यावर आपले मत नोंदवा

अलिबाबा आणि चाळीशीतले चोर[नाटक]


image आज ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ नाटक पाहीले.  नाटकाचे नाव वाचून साधारण कल्पना आलीच होती की नाटक कोणत्या विषयावर असू शकेल. शिवाय नाटकाच्या पहिल्या पाच मिनिटांत घडलेल्या घटनेचा आणि शेवटी ज्या छोटाश्या कथेने त्याचा उलगडा होतो ती कथाही आधीच माहीत होती. त्यामुळे मध्यांतराच्या आसपास या गोष्टीवरच हे नाटक बेतलेले असेल अशी खात्री झाली होती. फक्त हे सगळं कशासाठी हा उलगडा व्हायचा बाकी होता, तो अर्थातच नाटकाच्या शेवटी झाला. कुठल्याही वृत्तपत्रात आलेले परीक्षण न वाचता नाटक पहायला गेल्याने वेगळ्याच विषयावरचे नाटक पाहिल्याचा आनंद घेता आला. नाटकातले संवाद चांगलेच बोल्ड वाटले. बोल्ड अशाकरता म्हणीन की हे नाटक पहायला मी माझ्या दोन मोठ्या बहिणींबरोबर आले होते. मी चाळीशी आणि त्यांनी पन्नाशी पार केलेली असली तरी त्यांच्या शेजारी बसून नाटकातल्या द्वयर्थी संवादांना हसून दाद देताना नाही म्हटले तरी ऑकवर्ड वाटतच होते. नाटकातला ‘पराग’ म्हणतो त्याप्रमाणे चाळीशीतल्या आमच्या पिढीची गोची झालीय खरी.

बाकी नाटकाबद्दल बोलायचं तर सगळे कलाकार, लेखक, दिग्दर्शक मातब्बर असल्याने क्वालिटी बाबत शंकाच नाही. संवाद भाव खाऊन जातात आणि त्यातही शलाका-पराग आणि वरुण-सुमित्राचे प्रसंग अंतर्मुखही करतात. सीमा देशमुख यांची ‘शलाका’ अफलातून. वरुण आपल्या बायकोचे रंगवित असलेल्या चित्रापेक्षा एक वेगळंच पण हुशार व्यक्तिमत्व शलाकातून जाणवतं. 

या नाटकाचे अविभाज्य अंग असलेला निर्जीव पण तरीही बरच काही बोलणारा ब्लॉग ही कल्पना मी स्वत: एक ब्लॉगर असल्याने खूप आवडून गेली. नॉन टेकी व्यक्ती सुद्धा ब्लॉग तयार करू शकते आणि मुख्य म्हणजे कोणतेही कारण असो पण आपलं म्हणणं ठामपणे अगदी खाजगीत सुद्धा मांडण्याकरता आणि त्यावर काही ठराविक लोकांशी संवाद साधण्याकरता ब्लॉग या माध्यमाचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे प्रेक्षकांपर्यन्त पोचवलं जातंय याचा विशेष आनंद वाटला. या नाटकाचे फेसबुक पेज आहे. प्रेक्षकांनी तिथे प्रतिक्रिया द्याव्यात ही अपेक्षा आहे.

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: