यावर आपले मत नोंदवा

काही आभार….


मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉंबस्फोटात ज्या व्यक्तींनी हस्ते परहस्ते मदत केली

; त्याबद्दल त्यांचे एक मुंबईकर या नात्याने मनापासून आभार.

* बॉंबस्फोटाच्या वेळी उपस्थितांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि केलेल्या
मदतीबद्दल….

* रेल्वेरूळांच्या आसपासच्या झोपडपट्टीवासियांनी केलेल्या मदतीबद्दल…..

* विखारी नजरांपासून वाचण्याकरता असलेली ओढणी मानवी अवयवांचे तुकडे
गोळा करण्याकरता पुढे करणा-या अनेक जणींचे….

* मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे बंद पडल्यामुळे राज्य परिवहन आणि उपनगरीय
परिवहन मंडळाने अनेक जादा गाडया सोडल्याबद्दल….

* मुंबईतील आणि मुंबईबाहेरील अनेकांनी रक्तदान करून रक्त उपलब्ध करून
दिल्याबद्दल…..

* रक्तदानाला ताटकळत उभ्या असणा-यांना पाण्याची सोय करून देणा-या पेप्सी
कंपनीचे…………

* जखमींवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेणा-या हिंदुजाचे विश्वस्त आणि
त्यांच्या निर्णयाला जागून अहोरात्र सेवा करणा-या कर्मचा-यांचे….

* आपली चीड, आपला संताप लेखणीतून व्यक्त करणा-यांचे आणि ते प्रसिध्द
करणा-यांचेही….

* रस्तोरस्ती अडकलेल्या मुंबईकरांना आपापल्या घरी सुरक्षित पोचण्याकरता ,
वाटेत खाद्यपदार्थ – पाणी मोफत वाटून मदत करणा-या प्रत्येकाचे…..

* वेळोवेळी जनतेच्या धार्मिक भावनांना हात घालून जमावाला चिथावणा-या
राजकीय पक्षांनी यावेळी असे न करून परीस्थिती न चिघळवल्याबद्दल………..

काही असेही आभार…….

* व्हि.आय.पी’ज नी रुग्णालयात भेटी देऊन उपचारांमध्ये आणलेल्या
व्यत्ययाबद्दल…..

* वेळेवर माहिती न मिळाल्याने ही घटना घडली हा आरोप करणा-या राज्य
सरकारचे……..

* हतावरचे पोट असणा-या मुंबईकरांच्या अगतिकतेला ‘मुंबईकरांचे स्पिरीट’
किंव्हा ‘मुंबईवासियोंका जजबा’ अशी गोंडस नावे देऊन भलावण करणा-या
सगळ्या वॄत्त्वाहिन्यांचे……..

* आपत्कालिन स्थितीत नेहमीप्रमाणेच बंद पडणा-या भ्रमणध्वनिंचेही….

* महाराष्ट्रातील काही भागात स्फोटकांचे साठे जप्त होऊनही गाफील राहाणा-या
पोलिसांचे……..

नजरचुकीने कोणाचे आभार मानायचे राहीले असल्यास क्षमस्व. पण त्यामुळे
त्यांचे यातले योगदान कमी ठरत नाही.

आणि दोन गटांचे आभार , ज्यांच्याशिवाय या आभारप्रदर्शन अपूर्ण आहे.

पहिला गट : यांत बळी गेलेले २०० पेक्षा जास्त मुंबईकर, ७०० पेक्षा जास्त
वाचलेले जखमी ज्यांना जगण्यापेक्षा मरणं श्रेयस्कर वाटेल आणि या सगळ्यांचे
कुटुंबिय….

दुसरा गट : ज्यांनी मुंबईकरांचा ‘ चलता है’ द्रूष्टीकोन ओळखला आणि ही घटना
घडवली अर्थातच अतिरेकी….

या सगळ्यांचे आभार अशाकरता की त्यामुळेच तर प्रत्येक मुंबईकर हे समजून
चुकला की….

मतदान करून अथवा कर भरून सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडले तरी
सरकार आपले असत नाही…
संकटात आपल्या सारख्याच सामान्य शेजा-याने मदत नाही केली तर कुत्रं
सुध्दा आपले हाल खात नाही.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

यावर आपले मत नोंदवा