13 प्रतिक्रिया

सर्पमित्र


नागपंचमी आलीय. सापांना पुजण्यापेक्षा त्यांना वाचवायला हवं. त्यासाठी सर्पमित्र मदतीला आहेत.

पावसाचं पाणी बिळात गेल्याने बेघर झालेले साप मुंबईत अनेक ठिकाणी दिसतायत. पण, सापांना मारण्यापेक्षा त्यांना जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेता येईल.

पाणी बिळात गेल्यावर साप बाहेर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यांमधून सापाची पिलं बाहेर पडत असल्याने या काळात अनेक ठिकाणी पिल्लंही दिसतात. यावषीर् मुंबईच्या इतर भागांसह चेंबूर, भांडूप, घोडबंदर अशा अनेक भागांमध्ये असे साप दिसतायत. दर पावसाळ्यात असे चारशे ते पाचशे साप पुन्हा जंगलात सोडले जातात. गेली २७ वर्षं सर्पमित्र म्हणून काम करत असलेल्या अनिल कुबल यांनी यावषीर् सुमारे ६५ साप सोडवलेत.

शहरात नाग आणि घोणस हे दोन विषारी साप सहज नजरेस पडतात. नागाने फणा काढल्यावर तो लक्षात येतो. तर, घोणसच्या अंगावर रुदाक्षांसारखे ठिपके असतात. याशिवाय धामण आणि पाणधिवड सर्रास आढळतात. ते विषारी नसतात. पण अनेकदा लोक विषारी, बिनविषारी न पाहता सापांवर हल्ला करतात. काही वेळेला विषारी सापांशीही मुलं खेळतात. यासाठी लोकांमध्ये जागरुकता येणं गरजेचं आहे. शहरापेक्षा गावात अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे साप मारण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथे महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू ऑपरेशनअंतर्गत सर्प वाचवा, निसर्ग वाचवा मोहीम सुरू झाली आहे, अशी माहिती या संस्थेचे संचालक सुनिल कदम यांनी दिली.

सापांची दहशत अनेकांना असते, अशा वेळी साप पकडून त्यांना जंगलात सोडण्याचं काम गेली नऊ वर्षं करणाऱ्या माया भिसे या तरुणीलाही वन विभागाकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात आलं आहे.

थोडी खबरदारीही घ्या

काही वेळा सापांना सोडवताना पुरेशी काळजी न घेतल्याने अपघात होतात. साप पकडल्यावर त्यांना तातडीने काळोखात वेगळं ठेवणं गरजेचं असतं. पण कुतूहलाने जमा झालेल्या माणसांच्या गदीर्मुळे साप बिचकतो. सापांना ठेवण्यासाठी गोणी किंवा बिन्नीच्या पिशव्या वापरणं योग्य ठरतं. धामण चपळ असते, तिला पिशवीत कोंडून ठेवल्यास त्रास होतो. हे साप २४ तासांत जंगलात सोडणं आवश्यक असतं. पण एका सापाला सोडण्यासाठी जंगलात जाणं अनेकदा पुढे ढकललं जातं. हे साप घरातच अनेक दिवस पडून राहिल्यामुळे आणि योग्य ते वातावरण न मिळाल्याने त्यांचा जीव जातो. मण्यार ही निशाचर आहे. तिला दिवसा जंगलात सोडल्यास वातावरणाशी लगेच जुळवून घेणं तिला कठीण जातं. सापांची अशी काळजी घेत नसलेल्यांना सर्पमित्र म्हणू नये, असे आवाहन ‘बीएनएचएस’चे प्रोग्राम ऑफिसर निखिल भोपळे यांनी केलंय.

……..

ताबडतोब कळवा

सर्पमित्रांची संख्या वाढल्यावर तिथे अनिष्ट गोष्टींचाही शिरकाव झाला. सापांना पकडून त्यांचं विष आणि कातडीचा चोरटा व्यापार करण्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने सहा महिन्यांपूवीर् सर्पमित्रांना ओळखपत्रं दिली. अशा काही सर्पमित्रांचे हे फोन नंबर :

सुनिल रानडे, परळ – ९८२१२८६५४५
(सर्पदंशाने मृत्य़ु)

अनिल कुबल, सायन – ९९६९१९३३९६

सुनिल कदम, सायन – ९८२२७१९३०७

भरत जोशी, ऍन्टॉप हिल – ९२२१५८०८८८

मयूर कामत, अंधेरी – ९३२४२४६१०९

केदार भिडे, बोरिवली – ९८६७२००२८०

वैभव पाटील, बोरिवली – ९८६८९२२१२०

कैवल्य वर्मा, बोरिवली – ९८६९३३१४९०

सुनीश सुब्रमण्यम – ९८३३४८०३८८

माया भिसे, कळवा – ९८३३७५३२५८

अरूण नलावडे, मुलुंड – ९००४०७४१४०

अभय पावगी, ठाणे – ९९६७५७४८१३

वैभव कुलकणीर्, डोंबिवली – ०२५१२४३४९२९

अजित म्हात्रे, अंबरनाथ – ९८९००९२५३१

अरूण बिलारे, कल्याण – ९९८७००२०८९

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

13 comments on “सर्पमित्र

  1. ९१681६1840

  2. olakhpatra kasa milavta yeyil….
    ethe ek sarpa mitra ahe….
    Kalyann
    contact me…
    a.a.nirhali@gmail.com

Comment navigation

Newer Comments →

यावर आपले मत नोंदवा