले आपल्याच विकायचे असल्याने रॉयल्टी चा प्रश्नच येत नाही. आपणच आपली किंमत ठरवा आणि विका. जो पैसा मिळेल तो सगळ्या आपला आपल्यालाच.
4. मुद्दा 8 – अडोब रीडर मध्ये जेवढे फोर्मेटिंग कमी तितके पुस्तके वाचणे सोप्पे असते. अडोब रीडर मधला ‘टेक्स्ट रिफ्लो’ पर्याय ठेवून फोनवर पिडीएफस् वाचणे किती सुखावह आहे ते वाचून पाहिल्याशिवाय कळणार नाही. मात्र त्याकरता ई बुक मध्ये कमीत कमी formatting असायला हवे.
5. मुद्दा 1 – हातातल्या डिव्हाइस वर मराठी यूनिकोड मध्ये टाईप केलेली पुस्तके असणे, ती केव्हाही-कुठेही आपल्या हातातल्या मोबाइलावर सुध्दा वाचता येणे, रात्रीच्या अंधारात आपल्याला झोप येत नसताना मराठीतली उत्तमोत्तम पुस्तके आपल्या मोबाइल मध्ये स्टोअर असणे आणि त्यांच्या सोबतीत आपला वेळ जाणे यांमधले सुख प्रत्यक्ष वाचून पाहिल्याशिवाय कळणार नाही. हातात 5.5 इंची डिस्प्ले असलेले मोबाइल्स, कमीत कमी 4 जीबी ची इंटर्नल मेमरी अश्या सुविधा हाताशी असताना केवळ मराठी ई बुक्स काढली जात नाहीत म्हणून वाचता येत नाही यासारखे दुदैव ते काय!

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: