राजकिय

जाब विचारणार?

बृहन्‌ अशी बिरुदावली मिरवणार्‍या मुंबईत नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. प्रभाग पाडल्याने बरीच समीकरणे बदलली, वृत्तपत्रातील बातम्यांवरून एक कळले की तरूणाईने मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. बर्‍याच ठिकाणी नावे यादीत सापडली नसल्याने कदाचित तरूणाईला आणि पर्यायाने त्या तरूणाईची मते मिळू शकणार्‍या पक्षाला याचा फटका नक्कीच बसला. पण तरीही मतदान केवळ ४५ टक्क्यांच्या आसपासच झाले. आता निवडून […]

माहितीचा अधिकार

व्हायब्रंट गुजरात

गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे […]

सत्ताधारी पक्षाला सत्तेवर बसायला लाज नाही का वाटत ?

कांद्याचे भाव १०० रु. किलोवर जाण्याची शक्यता असल्याने सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याची बातमी वाचली. पण तरीही काही प्रश्न मला पडले आहेत.

शिक्षणाच्या xxx x

राज्य सरकारने शिक्षणाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवला आहे. आधी इतके दिवस राज्याला पूर्णवेळ शिक्षणमंत्रीच नव्हते. त्याशिवाय दर वर्षी प्राथमिक , माध्यमिक शिक्षणाच्या  बाबतीत काहीतरी नवे नियम जारी केले जातात. तेही अश्या वेळी की विद्यार्थीच काय पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकही त्याबद्दल अनभिज्ञ असतात.

गृहमंत्र्याचा ब्लॉग

राज्याचे गृहमंत्री माननीय श्री.आर.आर.पाटील यांनी सुद्धा आता ब्लॉग सुरू केला आहे. जनतेशी आणि जनतेला संपर्क साधण्याकरिता आबांनी उचललेलं हे पाऊल महत्वाचे ठरावे. २६/११ च्या पार्श्वभूमीवर द्यावा लागलेला राजीनाम्याचा घाव आबांच्या काळजावर वार करून गेला असावा. जनतेचं ऐकण्यापेक्षा सुद्धा, जनतेसमोर त्यांची स्वत:ची बाजू मांडण्याकरिता त्यांनी ब्लॉगचे प्रभावी माध्यम हाताळायचे ठरवले आहे. अर्थात ते किती नि:पक्षपातीपणे चालते […]

भाववाढीच्या विरोधात मनसे काय कार्यवाही करेल ?

भाववाढीच्या विरोधात मनसे काही करू शकेल का ? की मराठीच्या मुद्दयावरच भांडत बसणार ? मनसेच्या संकेतस्थळावर ‘सूचना करा’ या सदरात मी भाववाढीच्या विरोधात मला ‘मनसे’कडून काय अपेक्षित आहे त्याची सूचना म्हणून ही सूचना पाठवली आहे. पाहूया मनसे काही हातपाय हलवते का ते जनतेसाठी.