Digital Solutions

Advertisements

समाज माध्यमे आणि ब्लॉग

एखादा नवीन ब्लॉग सुरु झाला, की लेखकाला वाटायला लागतं की आपला ब्लॉग झटपट प्रसिद्धीला यावा, हजारो वाचक आपल्याला पटापट मिळावेत, त्या लेखांचे पुस्तक काढावे आणि त्यातून अर्थप्राप्ती व्हावी.

वेबसाइटचे रूपांतर ब्लॉगमध्ये करा.

Mobilegeddon हा शब्द हल्लीच कानावर आला असेल. त्याविषयी काहीच माहिती नसेल, काहीच वाचले नसेल तर फोर्ब्सच्या वेबसाइटवरचा हा लेख वाचा. पण आपल्या मराठी वाचकांकरता तूर्तास इतकेच सांगीन की, यापुढे तुमची वेबसाइट/ब्लॉग जर मोबाईल फ्रेंडली नसेल तर गुगल कडून त्याची दखल घेतली जाणार नाही. तुमच्या प्रतिस्पर्ध्याची बिझीनेस बेवसाइट जर मोबाईल फ्रेंडली असेल आणि तुमची नसेल तर […]

अलिबाबा आणि चाळीशीतले चोर[नाटक]

या नाटकाचे अविभाज्य अंग असलेला निर्जीव पण तरीही बरच काही बोलणारा ब्लॉग ही कल्पना मी स्वत: एक ब्लॉगर असल्याने खूप आवडून गेली. नॉन टेकी व्यक्ती सुद्धा ब्लॉग तयार करू शकते आणि मुख्य म्हणजे कोणतेही कारण असो पण आपलं म्हणणं ठामपणे अगदी खाजगीत सुद्धा मांडण्याकरता आणि त्यावर काही ठराविक लोकांशी संवाद साधण्याकरता ब्लॉग या माध्यमाचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे प्रेक्षकांपर्यन्त पोचवलं जातंय याचा विशेष आनंद वाटला.

बंद पडणा-या मराठी शाळांकरता पालकांचा एल्गार!

पुस्तकं ‘मायावी जगा’तली! (राजेंद्र खेर) | सकाळ

हातात 5.5 इंची डिस्प्ले असलेले मोबाइल्स, कमीत कमी 4 जीबी ची इंटर्नल मेमरी अश्या सुविधा हाताशी असताना केवळ मराठी ई बुक्स काढली जात नाहीत म्हणून वाचता येत नाही यासारखे दुदैव ते काय! आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आलेल्या लेखाताले ई बुक्स च्या बाबतीतले सगळेच तोटे पटण्यासारखे नाहीत. काही मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी त्यावर काही तोडगे निघू शकतात.

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! ४

व्यवसायांना बसल्या जागी लोकांपर्यन्त पोचण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साधनांचा उल्लेख केला होता. त्यातले एक प्रामुख्याने वापरले जाणारे आणि आपल्या मार्केटिंग तंत्राला पूरक ठरणारे मुख्य साधन म्हणजे आपल्या व्यवसायाची व्यावसायिक वेबसाइट.